agriculture news in marathi young entrepreneur who exports sorghum biscuits to United States | Agrowon

ज्वारीची बिस्किटे अमेरिकेत पाठविणारा युवा उद्योजक

अमोल कुटे
शनिवार, 14 मार्च 2020

बारामती येथील महेश साळुंके यांनी बेकरी, केक व केटरिंग असे तीन व्यवसाय जिद्दीने उभारून वार्षिक उलाढाल ४० कोटी रुपयांपर्यंत पोचवली आहे. शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील महेश यांनी उद्यमशीलता, जोखीम, खडतर कष्ट व काळाचा वेध घेऊन तंत्रज्ञान वापरण्याचे कौशल्य यातून उद्योजकाची वाटचाल सक्षम केली आहे. त्यांच्या ज्वारीच्या बिस्किटांची निर्यात अमेरिकेस होऊ लागली आहे.

बारामती येथील महेश साळुंके यांनी बेकरी, केक व केटरिंग असे तीन व्यवसाय जिद्दीने उभारून वार्षिक उलाढाल ४० कोटी रुपयांपर्यंत पोचवली आहे. शेतमजुरी करणाऱ्या कुटुंबातील महेश यांनी उद्यमशीलता, जोखीम, खडतर कष्ट व काळाचा वेध घेऊन तंत्रज्ञान वापरण्याचे कौशल्य यातून उद्योजकाची वाटचाल सक्षम केली आहे. त्यांच्या ज्वारीच्या बिस्किटांची निर्यात अमेरिकेस होऊ लागली आहे.

महेश यांनी सातासमुद्रापार भरारी घेतली आहे. बेकरीच्या ज्वारीच्या बिस्किटांची अमेरिकेत विक्री सुरू झाली आहे. पंतप्रधान सुशिक्षित बेरोजगार योजनेतून २००३ साली एक लाख रुपये कर्ज घेऊन सुरू झालेल्या व्यवसायातून आज २० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला ‘ऐश्वर्या बेकरी’ ‘ऐश्वर्या अलाईड फुड्स’ आणि ‘डेझी डझन’ बेकरी साखळी हा प्रक्रिया उद्योग उभा राहिला आहे. बेकरीतून दररोज दोन टन उत्पादन घेतले जात असून, मध्यवर्ती स्वयंपाक घरातून सात हजार जणांना जेवण पुरविले जाते.

पुणे जिल्ह्यात बारामती-रुई येथील महेश साळुंके यांचा शेतमजूर कुटुंबातील तरुण ते यशस्वी अन्नप्रक्रिया उद्योजक हा प्रवास थक्क करणारा आहे. कुटुंबाची बारा एकर शेती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) प्रकल्पासाठी संपादित झाली. त्यामुळे आई-वडिलांना शेतमजुरी करून गुजराण करावी लागली. मिळेल ते काम करत महेश यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतर खासगी कंपनीत काम तसेच सुरक्षा रक्षक म्हणूनही जबाबदारी पार पाडली.

एमआडीसीकडून प्रकल्पग्रस्तांना व्यवसायासाठी सवलतीच्या दरात एक गुंठा क्षेत्र देण्यात आले. त्यात २००३ मध्ये रसवंती व सरबतगृह सुरू केले. व्यापाऱ्यांच्या माध्यमातून येणारा ऊस खरेदी करून रसवंती गृह चालवण्यात यायचे. उन्हाळ्याचा काळ संपला की पावसाळा, हिवाळ्यात ते बंद असायचे. उर्वरीत काळात काय करायचे हा प्रश्न होता.

विद्यार्थांसाठी खानावळ

 • महेश यांनी बारामती येथील विद्या प्रतिष्ठान संस्थेच्या महाविद्यालयातून शिक्षण घेतले.
 • तेथे परराज्यातून येणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर खाद्यपदार्थ मिळण्याची विशेष सुविधा नव्हती. ही संधी साधून महेश यांनी खाणावळ (मेस) सुरू केली. परिसरात चांगली बेकरी सुरू करण्याची गरजही या दरम्यान महेश यांच्या लक्षात आली. जिल्हा रोजगार केंद्रातून माहिती घेत बेकरी उत्पादनाचे प्रशिक्षण घेतले.
 • रसवंतीगृहाच्या जागेवरच २००४ मध्ये छोटी ‘ऐश्वर्या बेकरी’ सुरू केली. यात खारी पॅटीस, बनपाव, क्रीम रोल, डेनेट, केक, पेस्ट्री आदी शहरांमध्ये मिळणारी उत्पादने उपलब्ध केली. त्यास अल्पावधीत पसंती मिळाली. बाजारपेठेची मागणी व ग्राहकांची नस ओळखत मग टप्प्याटप्प्याने व्यवसायाचा विस्तार केला.

