agriculture news in Marathi Yeulkhed became agri tourism Maharashtra | Agrowon

खारपाण पट्ट्यातील येऊलखेड बनले कृषी पर्यटनस्थळ

टीम अॅग्रोवन
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

मागील काही दिवसांत गावात शेतकऱ्यांच्या भेटींचे प्रमाण वाढले आहे. ‘ॲग्रोवन’ने आमच्या गावाला राज्यस्तरावर पोचविल्यानंतर ही संख्या वाढली. आता शेतकऱ्यांसाठी, कृषी खात्यासाठी येऊलखेड गाव ‘मॉडेल’ म्हणून समोर आल्याचे मोठे समाधान आहे. शेतकऱ्यांच्या-अधिकाऱ्यांच्या भेटीमुळे नवनवीन बाबी कळत आहेत.  
- शशिकांत पुंडकर, शेतकरी, येऊलखेड

अकोला: विदर्भाची पंढरी शेगाव हे संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते. आता शेगावपासून जवळच असलेले येऊलखेड हे गावही प्रसिद्घीस आले आहे. याला कारण ठरले तरे गावकऱ्यांनी शेतीत केलेले नवनवीन प्रयोग. ‘ॲग्रोवन’च्या माध्यमातून राज्यस्तरावर झळकलेले एक हजार लोकवस्तीचे येऊलखेड आता शेतकऱ्यांसाठी कृषी पर्यटनस्थळ म्हणून समोर आले आहे.

शेगाव (जि. बुलडाणा) तालुक्यातील येऊलखेड या गावात गेल्या पाच-सहा वर्षांत शेततळ्यामुळे क्रांती झाली आहे. हे गाव पूर्णतः खारपाणपट्टयात मोडते. त्यामुळे जमिनीतील पाणी सिंचनासाठी, पिण्यासाठी योग्य नाही. परिणामी, शेती करताना इतरांप्रमाणेच याही गावकऱ्यांना अडचणी निर्माण झाल्या. यातून मार्ग शोधत गावकऱ्यांनी शेततळ्यांची साथ निवडली. 

२०१४ पासून या गावात ८५ शेततळी निर्माण झाली आहेत. पावसाचे पाणी शेततळ्यात साठवून शेतकरी जिद्दीने हंगामी पिके घेत आहेत. काहींनी तर पेरूसारख्या फळबागांची लागवड केली. फूलशेती सुरू झाली. भाजीपाल्याची पिके शेतकरी घेत आहेत.
असंख्य अडचणी असूनही शेतकरी जिद्दीतून पुढे जात आहे. गावाचा हा लौकिक ‘सकाळ- ॲग्रोवन’च्या माध्यमातून वेळोवेळी राज्यभर पोचला. त्यामुळे गावाला भेटी देणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत चालली. 

यावर्षात तर जानेवारी महिन्यात विविध जिल्ह्यांतील शेकडोच्या संख्येने शेतकरी येऊलखेडच्या गाव-शिवारात भेटीसाठी येऊन गेले. एकट्या चंद्रपूर जिल्ह्यातून २०० पेक्षा अधिक शेतकरी भेट देऊन गेले. 

पोकरा प्रकल्पाचे संचालक गणेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी येऊलखेडला भेट देत शेतकऱ्यांसोबत चर्चा केली.

शेततळ्यांचा आदर्श
खारपाण पट्ट्यात एकीकडे शासकीय योजनांमधून शेततळ्याचे उद्दिष्ट पूर्ण होत नसल्याची वस्तुस्थिती असताना येऊलखेड येथील शेतकऱ्यांनी मात्र त्याविरुद्ध काम करून दाखवले. प्रत्येकाने शेततळे घेत पीकपद्धतीत बदल घडवून आणला. खारपाण पट्ट्यात पावसाच्या पाण्यावर आधारित संरक्षित शेती होऊ शकते हे दाखवून दिले. यातूनच पेरू, फूलशेती, भाजीपाल्याची पिके शेतकरी घेत आहेत. गावकऱ्यांनी ८५ शेततळे बांधले. या शेततळ्यांवरून सिंचन करण्यासाठी वीजपुरवठासुद्धा देण्यात आला आहे. यामुळे सिंचन केले जात आहे.


इतर बातम्या
राज्यात ३० टक्के दूध वापराविनापुणे: कोरोना विषाणुमुळे पसरलेल्या साथीनंतर सुरू...
औरंगाबाद : शेतकरी गटामार्फत ग्राहकांना...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
खामसवाडीतील फुल उत्पादकांना दररोज...खामसवाडी, जि. उस्मानाबाद : ऐन लग्नसराईत जरबेरा...
भंडाऱ्यात ‘बीटीबी’ भाजी बाजाराच्या...भंडारा ः ‘कोरोना’ विषाणूच्या विरोधातील शासनाच्या...
खानदेशात बाजार समित्यांमधील लिलाव...जळगाव ः खानदेशात कलिंगडाची शिवार खरेदी ठप्प...
नँचरल उद्योग समूह सुद्धा करणार...शिराढोण, जि. उस्मानाबाद ः अन्न व औषध प्रशासन तसेच...
नगर जिल्ह्यात पाचशे टन भाजीपाला...नगरः कोरोना संसर्गाच्या पाश्वभूमीवर लॉकडाऊनमुळे...
जगभरात कोरोनामुळे ३० हजार मृत्यूः...जिनिव्हा: जगभरात कोरोना विषाणूचे थैमान सुरुच...
अमरावतीत गरजूंना स्वयंसेवी संस्थांकडून...अमरावती  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सांगलीत खतांची दुकाने सुरू; पोलिसांची...सांगली : जिल्ह्यातील ग्रामीण भागात असणारे कृषी...
अकोल्यात पीककर्ज व्यवहारास ३१ मेपर्यंत...अकोला ः ‘कोरोना’ विषाणूच्या प्रादुर्भावाच्या...
कोल्हापूरात कृषी निविष्ठा केंद्रे दहा...कोल्हापूर : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा केंद्रे...
सोलापूर बाजार समितीतील विस्कळीतपणा कायमसोलापूर  ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत...
उपासमार होणार नाही याची काळजी घ्या ः...नांदेड ः ‘कोरोना’च्या परिस्थितीमुळे जिल्ह्यासह...
विदर्भात विजांसह पावसाची शक्यतापुणे : राज्यात सुरू असलेला पूर्वमोसमी पाऊस काहीशी...
परराज्यातील ४५० कामगारांची...सोलापूर : लॉकडाऊनमुळे अडचणीत आलेल्या परराज्यातील...
थेट विक्रीने सोडविला दराचा प्रश्‍नऔरंगाबाद: कोरोनामुळे शेतमाल विक्रीचा प्रश्न...
पुणे, मुंबईतील सोसायटीधारकांनी...पुणे ः शहरी भागातील हाउसिंग सोसायटी भागातील...
साताऱ्यात ६५ हजार लिटर दूध संकलनाअभावी...सातारा  : ‘कोरोना’च्या पार्श्‍वभूमीवर काही...
निघोजच्या शेतकऱ्याकडून थेट ग्राहकांना...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...