बोंड अळी नियंत्रणासाठी युवाराष्ट्र संघटना राबवणार कार्यक्रम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  ः कपाशी पिकावरील बोंड अळीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी येथील युवाराष्ट्र संघटना विदर्भ, मराठवाड्यात धडक कार्यक्रम राबवणार अाहे. लवकरच याची सुरवात केली जाईल, अशी माहिती संघटनेतर्फे देण्यात अाली.

युवाराष्ट्र ही संघटना अकोला जिल्ह्यात कृषी, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण, महिला सक्षमीकरण या क्षेत्रांत स्थापनेपासून काम करीत अाहे. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात संघटनेने पाठबळ दिले. राज्यात गेल्या हंगामात कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. या अळीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी युवाराष्ट्र संघटना विदर्भ, मराठवाड्यातील कापूस उत्पादक पट्ट्यात मोहीम सुरू करीत अाहे. कापूस पिकाचे नुकसान टाळण्यासाठी या मोहिमेअंतर्गत शर्थीचे प्रयत्न करणार असल्याचे युवाराष्ट्रचे डॉ. नीलेश पाटील व विलास ताथोड यांनी सांगितले.

गेल्या हंगामात बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे कापूस उत्पादनात ४३ टक्के घट झाली होती. उत्पादनघटीमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसह शेतमजूर, जीनिंग, प्रेसिंग, गारमेंट्स व ट्रान्सपोर्ट आदी उद्योगांना व त्यावर अवलंबून असलेल्या कामगारांना मोठा फटका सहन करावा लागला. ‘युवाराष्ट्र’ आपल्या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यांत किमान दोन रथ, दहा तज्‍ज्ञांची टीम, प्रोजेक्टर्स, स्लाईड शो, एकात्मिक नियंत्रणासाठी मार्गदर्शक साहित्य व तज्ज्ञांचे मार्गदर्शन, ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावर कामगंध सापळ्यांची उपलब्धता, बोंड अळीचा प्रादुर्भाव, नुकसान पातळी, एकात्मिक नियोजन, कीटकनाशके याबाबत सविस्तर मार्गदर्शन करणार अाहे. ‘युवाराष्ट्र’ या उपक्रमाला लवकरच प्रारंभ करणार अाहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com