महेश यांचा आजचा व्यवसाय

बेकरी चेन

 • 'ऐश्वर्या बेकरी’ नावाने बारामती, इंदापूर, अकलूज, नातेपुते, टेंभुर्णी, केडगाव, भवानीनगर, सोमश्‍वरनगर, माळेगाव अशी १७ आउटलेटस (काही फ्रॅंचायजी).

केक चेन

 • पुणे शहरातील उपनगरांत ‘डेझी डझन’ नावाने केक उत्पादनांची साखळी. सहा आउटलेटस’ (काही फ्रॅंचायजी).
 • मल्टिग्रेन तसेच साखरविरहित केक. उत्पादन युनिट वडगाव शेरी (पुणे).
  दररोज ५०० ते ६०० किलो उत्पादनांची निर्मिती
 • ग्राहकांच्या आवडी निवडी लक्षात घेऊन आरोग्यवर्धक, हायजेनिक वातावरणात निर्मिती. उत्पादनांत बदल, नवनवीन उत्पादनांची निर्मिती.

नावीन्यपूर्ण उत्पादने

 • शाकाहारी तसेच फळांवर आधारित, उपवासाचे, साखरमुक्त केक, पेस्ट्री, खारी, मैदा, गहू, विविध कडधान्यांपासून बनविलेले ब्रेड, गव्हाची ब्राऊन खारी, टोस्ट, बिस्किटे

ज्वारीची बिस्किटे

 • हे ‘श्रद्धा बेकरी’ नावाने वैशिष्ट्यपूर्ण उत्पादन आहे. ज्वारीत तूप, साखर घातल्यानंतर त्यांना बांधून ठेवण्याची समस्या होती. शिवाय ज्वारीचा स्वाद टिकून राहण्यासाठी अन्य घटक मिसळणे शक्य नव्हते. मग संंशोधन व विविध प्रयोग करून अखेर ज्वारीच्या बिस्किटाची रेसिपी तयार करण्यात यश आले. सहा महिन्यांपासून अमेरिकेत मध्यस्थांमार्फत दोन टनांपर्यंत बिस्किटांची निर्यात झाली आहेत.

अन्य बिस्किटे

 • बाजरी, नाचणी, विविध कडधान्यांची (मल्टीग्रेन) बिस्किटे
 • परदेशात ग्लूटेन फ्री संकल्पना व तशा उत्पादनांची मागणी लक्षात घेऊन ज्वारी किंवा गव्हाच्या कोंड्यांपासून बिस्किटे.

केटरिंग व्यवसाय

 • बारामती परिसरात औद्योगिक क्षेत्र वाढत असताना कंपन्यांची गरज लक्षात घेऊन केटरिंगचा व्यवसायही सुरू केला आहे.
 • ऐश्वर्या अलाईड फूडसच्या माध्यमातून दिवसासह नाईट शिफ्टमध्येही वेळेत जेवण पोचविण्यासाठी मध्यवर्ती स्वयंपाकघर (सेंट्रल किचन) उभारले आहे. आज सात हजार जणांना त्यातून शाकाहारी व मांसाहारी अन्न पुरवण्यात येते.
 • दररोज २० ते २२ हजार चपात्या बनविल्या जातात. लागणारा शेतमाल परिसरातील शेतकऱ्यांकडून खरेदी केला जातो. खरेदी केलेल्या २० एकर जमिनीतूनही भाजीपाला घेत त्याचा वापर होतो.

दुग्ध व्यवसाय

 • बेकरी आणि सेंट्रल किचनची दररोज साडेचारशे ते पाचशे लिटर दुधाची गरज होती. त्यातून ४० गायींचा गोठा उभारला आहे. १४ गीर व २६ संकरित गायी आहेत. अडीचशे लिटर दूध बेकरीसाठी वापरण्यात येते. उर्वरित दूध शेतकऱ्यांकडून घेण्यात येते.

