येल्लकी वाणाच्या केळीला क्विंटलला चार हजार रुपये

वढोदा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील संदीप सुभाष पाटील यांच्या येल्लकी वाणाच्या केळीची काढणी सुरू झाली आहे. या केळीला जागेवर प्रतिक्विंटल चार हजार रुपये दर मिळत आहे.
Yellaki variety of banana Four thousand rupees per quintal
Yellaki variety of banana Four thousand rupees per quintal

जळगाव  ः वढोदा (ता. चोपडा, जि. जळगाव) येथील संदीप सुभाष पाटील यांच्या येल्लकी वाणाच्या केळीची काढणी सुरू झाली आहे. या केळीला जागेवर प्रतिक्विंटल चार हजार रुपये दर मिळत आहे. खानदेशात पाटील यांनी येल्लकी केळी वाणाची लागवड प्रथमच केली होती. त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला असून, दरही चांगले आहेत.  श्रीमंती, महालक्ष्मी, ग्रॅण्डनैन आदी केळी वाणांचे उत्पादन पाटील अनेक वर्षे घेत आहे. मध्यंतरी त्यांनी त्रिची (तमिळनाडू) येथील राष्ट्रीय केळी संशोधन केंद्रात केळी पिकासंबंधी प्रशिक्षण घेतले होते. या भागातील विविध केळी वाणांची माहिती घेतली. त्याचे लाभ व इतर बाबीही अभ्यासल्या. यानंतर मागील वर्षी जानेवारीत मदुराई (तमिळनाडू) येथून येल्लकी वाणांची उतिसंवर्धित रोपे २७ रुपये प्रतिरोप या दरात घेतली होती. वाहतुकीचा वेगळा खर्च आला होता. सुमारे सात बाय पाच फूट अंतरात पावणेचार एकरांत लागवड केली.  वर्षभरानंतर काढणी होत असून, नाशिक येथील सह्याद्री फार्म्स यांनी त्याची खरेदीचा सौदा चार हजार रुपये प्रतिक्विंटल या दरात केला. युरोप व इतर देशात या वाणाच्या केळीला चांगला उठाव आहे. देशातील मॉलमध्येही मोठी मागणी असून, चांगला लाभ शेतकऱ्यांना होवू शकतो. सरासरी १४ पर्यंतची रास यातून मिळते. रास किंवा उत्पादन इतर वाणांच्या तुलनेत कमी आहे.  सध्या खानदेशात विविध वाण किंवा इतर वाणांच्या केळीला उठाव अल्प आहे. दर्जेदार केळीचे दरही ७०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. कमी दर्जाच्या केळीची काढणी खरेदीदार वारंवार विनवण्या करूनही करीत नाहीत. केळी विक्रीचा मोठा प्रश्‍न खानदेशात गेले दोन महिने कायम आहे. अशात येल्लकीला चांगले दर मिळत आहेत. शिवाय चांगला उठाव असल्याने ही बाब शेतकऱ्यांसाठी फायद्याची ठरू शकते, असे शेतकरी संदीप म्हणाले.

वाणाची वैशिष्ट्ये   झाडाचा बुंधा इतर केळी वाणांच्या तुलनेत बारीक. साधारणतः ३६ पर्यंत व्यास   निसवणीनंतर झाडाची उंची २० फुटांपर्यंत   उष्णता, थंडीत तग धरणारा वाण   केळीत ९० पर्यंत कॅलरी मिळतात. तसेच कार्बोहायड्रेड २१ ग्रॅमपर्यंत   प्रोटीन १.३ ग्रॅम, फॅट ०.३ ग्रॅम तर फायबर तीन ग्रॅम   याशिवाय व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी याचीही चांगली मात्रा मिळते  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com