Agriculture news in Marathi Yellow mosaic infestation on soybeans | Agrowon

सोयाबीनवर पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

यावर्षी आजवर झालेल्या पावसाच्या परिणामी सोयाबीन पीक बंपर येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सोयाबीनवर पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.  

सेलू, जि. वर्धा : यावर्षी आजवर झालेल्या पावसाच्या परिणामी सोयाबीन पीक बंपर येण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, सोयाबीनवर पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.  

सेलू तालुक्यातील अनेक गावांमध्ये यावर्षी सोयाबीन क्षेत्र वाढीस लागले आहे. समाधानकारक पावसाच्या परिणामी उत्पादकता आणि उत्पन्न चांगले होण्याची अपेक्षा शेतकऱ्यांना होती. परंतु कोटंबा, विटाळा, धपकी शिवारात काही शेतकऱ्यांच्या फुल तर काही शेतकऱ्यांकडे शेंग धारणावस्थेत असलेले पीक पिवळे पडू लागले आहे. पिकावर पिवळा मोझॅकचा प्रादुर्भाव झाल्याचे तज्ज्ञांनी
सांगितले.

कोटंबा विटाळा शिवारात भाऊराव सारोकर, काशिनाथ लोणकर, महादेव सारोकर, शंकर डोंगरे, सचिन झिले, विकी कांबळे या शेतकऱ्यांचे तीस एकर क्षेत्रावरील सोयाबीन पिवळे पडून करपायला सुरुवात झाली आहे. सोयाबीन फुलोरा आणि काही भागात शेंगधारणा अवस्थेत असताना हा प्रकार घडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढीस लागली आहे.

संततधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून राहिले. त्यामुळे झाडाची मूळ बराच काळ काम पाण्यात राहिल्याने विविध प्रकारचे कीड रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. पीक पिवळे पडण्याचा प्रकार पिवळा मोझॕक आहे. तरीसुद्धा शेताची पाहणी केल्याशिवाय  स्पष्ट सांगता येणार नाही.
- राधिका बैरागी, तालुका कृषी अधिकारी, सेलू

आमच्या शेतातील सोयाबीनला फुलधारणा चांगली झाली होती. आता शेंगा सुद्धा लागण्या सुरुवात झाली होती. परंतु दोन-तीन दिवसांपासून हिरवेगार सोयाबीन पिवळे पडून वाळायला लागले आहे.  कृषी खात्याने पाहणी करून नुकसान भरपाई मिळवून देण्याचे प्रयत्न करावे.
- भाऊराव सारोकर, शेतकरी कोटंबा


इतर ताज्या घडामोडी
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...
एकरकमी ‘एफआरपी’साठी ‘मिस कॉल’ मोहीमकोल्हापूर : केंद्र सरकारने ‘एफआरपी’चे तुकडे...