agriculture news in marathi, yellow peas import banned for three months says Pasha Patel | Agrowon

वाटाणा आयातीवर तीन महिने पूर्णतः बंदी
सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

कऱ्हाड, जि. सातारा ः शेतमाल आयात संस्कृती बंद करून निर्यात संस्कृती निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार वाटाणा आयातीवर तीन महिन्यांसाठी पूर्णतः बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. 

कऱ्हाड, जि. सातारा ः शेतमाल आयात संस्कृती बंद करून निर्यात संस्कृती निर्माण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. त्यानुसार वाटाणा आयातीवर तीन महिन्यांसाठी पूर्णतः बंदी घालण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली. 

दरम्यान, शेतकरी संपाविषयी त्यांनी सरकार स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यासाठी प्रयत्नशील असून, त्यासाठी थोडी वाट बघावी, असेही सांगितले.   
जयवंतराव भोसले शेतकरी समृद्धी अभियानाच्या कार्यक्रमानिमित्त पटेल आज कऱ्हाड तालुक्‍याच्या दौऱ्यावर आले होते. त्या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कृष्णा कारखान्याचे माजी संचालक देसाई उपस्थित होते. विषमुक्त अन्नधान्य पिकविण्यासाठी प्रोत्साहनपर योजना राबविण्यासाठी केंद्र शासनाच्या अर्थ संकल्पात विशेष तरतुदी केल्या आहेत. आयात- निर्यातीचे धोरणे ठरविण्यासाठी राज्यात कोणत्या पिकाची किती लागवड झाली आहे, याची अचूक आकडेवारी उपलब्ध करून देणारी स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्याचा विचार सुरू आहे. कोणत्याही एकाच पिकाचे अतिरिक्त उत्पादन आल्यास दर आपोआप ढासळतात. यावर उपाय म्हणून बहुपीक पद्धतीबाबत संशोधन करण्याचे केंद्र सरकारला सूचित केले आहे. 

गेल्या ४० वर्षांपासून शेतकरी चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करत आहे. मोदी सरकारच्या काळात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणारी धोरणे राबविली जात असल्याचे मनस्वी समाधान वाटत आहे. राज्यात लागवडीखाली क्षेत्रापैकी ७० टक्के क्षेत्र सोयबीन व कापसाचे आहे. त्यामुळे राज्यात पिकणाऱ्या कापूस व सोयाबीनला योग्य भाव मिळवून देण्यासाठी मुख्यामंत्र्यांच्या मध्यस्थीने केंद्र सरकारकडून आयात-निर्यातबाबत धोरणात्मक निर्णय राबविले. त्यामुळे कापूस व सोयाबीनच्या दराचा प्रश्न मिटला आहे. सेंद्रीय शेतीची गरज ओळखून केंद्रीय अर्थ संकल्पात पशुधन विकासासाठी दहा हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आतापर्यंत फक्त ३० लाख बिलियन डॉलर एवढीच आयात होत होती. ती १०० लाख करण्याची कार्यवाही सुरू आहे. 

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...