तरुणांनी शेतीला पूरक उद्योगाची जोड द्यावी ः ज्योत्स्ना शर्मा

तरुणांनी शेतीला पूरक उद्योगाची जोड द्यावी ः ज्योत्स्ना शर्मा
तरुणांनी शेतीला पूरक उद्योगाची जोड द्यावी ः ज्योत्स्ना शर्मा

सोलापूर ः ‘‘उद्योजकता प्रशिक्षणातून शेतीपूरक उद्योगासह लघुउद्योगांचे प्रशिक्षण घेऊन तरुण शेतकऱ्यांनी शेतीला उद्योगाची जोड द्यावी,’’ असे राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राच्या संचालक डॉ. ज्योत्स्ना शर्मा यांनी सांगितले.

सोलापुरातील कृषी विज्ञान केंद्रात आर्या प्रकल्प अंतर्गत ग्रामीण युवकांसाठी उद्योजकता विकास प्रशिक्षणाचे उद्‌घाटन डॉ. शर्मा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या.  जिल्हा परिषदेचे पशुधन विकास अधिकारी डॉ. एस. एस. बोरकर, राष्ट्रीय संशोधन प्रकल्पाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. जी. वाय. पार्लेकर, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. लालासाहेब तांबडे उपस्थित होते. या वेळी कृषी विज्ञान केंद्रातर्फे गांडूळखत निर्मिती, शेळीपालन, हरभरा बीजोत्पादन यावर मार्गदर्शन करण्यात आले.

डॉ. शर्मा म्हणाल्या, ‘‘निसर्गाच्या वेगवेगळ्या आपत्ती सातत्याने येत आहेत. त्यामुळे फक्त शेतीवर सगळे शक्‍य नाही. शेतीला जोड व्यवसाय हा आवश्‍यकच आहे. त्यात शेतीशी संबंधित व्यवसायातून चांगले अर्थार्जन होऊ शकते. कृषी विज्ञान केंद्राचा हा उपक्रम स्तुत्य आहे.’’

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात डॉ. तांबडे यांनी या उपक्रमामागील उद्देश सांगितला. समाधान जवळगे, विषय विशेषज्ज्ञ (पीक संरक्षण) यांनी गांडूळखताविषयी सविस्तर माहिती दिली. डॉ. पी. व्ही. कदम विषय विशेषज्ज्ञ (पशुवैद्यक शास्त्र यांनी शेळी पालनाविषयी माहिती दिली. तसेच अमोल शास्त्री, विषय विशेषज्ज्ञ (कृषिविद्या) यांनी हरभरा बीजोत्पादन करण्यासंबंधी तांत्रिक माहिती सांगितली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com