लखीमपूर खेरीप्रकरणी मंगळवारी ‘शहीद किसान दिन’ In the case of Lakhimpur Kheri Martyr's Day on Tuesday
लखीमपूर खेरीप्रकरणी मंगळवारी ‘शहीद किसान दिन’ In the case of Lakhimpur Kheri Martyr's Day on Tuesday

लखीमपूर खेरीप्रकरणी मंगळवारी ‘शहीद किसान दिन’

लखीमपूर खेरी हत्याकांडात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या श्रद्धांजलीसाठी मंगळवारी (ता. १२) देशभर ‘शहीद किसान दिन’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाने दिली.

नवी दिल्ली : लखीमपूर खेरी हत्याकांडात शहीद झालेल्या शेतकऱ्यांच्या श्रद्धांजलीसाठी मंगळवारी (ता. १२) देशभर ‘शहीद किसान दिन’चे आयोजन करण्यात आल्याची माहिती संयुक्त किसान मोर्चाने दिली. ११ ऑक्टोबरपर्यंत मागण्या मान्य न केल्यास संयुक्त किसान मोर्चा देशव्यापी आंदोलनास प्रारंभ करेल, असा इशारा या वेळी देण्यात आला.  दिल्लीच्या तीन सीमांवर गेले सुमारे ११ महिने आंदोलन करणाऱ्या संयुक्त किसान मोर्चाने शनिवारी (ता.९) घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. या वेळी शेतकरी नेते राकेश टिकैत, योगेंद्र यादव, दर्शनपालसिंग आदी उपस्थित होते. लखीमपूर खेरी शेतकरी हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष मिश्रा याच्या अटकेसाठी भाजप सरकारकडून होणारी टाळाटाळ व गृहमंत्री शहा यांचे राज्यमंत्री अजय ऊर्फ टेनी मिश्रा यांचा राजीनामा न घेतला जाणे या विरोधात आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांच्या संयुक्त किसान मोर्चाने दीर्घ देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली. मंत्री मिश्रा यांनी या हत्याकांडाचे कारस्थान रचले व आता त्यांना मंत्रिपदावरून हटविले जात नाही याला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचेही सांगण्यात आले. तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी दिल्लीच्या सीमांवर चिवटपणे पाय रोवून उभे असणाऱ्या शेतकऱ्यांनी लखीमपूर शेतकरी हत्याकांडप्रकरणी उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारकडून होणाऱ्या संशयास्पद तपासाचा मुद्दा ऐरणीवर आणला आहे. 

‘ती‘ तर केवळ प्रतिक्रिया ः टिकैत  लखीमपूर भागात ४ शेतकऱ्यांच्या हत्याकांडानंतर उसळलेल्या हिंसक आंदोलनात दोन भाजप कार्यकर्ते मारले गेले त्यातील कथित दोषींना आपण दोषी मानतच नाही, असे वादग्रस्त विधान टिकैत यांनी केले. ते म्हणाले, की भाजप विरुद्धचा हिंसाचार प्रत्यक्ष कृतीची प्रतिक्रिया होती. (ॲक्‍शनची रिॲक्शन) चार शेतकऱ्यांना मंत्र्यांच्या मुलाच्या गाडीने चिरडले व नंतर झाले ती केवळ प्रतिक्रिया होती. त्यात भाजप कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला. यात कोणीही दोषी असू शकत नाही. जोवर या केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा होत नाही तोवर प्रकरणाचा तपास होऊच शकत नाही. यादव म्हणाले, की शेतकरी असोत की कोणी कार्यकर्ते, कोणाचाही जीव जाणे दुर्दैवी आहे. आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे.

असे असेल देशव्यापी आंदोलन १२ ऑक्टोबर : शहीद किसान दिन आणि शहीद किसान अस्थिकलश यात्रा १५ ऑक्टोबर (दसरा) : नेत्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन १८ ऑक्टोबर : देशव्यापी ‘रेल्वे रोको’ २६ ऑक्टोबर : लखनौमध्ये लखीमपूर हत्याकांडाविरोधात किसान महापंचायत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com