agriculture news in marathi, Yeola taluka is still thirsty | Agrowon

येवला तालुका अजूनही तहानलेला

टीम अॅग्रोवन
रविवार, 9 सप्टेंबर 2018

पावसाने घात केल्याने पाटपाणी नसलेल्या उत्तरपूर्व भागात अधूनमधूनच्या सरीवर पिके हिरवीगार दिसत असली तरी प्रत्यक्षात पिकांची स्थिती बिकट आहे. खरिपाचा जुगार फसला असून लाखो रुपयांचे भांडवल मातीत जाणार व कर्जाचा डोंगर ठरलेला आहे. यापुढील काळात पिके हाती लागण्यासाठी तरी जोरदार पाऊस यावा.
- सोपान गोटीराम भालेराव, सायगाव

येवला : पर्जन्याच्या आकड्यांवर नजर टाकल्यास तालुक्याचा क्रमांक आकडेवारीत जिल्ह्यात तिसरा लागतो. प्रत्यक्षात अर्धा तालुका अजूनही तहानलेला आहे. पाण्याअभावी पिकांचे नुकसान झाले आहे, तर ५० वर वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू असून बंधारे, विहिरी कोरड्याठाक आहेत.

ब्रिटिशकालीन दुष्काळी असलेल्या या तालुक्याचे पर्जन्यमान मुळातच जिल्ह्यात सर्वाधिक कमी आहे. त्यातच यावर्षी अजूनही मुसळधार पाऊस पडलेला नसल्याने सर्वत्र विहिरी, नदी, नाले कोरडेठाक आहेत. विशेषता डोंगरी पूर्व भागात पाऊस नावालाच असल्याने पिके करपली आहेत. पिण्यासाठी देखील पुरेसे पाणी नसल्याने अद्यापही नागरिकांची भटकंती होत आहे.

याउलट चित्र पालखेड डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रात आहे. पाऊस नसला तरी कालव्यातून १५ दिवसांपासून पाणी सुरू असून वितरिकाना पाणी सोडले जात असल्याने शेतीला मोठा आधार मिळाला आहे. तालुक्यातील पिकांची स्थिती मात्र बेताची झाली असल्याने उत्पन्नात ३० ते ५० टक्के हानी होणार आहे. पाण्याअभावी अर्धा पावसाळा झाला तरी आजही ३१ गावे व १९ वाड्याना टॅंकरने पाणीपुरवठा सुरूच आहे.

दुसरीकडे तालुक्यात पेठ, सुरगाणा, इगतपुरीच्या तुलनेत तिसऱ्या क्रमाकांचा पाऊस येथे पडल्याचे टक्केवारी सांगत आहे. अत्यल्प प्रमाण व संततधारेने फुगलेले आकडे, यामुळे पावसाचे प्रमाण तब्बल ९२.४१ टक्के दाखवत आहे. मात्र, प्रत्यक्षात परिस्थिती कठीण आहे.

 


इतर ताज्या घडामोडी
पुणे विद्यापीठात पश्चिम विभागीय औषधी...पुणे  ः केंद्र सरकारच्या आयुष...
शिर्डीतील सामुदायिक विवाह सोहळ्यासाठीची...शिर्डी, जि. नगर  : साई सिद्धी चॅरिटेबल...
माळेगाव कारखान्यात सत्तापरिवर्तन;...माळेगाव, जि. पुणे  ः राज्यात लक्षवेधी...
नगर जिल्ह्यातील सहा केंद्रांवर तूर...नगर  ः जिल्ह्यात हमीभावाने तूर खरेदीसाठी आठ...
कर्जमाफीवरून विरोधक दुसऱ्या दिवशीही...मुंबई  ः भाजपने शेतकरी कर्जमाफी आणि महिला...
सातारा जिल्ह्यात ९० टक्के क्षेत्रावर...सातारा  ः जिल्ह्यात पोषक वातावरणामुळे रब्बी...
मसाला, सुगंधी वनस्पतीवर्गीय पिकांची...अकोला  ः ‘‘आपल्याकडील हवामान, जमीन हे मसाला...
मराठवाड्यात यंदा तुती लागवडीसाठी...औरंगाबाद : मराठवाड्यात गतवर्षी दुष्काळाचा...
संपूर्ण कर्जमुक्तीसाठी भाजपचे आंदोलन अकोला  : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने...
`म्हैसाळ`च्या उन्हाळी आवर्तनाकडे...सलगरे, जि. सांगली : म्हैसाळ पाणी योजनेचे कालवे...
अकोला झेडपी देणार आत्महत्याग्रस्त...अकोला  ः नापिकी, कर्जबाजारीपणामुळे जिल्ह्यात...
लातूर विभागात १४ लाख हेक्‍टरवर रब्बी...लातूर : विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयांतर्गत...
अमरावती जिल्ह्यात निवडणुकांचा बिगुलअमरावती  ः जिल्ह्यात एप्रिल ते जून या...
वऱ्हाडातील चार लाख शेतकरी...अकोला  ः राज्य शासनाने जाहीर केलेल्या...
मराठवाडा, खानदेशातील नऊ कारखान्यांची...औरंगाबाद  : येथील साखर सहसंचालक...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यात ३३११...नांदेड : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जळगाव : कर्जमाफीसाठी ११३ शेतकऱ्यांचे...जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी...
कराडी येथे रेंजअभावी कर्जमाफी लाभार्थी...पारोळा, जि. जळगाव ः राज्य सरकारच्या महात्मा...
पुष्पोत्सव अधिक मोठ्या स्वरूपात साजरा...नाशिक : ‘नाशिक महापालिका राबवत असलेला...
नाशिक जिल्ह्यात गव्हाच्या पेऱ्यात वाढनाशिक : जिल्ह्यात रब्बीच्या एकूण १ लाख १३ हजार...