agriculture news in Marathi yougsters from surdi saves 13 dams Maharashtra | Agrowon

सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना फुटण्यापासून वाचवले

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020

‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात प्रथम आलेल्या सुर्डी (ता. बार्शी ) शेत -शिवारात गेल्या बुधवारी (ता.१४) अतिवृष्टी झाली. 

वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात प्रथम आलेल्या सुर्डी (ता. बार्शी ) शेत -शिवारात गेल्या बुधवारी (ता.१४) अतिवृष्टी झाली. त्यामुळे गावावर संकट ओढवले होते. दरम्यान, येथील तरुणांनी सलग पंधरा तासांचे श्रमदान करत तेरा पाझर तलाव फुटण्यापासून वाचवले. त्यांच्या या श्रमदानाच्या कामाचे कौतुक होत आहे.

यंदाच्या हंगामातील परतीच्या पावसाने बार्शी तालुक्यामध्ये रुद्र रूप धारण केले होता. १४ ऑक्टोबर रोजी दिवसभर झालेल्या अतिवृष्टीमुळे शहर आणि तालुक्यांमध्ये पाण्याने प्रचंड हाहाकार माजविला. या अतिवृष्टीमध्ये गावांतील १३ पाझर तलावांना धोका निर्माण झाला आणि पाण्याची गळती होऊ लागली. या सर्वच तलावांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त झाले होते. पाणी जास्त झाल्याने आणि सांडव्याचे मार्गही पूर्ण क्षमतेने वाहत असल्याने तलावाच्या भरावावरून पाणी ओव्हर फ्लो होण्यास सुरवात झाली होती.

प्रा. मधुकर डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील तरुण संतोष लोहार, बाबासाहेब डोईफोडे, अजित शेळके, विलास शेळके, केशव शेळके, अप्पा शेळके, रघुनाथ शेळके, आनंद कापसे, हिरोजी शेळके, बाजीराव शेळके, बालाजी शेळके, राहुल शेळके, महादेव शेळके आदींनी या सर्वच पाझर तलावांची गळती थांबवण्यात यश मिळवले.
 


इतर अॅग्रो विशेष
संशोधनवृत्तीला सातत्याची जोड शेतीउपयोगी...प्रत्येक माणसात एक संशोधक दडलेला असतो. अगदी खेळणी...
वीज जोडणी न देताच कृषीपंपाची लाखोंची...नांदेड : कुंडलवाडी (ता. बिलोली) येथील पाच...
कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरेल :...मुंबई : राज्य सरकारने लॉकडाऊनचे निर्बंध हटवले...
‘स्वाभिमानी’चा मोर्चा स्थगितसातारा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा कऱ्हाडला...
संत्रा पट्ट्यातून ‘किसान रेल’ सुसाटनागपूर : संत्रा वाहतुकीकरिता रेल्वेचा स्वस्त आणि...
संत्रा आंबिया बहाराला ४२ कोटींची भरपाईअमरावती : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या...
केळी उत्पादकांची लूट थांबवा, अन्यथा...गिरगाव, जि. हिंगोली : राज्यातील अन्य...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः बंगालच्या उपसागराच्या आग्नेय व नैऋत्य...
शेतकऱ्यांनी पकडले सोयाबीन चोरअमरावती : घराच्या अंगणात ठेवलेले ३१ पोते सोयाबीन...
शासकीय खरेदीला प्रारंभ; कापूस दरात...जळगाव ः खानदेशात शासकीय कापूस खरेदी सुरू होताच...
सहकारी संघाकडूनही गाईच्या दूधदरात कपात नगर ः लॉकडाउन झाल्यानंतर दुधाची मागणी कमी झाली...
पशुखाद्य दरात वाढसांगली ः अतिवृष्टीमुळे पशुखाद्य तयार होणाऱ्या...
दुग्ध व्यवसायातून अल्पभूधारक शेतकऱ्याची...वडिलोपार्जित पाच एकर शेतीमध्ये कुटुंबाचा...
पशुपालनाने दिली आर्थिक प्रगतीला साथकोळन्हावी (ता. यावल, जि. जळगाव) येथील देवानंद...
तोतया व्यापाऱ्यांकडून कांदा उत्पादकांची...नाशिक : सध्या मागणीच्या तुलनेत सध्या कांद्याची...
गांडूळ खताने घातले उत्पन्नवाढीस खतपाणीसासवड, जि. पुणे ः वीटभट्टीच्या धंद्यात उधारी...
नियमित कर्जफेड करणारे शेतकरी...कोल्हापूर ः जिल्ह्यातील एक लाख ९७ हजार नियमित...
ग्रामीण भागात नऊ लाख घरे बांधणार ः हसन...मुंबई : राज्यात सध्या अपूर्ण असलेली घरकुले तसेच...
विदर्भाच्या काही भागांत थंडीपुणे ः राज्यातील अनेक भागांत हवामान कोरडे झाले...
कारखाने भाडेतत्त्वावर देणाऱ्या समितीत...पुणे : आजारी साखर कारखाने व त्यांच्या अब्जावधी...