ठळक बाबी

 • जर्मनी, चीन, नेदरलॅंड येथे भेटी. तेथील आधुनिक मशिनरी आणून वापर.
 • वडील हनुमंत, आई मालन, काका सुरेश साळुंके यांचे वेळोवेळी मार्गदर्शन.
 • पत्नी स्वाती, लहान भाऊ राहुल, वहिनी रेश्‍मा हेदेखील व्यवसायात कार्यरत.
 • संपूर्ण उद्योगात स्त्री-पुरुष मिळून ३६० जणांना रोजगार.
 • मजुरांवर दरमहा १६ लाख रुपये खर्च.
 • वार्षिक उलाढाल- ४० कोटी
 • वेळोवेळी बॅंकेकडून अर्थसाह्य घेत भांडवल गुंतवणूक

संपर्क- महेश साळुंके, ९८९०९०४००७


फोटो गॅलरी

इतर अॅग्रो विशेष
बारामतीमध्ये उद्यापासून कृषी तंत्रज्ञान...माळेगाव, बारामती ः अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्ट...
कृषी अधिकारी पुन्हा सर्वोच्च न्यायालयात...पुणे ः सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर...
दर वाढूनही नुकसानीमुळे डाळिंब...सांगली ः देशातील मृग हंगामातील डाळिंब उत्पादन...
दुधाचा अभ्यास करा : केंद्र सरकारपुणे : गोवंशापासून मिळणाऱ्या दुधाचे फायदे आणि इतर...
दहा हजार क्विंटल ज्वारीचा झाला भुस्साअकोला  ः  जिल्ह्यात २०१५ ते २०१७...
राज्यात विविध घटनांमध्ये वर्षभरात १७८...नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने...
‘सिल्क समग्र’ योजना सुरू ठेवण्यास...औरंगाबाद : तुती टसर रेशीम उद्योग विकासाठी...
ग्राम, शेती विकासाला ‘रोटरी’ची साथनाशिक शहरामध्ये ७५ वर्षांपासून रोटरी क्लब ऑफ...
फळबागेला प्रक्रिया उत्पादनांची जोडशेतीची आवड जोपासण्यासाठी कुटुंबाचे चांगले पाठबळ...
‘अपेडा’वरील नोंदणीत राज्याचा टक्का वाढलानागपूर ः निर्यातीला चालना मिळावी तसेच देशांतर्गत...
चिकन, अंडी खाण्यास पूर्णपणे सुरक्षित ः...पुणे ः पूर्णपणे उकडलेली अंडी आणि चिकन खाण्यासाठी...
कोल्हापूर : गुळाच्या दरात १५० रुपयांनी...कोल्हापूर : बाजार समितीत गेल्या आठ दिवसांमध्ये...
सिद्धरामेश्‍वर यात्रेत भाकणूक : यंदा...सोलापूर ः ग्रामदैवत सिद्धरामेश्‍वर महाराजांच्या...
‘एफपीओं’ना बळकट करण्याची गरज ः चढ्ढा पुणे ः शेतीमध्ये मातीपासून ते बाजारपेठेपर्यंत...
कर्मचाऱ्यांनी ‘क्रॉप डॉक्टर’ व्हावे :...पुणे: राज्यातील शेतकरी कष्टपूर्वक शेती करताना...
तुरीला मिळणार दराची ‘फोडणी’ पुणे ः देशात यंदा तूर उत्पादनात घटीचा अंदाज आहे....
कृषी कायद्यांवर ‘तारीख पे तारीख’ नवी दिल्ली ः शेतकरी नेते कृषी कायदे रद्द...
गोंदियात पारा ६.८ अंशांवर पुणे ः विदर्भाच्या अनेक भागांत थंडी चांगलीच वाढली...
मराठवाड्यातील रब्बीवर रोगांचे संकट लातूर : येथील विभागीय कृषी सहसंचालक...
खानदेशात कांदेबाग केळी जोमात जळगाव ः खानदेशात कांदेबाग केळीची लागवड सुमारे एक...