पुणे जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींना ‘पिवळे’ कार्ड

The 'yellow' card to the 19 gram panchayats in the district
The 'yellow' card to the 19 gram panchayats in the district

पुणे : जलजन्य साथरोग, आजारांचा धोका उद्भवू नये, यासाठी आरोग्य विभागातर्फे पिण्याच्या पाण्याच्या सार्वजनिक स्रोतांची सातत्याने तपासणी करण्यात येते. जिल्ह्यात नुकत्याच करण्यात आलेल्या तपासणीत १९ गावांमधील पाण्याच्या स्रोतांमधील पाणी दूषित असल्याचे दिसून आले आहे. या गावांना पिवळे कार्ड देण्यात आले असून, स्रोतांमधील पाणी पिणाऱ्या नागरिकांना काही प्रमाणात धोका पोचू शकतो. जिल्हा प्रशासनाच्या वतीने ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा करताना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.  

पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता सर्वेक्षणानंतर जोखीम तपासणी केली जाते. तपासणी करताना सार्वजनिक विहीर, बोअरवेलच्या आजूबाजूच्या परिसरातील स्वच्छता, क्लोरीन पावडरचे नमुने, पाइपलाइन पाणी गळती, व्हॉल्व्ह गळती आदी घटकांची तपासणी करून मूल्यांकन केले जाते. यानुसार ० ते २९ गुणांपर्यंत सौम्य जोखमीसाठी हिरवे कार्ड, ३० ते ६९ गुणांपर्यंत मध्यम जोखमीसाठी पिवळे कार्ड, तर ७० पेक्षा जास्त गुणांवर तीव्र जोखमीसाठी संबंधित ग्रामपंचायतींना लाल कार्ड दिले जाते.ग्रामपंचायतींनी पाण्याच्या स्त्रोतांची काळजी घेणे आवश्यक आहे. पाणी पुरवठा करणाऱ्या स्त्रोतांबरोबरच पाइपलाइनमधील दुरुस्त्या करून हिरवे कार्ड मिळवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

एकाही ग्रामपंचायतीला लाल कार्ड नाही जिल्ह्यात पाणी स्वच्छता आणि शुद्धतेबाबत चांगली जनजागृती झाली असून, एकाही ग्रामपंचायतीला ‘लाल कार्ड’ मिळालेले नाही. हिरवे कार्ड मिळालेल्या ग्रामपंचायतीचे पाणी स्रोत पिण्यास योग्य असून, पिवळे कार्ड मिळालेल्या स्रोतांमध्ये उपाययोजना करणे आवश्यक आहे.

पिवळे कार्ड दिलेल्या ग्रामपंचायती  मावळ तालुक्यात सर्वाधिक नऊ गावांना, जुन्नरमधील पाच, वेल्हेमधील दोन, तर मुळशी, पुरदंर, आंबेगाव तालुक्यात प्रत्येक एक गाव अशा एकूण १९ गावांना पिवळे कार्ड देण्यात आल्याचे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com