Agriculture news in Marathi Yeola Market Committee honored by 'Annis' | Page 3 ||| Agrowon

येवला बाजार समितीचा ‘अंनिस’कडून गौरव

टीम अॅग्रोवन
रविवार, 26 सप्टेंबर 2021

अमावास्येच्या दिवशी शेतीमाल खरेदी सुरू करण्याचा निर्णय स्तुत्य व अभिनंदनीय असल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंत पवार व सचिव कैलाश व्यापारे यांचा येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने बाजार समितीत जाऊन सत्कार करण्यात आला. 

येवला, जि. नाशिक : ६४ वर्षांची परंपरा मोडीत काढत अमावास्येच्या दिवशी शेतीमाल खरेदी सुरू करण्याचा निर्णय स्तुत्य व अभिनंदनीय असल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक वसंत पवार व सचिव कैलाश व्यापारे यांचा येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने बाजार समितीत जाऊन सत्कार करण्यात आला. 

अमावास्या आली की बाजार समिती बंद ही अंधश्रद्धेला खतपाणी घालणारी परंपरा मोडण्याचे धाडस केल्याने शेतकरी हित साधले जाणार असल्याचे या वेळी राष्ट्र सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष अर्जुन कोकाटे यांनी स्पष्ट केले. सभापती पवार व सचिव व्यापारे यांनी व्यापारी बंधूंसोबत चर्चा करून मोठ्या धाडसाने हा निर्णय सकारात्मक दृष्टिकोन ठेवून घेतलेला आहे. परंतु या निर्णयामुळे शेतकरी बांधवांमध्ये अमावास्येबाबत हजारो वर्षांपासून रुजलेली अंधश्रद्धा, भीती दूर सारण्याचे मोठे काम बाजार समितीने केले आहे. 

मुख्य प्रशासक पवार, सचिव व्यापारे यांचा अंधश्रद्धा निर्मूलनचे अर्जुन कोकाटे, प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे, दिनकर दाणे, डॉ. अजय विभांडिक, अॅड. दिलीप कुलकर्णी, पंडित मढवई, बाबासाहेब कोकाटे, रामनाथ पाटील, कानिफनाथ मढवई, अप्पासाहेब शिंदे, हेमंत पाटील, शैलेश अहिरे आदींनी शाल व पुष्पहार घालून सत्कार केला.
 


इतर अॅग्रो विशेष
वीजप्रश्नी संतप्त शेतकरी  महावितरण...नाशिक : महावितरण कंपनीकडून सटाणा तालुक्यात थकीत...
कापूस खेडा खरेदी करणाऱ्या ...बुलडाणा ः खेडा खरेदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना...
कडुलिंबाची झाडे वाळू लागली पुणे नगर ः नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील...
राज्यातील १२१ आदिवासी  आश्रमशाळा होणार...पुणे ः शिक्षण व्यवस्थेमधील बदलांना सामोरे जात...
लाल कांद्याला उन्हाळच्या  तुलनेत मिळतोय...नाशिक : दिवाळीनंतर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार...
नगर पंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी...पुणे नगर ः राज्यातील मुदत संपलेल्या परंतु,...
सत्तावीस हजार सहकारी संस्थांच्या ...पुणे ः राज्यातील कृषी पतसंस्था, बहुउद्देशीय...
‘बेरीज् एक्सलन्स सेंटर’ उभारणीसाठी ...सातारा ः स्ट्रॅाबेरी मातृ रोपांवरील आयात शुल्क...
शेतकरी उत्पन्न दुपटीच्या बैठकीला २३... नवी दिल्ली ः संसदेच्या कृषी विषयक स्थायी...
दिवाळी सुटीनंतरच्या बेदाणा  सौद्यात...सांगली ः दिवाळीच्या सुटीनंतर सांगली कृषी उत्पन्न...
स्टॉक लिमिटला नकार;  सोयाबीन बाजाराला...पुणे ः राज्य सरकारने सोयाबीनवर स्टॉक लिमिट लावणार...
भाजीपाला,पूरक उद्योगातून महिलांची आघाडीमिरजोळी(ता.चिपळूण,जि.रत्नागिरी) गावातील उपक्रमशील...
तुर्कांबाद खराडीत करारावर बटाटा...औरंगाबाद : जिल्ह्यातील गंगापूर तालुक्‍यातील...
शेतकऱ्यांनो एकरकमी भरा अर्धेच वीजबिल ः...नगर : राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे धोरण...
राज्याच्या किमान तापमानात घट पुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर आकाश...
शेतकऱ्यांनी बांबू लागवडीकडे वळावे -...लातूर ः आज देशात गहू, तांदूळ, मका आणि साखर अधिकची...
शिंदीच्या झाडांचे आता जिओ टॅगिंग  नीरा...नागपूर ः राज्य शासनाने नीरा देणाऱ्या शिंदीच्या...
कंटेनर भाड्यात पाच पट वाढ नागपूर ः टाळेबंदीमुळे अमेरिका आणि युरोपियन देशात...
विमा योजनेकडे ७० टक्के शेतकऱ्यांनी...सांगली : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत...
कापड उद्योगाला खुपतोय कापसाचा दर पुणे : तमिळनाडूतील राजकीय पक्ष तसेच कापड...