उजनी परिसरात सोयाबीनवर `यलो मोझॅक’

उजनी, जि. लातूर : खरीप हंगामातील प्रमुख सोयाबीन पिकावर शेवटच्या टप्प्यात यलो मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादनात आणखी घट होण्याच्या भीतीने येथील शेतकरी चिंतेत आहेत.
'Yellow mosaic' on soybeans in Ujani area
'Yellow mosaic' on soybeans in Ujani area

उजनी, जि. लातूर : खरीप हंगामातील प्रमुख सोयाबीन पिकावर शेवटच्या टप्प्यात यलो मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे उत्पादनात आणखी घट होण्याच्या भीतीने येथील शेतकरी चिंतेत आहेत. 

सध्या बाजारपेठेत भाव खाणारे सोयाबीन शेतात मात्र शेतकऱ्यांच्या चिंतेचे कारण बनले आहे. हजारो रुपये उत्पादनावर खर्च करून अस्मानी संकटांना तोंड देत सोयाबीन पीक हे शेवटच्या टप्प्यात आले आहे. त्यावर यलो मोझॅक या विषाणूजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे उजनी (ता. औसा) परिसरात पाहायला मिळत आहे. 

मध्यंतरी फुले आणि शेंगा लागायच्या वेळेस पावसाचा मोठा खंड पडला होता. त्याच वेळी उत्पादनात घट होणार हे निश्चित होते. त्या अनुषंगाने प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यातूनही तसा अहवाल समोर आला. त्यानंतर झालेल्या मोठ्या पावसामुळे सोयाबीनवर हळद्या या रोगाचा पादुर्भाव झाल्याचे पाहायला मिळत आहे.  

रोगग्रस्त झाडांवरील शेंगाची संख्या कमी होऊन त्यात लहान आकाराचे दाने भरतात. संपूर्ण शेंगा दाने विरहित व पोचट उपजतात आणि पर्यायाने उत्पादनात लक्षणीय घट येते. दरम्यान, शेतकऱ्याचे आर्थिक गणित अवलंबून असलेल्या पिकावर एका मागोमाग एक संकटे येत असल्याने येथील शेतकरी चिंतेत आहेत. 

सुरवातीला रोगग्रस्त झाडावरील पानांच्या शिरांमधील भागावर फिकट निस्तेज, पिवळे ठिपके दिसतात. कालांतराने ठिपक्यांच्या, चट्ट्यांच्या आकारमानात वाढ होऊन संपूर्ण पान पिवळे पडून त्यातील हरितद्रव्याचा ऱ्हास होतो. अशा पिवळ्या पानांवर तांबूस-करपट रंगाचे ठिपके दिसतात.  

८-१०  दिवसांपासून ढगाळ वातावरण व रिमझिम पाऊस पडत आहे. त्यामुळे सद्या सोयाबीन पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ही रोगग्रस्त सोयाबीन पिकाच्या पानांची व शेगांची कृषी महाविद्यालय, लातूर येथील प्रयोगशाळेत तपासणी केली. त्यातून सोयाबीनवर पाने व शेंगावरील करपा रोगाबरोबरच अल्पशा प्रमाणात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्याची माहिती कृषी विभागाकडून मिळाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com