agriculture news in marathi, Zero pendency is the answer to the fears of citizens | Agrowon

नागरिकांच्या अनामिक भीतीवर झिरो पेंडन्सी हे उत्तर

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 डिसेंबर 2017

सोलापूर : शासकीय कार्यालयांबाबत सामान्य जनतेच्या मनात असलेली अनामिक भीती झिरो पेंडन्सीमुळे दूर होण्यास मदत होणार आहे. झिरो पेडन्सीमुळेच नागरिकांचे काम जलदगतीने होणार असल्याने प्रत्येक शासकीय कार्यालयाने हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा, असे प्रतिपादन पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी गर्व्हनन्स व्याख्यानमालेत बोलताना केले.  

सोलापूर : शासकीय कार्यालयांबाबत सामान्य जनतेच्या मनात असलेली अनामिक भीती झिरो पेंडन्सीमुळे दूर होण्यास मदत होणार आहे. झिरो पेडन्सीमुळेच नागरिकांचे काम जलदगतीने होणार असल्याने प्रत्येक शासकीय कार्यालयाने हा उपक्रम प्रभावीपणे राबवावा, असे प्रतिपादन पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी गर्व्हनन्स व्याख्यानमालेत बोलताना केले.  
अमृतवेल फाउंडेशन व अमृतवेल मीडिया ग्रुपच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पोलिस आयुक्त महादेव तांबडे, पोलिस अधीक्षक एस. वीरेश प्रभू, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, महापालिका आयुक्त अविनाश ढाकणे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, पोलिस उपायुक्त नामदेव चव्हाण, उपजिल्हाधिकारी रेश्‍मा माळी, अमृतवेलचे धमेंद्र पवार आदी उपस्थित होते.

विभागीय आयुक्त दळवी म्हणाले, "शासकीय कार्यालयात येणारा नागरिक काम होण्याच्या आशेने आलेला असतो, त्याच्या अर्जावर जलद व तातडीने काम होण्यासाठी सामान्य माणसाच्या मानसिकतेत जाऊन काम करण्याची गरज आहे. हे काम होण्यासाठी झिरो पेंडन्सी आणि डेली डिस्पोजल कार्यालयात प्रभावीपणे राबविणे गरजेचे आहे.

कार्यालयातील प्रत्येक पेंडन्सी स्वत:ची समजून कार्यालय प्रमुखाने काम करावे, यातून आपण लोकांना योग्य न्याय देऊ, झिरो पेंडन्सी राबविताना प्रथम कार्यालयातील प्रत्येक कागदाची प्रकरणांची निकषानुसार सहा गठ्ठे पद्धतीने ( Six Bundle) पद्धतीने विगतवारी लावणे आवश्‍यक आहे.

यामध्ये प्रलंबित प्रकरणे, प्रतीक्षाधीन प्रकरणे, अहवाल पाठविणे, शासन आदेश परिपत्रके, अभिलेख कक्षाकडे पाठवावयाची कागदपत्रे आणि डिस्पोजल अशा पद्धतीने विगतवारी करावी. अशा पध्दतीने शासकीय कार्यालयात काम झाल्यास सामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर हसू फुलेल व काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्याला काम केल्याचा आत्मीय आनंदही उपभोगता येईल.'''' प्रारंभी धमेंद्र पवार यांनी स्वागत केले व ई गर्व्हनन्स व्याख्यानमाला आयोजनाबाबतचा उद्देश सांगितला.


इतर बातम्या
मॉन्सून मंगळवारपर्यंत कोकणातील काही...पुणे : बंगालच्या उपसागरात तयार होत असलेले कमी...
शेतकरी उत्पादक कंपन्यांना प्रोत्साहन ...पुणे : राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांचे अनुदान...
सिंधुदुर्ग, रत्नागिरीतील पारंपरिक...सिंधुदुर्ग: सकस आणि पौष्टिक मानल्या जाणाऱ्या...
विद्यापीठाच्या कांदा बियाण्यांची विक्री...नाशिक : कोरोना प्रादूर्भावाच्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यतापुणे: निसर्ग चक्रीवादळ निवळल्यानंतर राज्याच्या...
फळपिक विम्यात शेतकऱ्यांना ५ टक्के वाटा...मुंबई: राज्यात पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक...
मॉन्सून गोव्याच्या उंबरठ्यावर दाखलपुणे: नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून) शनिवारी...
थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जाचा घोळ...पुणे: थकबाकीदार शेतकऱ्यांना नवे पीककर्ज देण्याचे...
फळपिक विमा योजना अखेर जाहीरपुणे : राज्यात हवामानावर आधारित पुनर्रचित फळपिक...
मराठवाड्यात बॅंकांकडून शेतकऱ्यांची...औरंगाबाद : मराठवाड्यात पूर्वमोसमी पाऊस बऱ्यापैकी...
पीककर्ज वाटपाचा पुरता फज्जापुणे ः मोसमी पाऊस महाराष्ट्राच्या उंबरठ्यावर दाखल...
कृषिमंत्र्यांच्या नाशिक जिल्ह्यातच पीक...नाशिक : मूग नक्षत्राच्या तोंडावर पेरणीयोग्य पाऊस...
जैविक किटकनाशकांद्वारे पर्यावरणाचे...परभणी : ‘‘शेतीत रासायनिक किटकनाशकांचा वापर मोठ्या...
मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांत ३६५ टॅंकर...औरंगाबाद : औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, बीड,...
परभणी जिल्ह्यातील शिल्लक कापसाची...परभणी : शासकीय खरेदी केंद्रांवर कापूस विक्रीसाठी...
सोलापूर जिल्ह्यात पीक कर्जवाटप अवघ्या...सोलापूर : यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पीक...
नगर जिल्ह्यात पीककर्ज वाटपात...नगर  ः खरीप हंगामासाठी पीककर्ज पुरवठ्याकडे...
सातारा जिल्हा बॅंकेकडून कर्ज व्याजदरात...सातारा  : `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु...
पीक कर्जासाठी पुणे जिल्ह्यातील...पुणे  ः कर्जमाफीच्या गोंधळामुळे...
भगूरमध्ये शेतकरी, भाजी विक्रेत्यांकडून...नाशिक : लॉकडाऊन दरम्यान शासनाने नियम घालून...