Agriculture news in Marathi, In Yeola taluka, the prices of Fodder hike | Agrowon

येवला तालुक्यात चाऱ्यांचे भाव कडाडले, पशुपालक धास्तावले
टीम अॅग्रोवन
सोमवार, 29 जुलै 2019

नाशिक : येवला तालुक्यात उन्हाळ्यात असलेली दुष्काळी गंभीर परिस्थिती भर पावसाळ्यात अजूनच गंभीर होत चालली आहे. काही भागांमध्ये पाऊस पडला, थोड्याफार प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. मात्र जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ‘जैसे थे’ असाच असून पशुपालकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. जो चारा एकपट भावाने मिळत होता, आता त्याचे दर दुप्पट झाल्याने पशुपालकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. 

नाशिक : येवला तालुक्यात उन्हाळ्यात असलेली दुष्काळी गंभीर परिस्थिती भर पावसाळ्यात अजूनच गंभीर होत चालली आहे. काही भागांमध्ये पाऊस पडला, थोड्याफार प्रमाणात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला. मात्र जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न ‘जैसे थे’ असाच असून पशुपालकांना मोठ्या संकटांचा सामना करावा लागत आहे. जो चारा एकपट भावाने मिळत होता, आता त्याचे दर दुप्पट झाल्याने पशुपालकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. 

मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने गायरानावर चराईसाठी गवत नाही. दुष्काळ असल्याने पीकचारा मुबलक उपलब्ध झाला नाही. त्यामुळे जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा जानेवारी महिन्यातच संपुष्टात आला. त्यामुळे दावणीला असलेलं पशुधन जगवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. बाजरी, कडबा, मक्याचा चारा, भूस या प्रकारचा चारा संपल्याने पर्यायी म्हणून ऊस विकत घेतला जात आहे. मात्र, टनाला ५ हजार रुपये मोजावे लागतात असल्याने पशुपालक धास्तावले आहेत. सध्या हे दर ४५०० रुपयांपर्यंत आले आहेत. जनावरे जगविण्यासाठी मागील वर्षांपासून चारा विकत घेण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे उसनवारी व सोने-नाणे गहाण ठेवून चारा खरेदी करण्याची वेळ आली आहे. चाऱ्याच्या दरात टनामागे १००० ते १५०० रुपये अधिक मोजावे लागत आहे. 

उसाला मनमानी भाव 
निफाड तालुक्यातील ऊस व बांडीचे व्यापारी ट्रक, पिकअपमध्ये ऊस भरून थेट विक्रीसाठी घेऊन येतात. ऊस खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची सकाळी ७ वाजेपासून झुंबड उडते. मनमानी भाव द्यावा लागत आहे. सध्या ४५०० ते ४७०० रु. असा दर आहे.

ग्रामीण भागात चाऱ्याची परिस्थिती खूपच अवघड झालेली आहे. साठवलेला चारा संपला, आता सर्व पावसावर अवलंबून असून, पशुधन टिकविण्यासाठी मोठी तारांबळ उडते आहे.
- विजय लोखंडे, पशुपालक, अंदरसूल, ता. येवला

अजून एक महिना हिरवा चारा उपलब्ध होणार नाही. त्यामुळे दुभती जनावरे सांभाळण्यासाठी दुसरा चारा उपलब्ध नसल्याने ऊस जरी परवडत नसला, तरी विकतचा ऊस विकत घेतल्याशिवाय दुसरा पर्याय नाही. 
- अतुल खैरनार, पशुपालक, गारखेडे, ता. येवला

इतर ताज्या घडामोडी
नगर जिल्ह्यात उडदाचे उत्पादन यंदा ७०...नगर  ः जिल्ह्यात यंदा उडदाची उत्पादकता...
पीक उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न...पुणे  ः  कृषी विद्यापीठांकडून शेतकरी...
दुष्काळी स्थितीत आश्‍वासक ठरणारे ‘...सध्याच्या दुष्काळी स्थितीत वा बदलत्या हवामानात...
महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार ः...मुंबई : आगामी पाच वर्षांत महाराष्ट्र दुष्काळमुक्त...
आम्ही सत्तेत आल्यास चार महिन्यांत...वणी, जि. यवतमाळ  ः शेतकऱ्यांना कर्जमाफी...
नाशिकमध्ये वांगी २७०० ते ५००० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
बहुगुणी अन्‌ बहुपयोगी जवस जवसाच्या बियांचा वापर खाद्य तेल आणि औद्योगिक...
नंदुरबार जिल्ह्यात पीक काढणी वेगातनंदुरबार  : जिल्ह्यात खरिपाच्या हंगामातील...
राज्यात साडेचार हजार सावकार अनधिकृतपुणे : शेतकरी आत्महत्येच्या समस्येवर प्रभावी उपाय...
सोयाबीन सुडी पेटविण्याच्या घटनांमध्ये...बुलडाणा  ः वैयक्तिक मतभेद, आपापसातील वाद आदी...
बिगर नोंदणीकृत उत्पादनासाठी हवा कायदा...सध्या खते, कीटकनाशके उत्पादन व विक्रीसाठी दोन...
आपल्या मताची किंमत दाखवून देण्याची वेळ...शेती, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि निवडणूक या विषयांचा...
भिवापूर येथे सोयाबीन खरेदीला सुरवातभिवापूर, नागपूर  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
महायुतीत आमची अवस्था इकडे आड तिकडे...नाशिक  : ‘‘महायुतीच्या जागावाटपात नाराज असलो...
निवडणुकीत शेतकरी प्रश्न शोधावे लागतात...निवडणुकांतून शेतकरी सोडून सारे राजकीय घटक...
जळगाव बाजार समितीत धान्याचे लिलाव बंदचजळगाव  ः जिल्ह्यातील सर्वांत मोठ्या व...
बाजार सुधारणांपासून शेतकरी वंचितचशेतकरी आणि शेतीमालाला शोषित बाजार व्यवस्थेच्या...
कांदा खरेदी-विक्रीच्या व्यवहारांवर...धुळे  ः खानदेशात कांद्यासाठी प्रसिद्ध...
ग्रामविकासासाठी स्वतंत्र निधी, पाणी...महाराष्‍ट्रातील २८ हजार ग्रामपंचायतीपैकी २३ हजार...
मंडणगड : जंगली श्वापदांकडून भातशेतीचे...मंडणगड, जि. रत्नागिरी : शेतात तयार झालेल्या...