युवकांनी सोडविला जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न 

यवतमाळ ः कोरोनाच्या संचारबंदीमुळे हातावर पोट असणाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. मुक्‍या जनावरांची तर त्यापेक्षाही बिकट अवस्था आहे. अशा जनावरांप्रति भुतदयेचा जपत शहरातील चार तरुणांनी मोकाट जनावरांसाठी फिरता चारा डेपो सुरू केला आहे. त्यांच्या या उपक्रमशीलतेचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
The youth solved the problem of animal fodder

निलेश व मंगेश ठाकरे हे कंत्राटदार आहेत तर निलेश रापर्तीवार हे फॅशन बुटीकचा व्यवसाय करतात. सचिन मगरंदे हे जाजू कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. कोरोनामुळे शहरातील मोकाट जनावरांची आंबाळ होत त्यांचे हाल होत असल्याची बाब या चौघांच्या लक्षात आली. 

त्यांनी तत्काळ मोकाट जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्‍न सोडविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एका मालवाहू वाहनात हिरवा चारा भरून शहरातील मोकाट जनावरांना देण्यासाठी ते सरसावले. मोकाट जनावर दिसले की त्याला चारा दिला जातो. 

रोज चार क्‍विंटल (१६००) रुपयांचा चारा या माध्यमातून मोकाट जनावरांना दिला जात आहे. त्यासोबतच मोकाट कुत्र्यांना बिस्कटही देण्यावर त्यांचा भर आहे. उमरसरा, लोहारा, वडगाव, पिंपळगाव, भोसा, लोखंडीपूल या भागात त्यांचे हे कार्य सुरू आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com