Agriculture news in Marathi In Yeola, 26,000 crore electricity bills were paid to 46,000 customers | Agrowon

येवल्यात ४६ हजार ग्राहकांकडे २६६ कोटी वीजबिल थकले

संतोष विंचू
सोमवार, 25 जानेवारी 2021

येवला तालुक्यात शेतीच्या ४६ हजार ७२९ ग्राहकांकडे २६६ कोटी थकले आहे. या शेतकऱ्यांना आता ५०-६० टक्के बिल माफी मिळणार असून भरलेल्या पैशांत पायाभूत सुविधा शेतकऱ्यांना मिळणार आहे. 

येवला, जि. नाशिक : तालुक्यातील कृषिपंप धारकांची वीजबिलाची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. शेतीच्या ४६ हजार ७२९ ग्राहकांकडे २६६ कोटी थकले आहे. या शेतकऱ्यांना आता ५०-६० टक्के बिल माफी मिळणार असून भरलेल्या पैशांत पायाभूत सुविधा शेतकऱ्यांना मिळणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी बिले भरावीत, असे आवाहन महावितरणने केले आहे.

शासनाने कृषी धारकांसाठी कृषी धोरण आणले असून या धोरणामुळे कृषी धारकांचे थकीत वीजदेयक जवळपास ५० ते ६० टक्के कमी होणार आहे. या धोरणात वीज जोडणीबाबत सवलती मिळणार आहे. रोहित्रावर लोड उपलब्ध असल्यास ३० मीटरचे आत असल्यास तत्काळ वीज जोडणी मिळेल. २०० मीटरपर्यंत एबी केबलद्वारे वीज जोडणी करण्यात येईल. तर रोहित्रावर लोड उपलब्ध नसल्यास रोहित्रावर लोड वाढवून वीज जोडणी देणे व नवीन रोहित्र बसवून वीज जोडणी दिली जाईल.

२०० ते ६०० मीटर अंतर असल्यास फंडाचे उपलब्धतेनुसार अंतर्गत वीज जोडणी करण्यात येईल. ६०० मीटरपेक्षा जास्त अंतर असल्यास सौर योजनेद्वारे वीज जोडणी देण्यात येईल. वरीलपैकी योजनेमध्ये तत्काळ जोडणी हवी असल्यास ग्राहकाने स्वखर्चाने काम करून घ्यावे नंतर वीज देयकातून परतावा देण्यात
येणार आहे.

२०२४ पर्यंत सवलत
कृषी वीज देयकाची थकबाकी वसुलीसाठी धोरण निश्चित केले आहे. सर्व उच्चदाब, लघुदाब, कृषी ग्राहक भाग घेण्यासाठी पात्र असून त्यामध्ये चालु थकबाकीदार व कायमस्वरूपी खंडित पीडी ग्राहक पात्र आहेत. ही सवलत ३१ मार्च २०२४ पर्यंत असेल.मागील कमाल ५ वर्षापर्यंतचे (सप्टेंबर २०१५) पर्यंत वीजदेयक दुरुस्ती तर मागील ५ वर्षापर्यंतचे १०० टक्के विलंब आकार व ५ वर्षापूर्वीचे विलंब आकार व व्याज १०० टक्के माफ होईल. सुधारित थकबाकी ३ वर्षासाठी ३१ मार्च २०२४ पर्यंत गोठविण्यात येऊन ग्राहकांच्या देयकांमध्ये वेगळी दर्शविण्यात येणार आहे.

वसुलीसाठी संस्थांना प्रोत्साहन
कृषी पंप देयक भरणा कार्यप्रणालीची पद्धत व प्रोत्साहनाचे स्वरूप असे आहे. ग्रामपंचायत, सहकारी साखर कारखाना, सहकारी सुतगिरणी, विविध कार्यकारी सहकारी संस्था, महिला बचत गट यांना प्रति वीज बिल पावती करिता रुपये ५ रुपये एवढी रक्कम दिली जाईल. शेतकरी सहकारी संस्था व साखर कारखान्यांनी वसूल केलेल्या कृषी थकबाकीच्या रकमेवर १० टक्के रक्कम प्रोत्साहन म्हणून देण्यात येईल.

