युवकांनो शेतमाल विक्रीचे नियोजन करा : डोंगरे

जालना : ‘‘शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन विकेल तेच पिकवावे. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून आर्थिक उन्नती साधावी. जिल्ह्यातील मोसंबीला देशात मोठी मागणी आहे. त्यासाठी युवकांनी पुढे येऊन विक्रीचे नियोजन करावे.’
 Young people plan to sell farm produce: Dongre
Young people plan to sell farm produce: Dongre

जालना : ‘‘शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन विकेल तेच पिकवावे. शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करून आर्थिक उन्नती साधावी. जिल्ह्यातील मोसंबीला देशात मोठी मागणी आहे. त्यासाठी युवकांनी पुढे येऊन विक्रीचे नियोजन करावे,’’ असा सल्ला हडप सावरगाव येथील आयडियल शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष भगवानराव डोंगरे यांनी दिला.

खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रात रविवारी (ता.९) ‘पीएम-किसान सन्मान निधी’ योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वितरण, तसेच रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. ‘केव्हिके’चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. व्ही. सोनुने, कृषी उपसंचालक विजय माईनकर, तालुका कृषी अधिकारी अजय सुखदेवे उपस्थित होते. 

माईनकर म्हणाले,‘‘ आपण पारंपरिक रानभाज्या विसरत चाललो आहोत. त्यांची ओळख निर्माण व्हावी म्हणून सर्व रानभाजीपाल्यांचे प्रदर्शन भरविण्यात आले. शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करावी, जेणेकरून भविष्यातील शेतीचे नियोजन एकत्रिक करता येईल.’’ 

डॉ. सोनुने म्हणाले,‘‘योजना सुरू होण्यापूर्वीच त्यांची शेतकऱ्यांना माहिती दिली जाते. शेतकऱ्यांनी शेतकरी उत्पादन कंपनीमार्फत कृषी व्यवसाय सुरू करावे. ग्रामीण भागात कृषी प्रक्रिया उद्योग सुरू करावे, जेणेकरून आत्मनिर्भर कृषी या बॅनरखाली आपल्याला तयार केलेला उत्पादित माल विक्री करता येईल.’’ 

लॉकडाउनने मार्केटिंग शिकविले

लॉकडाउनने मार्केटिंग शिकविल्याची भावना रानभाज्या महोत्सवात सहभागी शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. या महोत्सवात जवळपास ५६ शेतकऱ्यांनी भाग घेतला. चार टेबलवरून १५ प्रकारच्या राणभाज्यांची माहिती उपस्थितांना देण्यात आली.

बीड जिल्ह्यातही आयोजन

जागतिक आदिवासी दिवसाचे औचित्य साधत महाराष्ट्र शासन कृषी विभाग व ‘आत्मा’तर्फे जिल्ह्यात तालुकानिहाय जागतिक रानभाभ्या महोत्सवाचे आयोजित करण्यात आले. बीड शहरातील सामाजिक भवनातही या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद सदस्य अशोक लोढा यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक दत्तात्रय मुळे, उपविभागीय अधिकारी विष्णू मिसाळ, तालुका कृषी अधिकारी दिलीप जाधव, मंडळ कृषी अधिकारी आर. बी. मुनेश्वर आदी उपस्थित होते.  बीड परिसरातील उपलब्ध रानभाज्या एकत्रित करून त्या प्रदर्शनात मांडण्यात आल्या. रानभाज्यांची सविस्तर माहिती, त्यांचे औषधी गुणधर्म व करावयाच्या पाककृती या विषयी नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले. मुळे यांनी जीवनातील रानभाज्यांचे महत्त्व विषद केले. हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com