agriculture news in Marathi yuva foundation helps women Maharashtra | Agrowon

‘त्या’ पस्तीस जणींचा ‘ते’ बनलेत आधार

राजकुमार चौगुले
रविवार, 8 मार्च 2020

पुरुषांपेक्षा ज्येष्ठ महिलांना आधाराची जास्त गरज असल्याचे आम्हाला जाणवले. ज्येष्ठ पुरुषांनाही आम्ही सेवा देत आहोत. ज्येष्ठ महिलांची काळजी घेणे हे खूप आव्हानात्मक आहे. आम्ही समाजातील विविध घटकांचा आधार घेऊन या महिलांना मानसिक आधार दिला, तसेच त्यांच्या खाण्यापिण्याची ही सोय केली. आता आम्ही कुरुंदवाड परिसरामध्ये हा उपक्रम राबवणार आहोत.
- अझर पटेल, अध्यक्ष, युवा फाउंडेशन, जयसिंगपूर, ९९७५३३३२५७

कोल्हापूर : ‘त्या’ पस्तीस जणींचा ''ते'' गेल्या चार वर्षांपासून आधार बनले आहेत. कुणी आजारी आहे, तर कुणाला नातेवाइकांनी सोडून दिले आहे, कोणी मानसिकदृष्ट्या खचलेला आहे, अशा सुमारे पस्तीस ज्येष्ठ महिलांना गेल्या चार वर्षांपासून दोन वेळचे जेवण, सकाळी चहा नास्ता, औषधोपचार घरपोच होतोय. जयसिंगपूरच्या युवा फाउंडेशनने हे व्रत स्वीकारले आहे. 

आपल्या संपर्काचा वापर करत फाउंडेशनने अत्यंत मेहनतीने या महिलांची जेवण, औषधांची सोय केली आहे. जयसिंगपूर व परिसरातील ग्रामीण भागातील या महिला आहेत. येत्या चार एप्रिलला या उपक्रमाला पाच वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने आता हा विस्तार कुरुंदवाड परिसरामध्ये ही करण्यात येणार आहे.

चार वर्षांपूर्वी युवा फाउंडेशनचे अझर पटेल व त्यांच्या काही मित्रांनी एकत्र येऊन ही संकल्पना राबवली. ज्या वृद्धांना खरोखरच खाण्या-पिण्याची भ्रांत आहे आणि ते समाजापासून दूर आहेत, त्यांची खाण्याची आबाळ होत आहे, अशा लोकांना विविध मित्रांच्या सहकार्याने शोधून त्यांना जेवण घरपोच करण्याचे ठरविले. हे काम तसे अवघडच होते. यातून आर्थिक पाठबळ कसे उपलब्ध करायचे हाही मोठा प्रश्न होता, पण सर्व मित्रांनी हे शिवधनुष्य पेलले.

समाजातील दानशूर व्यक्तींना उपक्रमाची माहिती करून दिली व त्यांनीही याला होकार दिला. शहरातील काही खानावळीवाल्यांशी संपर्क साधून त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली. पुरुषांपेक्षा जास्त महिलांची मोठी आबाळ होत असल्याचे लक्षात येताच कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने वयस्क, आजारी महिलांना जेवण देण्यासाठी धडपड सुरू केली.

सदस्यांनी व्यवसाय सांभाळून या महिलांना जेवण, नास्ता व औषधोपचार देण्यासाठी प्रयत्न केले. सध्या पुरुष व्यक्तींच्या तुलनेत महिलांची संख्या निम्याहून अधिक आहे. सर्वांची महिन्यातून एकदा आरोग्य तपासणीही केली जाते.


इतर महिला
वाढवा प्रतिकार क्षमतासध्या कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे....
मुलींना मिळाली जिल्हाधिकारी, पोलिस...बुलडाणा  ः राज्यात जागतिक महिला दिनानिमित्त...
सुनंदाताई भागवत बनल्यात शेकडो मुलींचा...नगर ः त्यांच्या घरची परिस्थिती सर्वसामान्य. मात्र...
राज्यातील चौदा टक्के शेतीक्षेत्राची ‘ती...पुणे: एकविसाव्या शतकात सर्वच क्षेत्रांत महिलांचा...
‘त्या’ पस्तीस जणींचा ‘ते’ बनलेत आधारकोल्हापूर : ‘त्या’ पस्तीस जणींचा ''ते'' गेल्या...
महिला बचत गटाच्या माध्यमातून शेती, पूरक...नांदेड ः जिल्ह्यातील महिला स्वंयसहाय्यता गटांच्या...
आहारातील अंड्याचे महत्त्व..मानवी आहारामध्ये हजारो वर्षांपासून अंड्यांचा...
बहुगुणी नारळपूजाअर्चा, सणवार, लग्नकार्य, बारसे, डोहाळेजेवण...
रानमेवा प्रक्रियेतून साधली आर्थिक प्रगतीकोल्हापूर जिल्ह्याच्या शाहूवाडी तालुक्यातील...
बचत गटांच्या उत्पादनांचा ‘रुरल मार्ट’परभणी ः महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत परभणी...
..ही आहेत दुधातील आरोग्यदायी खनिजेदुधामधून मिळणारे कॅल्शिअम हे हाडे व दात मजबूत...
आरोग्यदायी आले, सुंठ पावडरमहिलांना आले आणि सुंठ पावडर परिचित आहे. ओल्या...
आरोग्यदायी शेवगा पावडरलहान मुलांच्या हाडांची वाढ योग्य प्रमाणात...
महिला गटांमुळे मिळाली प्रगतीची दिशानांदेड जिल्ह्यातील सगरोळी (ता. बिलोली) येथील...
शेती, पूरक उद्योग अन् आरोग्याचा जागरशेतकरी आणि ग्रामीण महिलांच्या जीवनात आश्वासक बदल...
गुणकारी डाळिंबडाळिंब हे अत्यंत गुणकारी फळ असून भारतात सर्वत्र...
जमिनीची सुपीकता जपत पीक उत्पादनात...नाशिक जिल्ह्यातील कारसूळ (ता. निफाड) येथील संकिता...
थकवा, अशक्‍तपणावर शतावरी गुणकारीशतावरी ही औषधी वनस्पती सर्वांनाच सुपरिचित आहे....
फळबाग, भाजीपाला शेतीतून मिळविली आर्थिक...शेतीचा कोणताच अनुभव नसताना कुऱ्हा (ता. तिवसा, जि...
ग्रामीण महिलांच्या समृद्धीचा महामार्गराज्यातील महिला बचतगट वेगवेगळ्या लघूउद्योगाच्या...