उर्वरित संस्थांनी ग्रामपंचायत, सहकारी संस्था कृषी थकबाकीचा भरणा स्वीकारल्यास मागील वर्षीचा भरणा व चालू वर्षीचा भरणा यातील वाढीव रक्कमेवर ३० टक्के प्रोत्साहन मोबदला दिला जाईल. भरणा केलेल्या रक्कमेच्या ३० टक्के प्रोत्साहन मोबदला दिला जाईल व चालु कृषी वीज बिलाचा भरणा  स्वीकारल्यास, भरणा केलेल्या रक्कमेच्या २० टक्के प्रोत्साहन मोबदला दिला जाईल.

थबबाकी वसुलीतून गावनिहाय वसूल झालेल्या ३३ टक्के रक्कम गावातील लीन, गाळे, तर डीपी, रोहित्र यांच्यासाठी खर्च करण्यात येईल. वसूल झालेल्या रक्कमेच्या ३३ टक्के रक्कम जिल्हा स्तरावरील नवीन उपकेंद्र, वाहिन्या यांचेसाठी करण्यात येणार आहे. थकबाकीत तर भरीव सूट मिळणार आहेच व नव्या वीज जोडण्या देण्याची मोहीम हाती घेतली जाणार आहे. जमा झालेले पैसे तुमच्या गावात नव्याने वीज सुविधांसाठी वापरात आणले जाणार आहे. म्हणजेच चारही बाजूंनी शेतकऱ्यांना फायदा असल्याने तत्काळ थकबाकी भरून सहकार्य करावे.
- विनायक इंगळे, उपकार्यकारी अभियंता, येवला

 


इतर ताज्या घडामोडी
शासकीय हरभरा खरेदीच्या ऑनलाइन नोंदणीला...जळगाव : खानदेशातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये...
बंद आठवडी बाजाराचा कांदा उत्पादकांना...जळगाव ः जळगाव जिल्ह्यात आठवडी बाजार ६ मार्चपर्यंत...
महिलांना रोजगार मिळवून देण्यासाठी ‘...रत्नागिरी ः पर्यटन व्यवसायातून महिलांना रोजगार...
कापडण्यात कांद्याला फटकाकापडणे, जि. धुळे : पावसाळ्यात सलग तीन महिने पाऊस...
परभणी जिल्ह्यात अवकाळीने हरभरा, ज्वारी...परभणी ः जिल्ह्यात या महिन्यात झालेला अवकाळी पाऊस...
मारुती माळ येथे टस्कराचे दर्शनकोल्हापूर ः बाळेघोल (ता. कागल) येथील जंगलातून...
मराठवाड्यात अवकाळीने ३३ टक्के पिकांचे...औरंगाबाद : अठरा व १९ फेब्रुवारी रोजी झालेल्या...
नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्तांसाठी...नांदेड : जिल्ह्यात फेब्रुवारी ते मे २०२० या...
निम्न पेढी प्रकल्पाचे काम वेळेत पूर्ण...अमरावती : निम्न पेढी प्रकल्प हा अमरावती व अकोला...
...तर खंडणीचे गुन्हे दाखल करा ः गरडपुणे ः ‘‘पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमाली...
सहकारी संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा...कोल्हापूर ः राज्याच्या राजकीय पटलाचे लक्ष लागून...
बाजार समित्यांनी पेट्रोल, सीएनजी पंप...परभणी ः उत्पन्नात वाढ होण्याच्या दृष्टीने जिल्हा...
जैन यांच्या मोजेक पोर्ट्रेटची ‘गिनेस...जळगाव :  जैन उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष...
सातारा जिल्ह्यात ५५ टक्के क्षेत्रावर...सातारा ः जिल्ह्यात २५ फेब्रुवारीअखेर तीन हजार १५४...
शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी योजनामहाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि नाबार्डद्वारे...
कृषी सल्ला (परभणी विभाग)पाण्याची उपलब्धता असल्यास उन्हाळी भाजीपाला...
राज्यात टोमॅटो १५० ते १००० रुपयेऔरंगाबादमध्ये क्विंटलला ३०० ते ६०० रुपये दर...
वनशेतीमध्ये चारा पिकांची लागवड फायदेशीर...वनशेतीमध्ये वनीय कुरण, कृषी वनीयकुरण, उद्यान...
शेतीच्या उन्नतीसाठी ज्ञानच महत्त्वाचे...पुणे : कृषीप्रधान देश असलेल्या भारतात शेतीला...
अवकाळीच्या तडाख्यात शेवग्याचे पुन्हा...नाशिक : गत जानेवारी महिन्यात झालेल्या अवकाळी...