नवी दिल्ली : नाशिकमध्ये २२ जणांचे प्राण घेणाऱ्या ऑक्सिजन गळतीच्या दुर्घटनेमुळे संपूर्ण दे
ताज्या घडामोडी
खानदेशात तुरीच्या खरेदीला शून्य प्रतिसाद
जळगाव ः खानदेशात तूर खरेदीसाठी यंदा खरेदी केंद्रांची संख्या वाढविली. परंतु, तूर खरेदीला कुठेही प्रतिसाद मिळालेला नाही.
जळगाव ः खानदेशात तूर खरेदीसाठी यंदा खरेदी केंद्रांची संख्या वाढविली. परंतु, तूर खरेदीला कुठेही प्रतिसाद मिळालेला नाही. खानदेशातील २४ खरेदी केंद्रांमध्ये कुठेही खरेदी होऊ शकलेली नाही. कारण, बाजारात तुरीला हमीभावापेक्षा अधिक दर आहे. त्यामुळे शासकीय केंद्रात आवकच झाली नाही.
तूर विक्रीसंबंधी ९०० शेतकऱ्यांनी जळगाव जिल्ह्यात नोंदणी केली होती. १४ खरेदी केंद्र जळगाव जिल्ह्यात निश्चित केले होते. तर धुळे व नंदुरबारात मिळून १० केंद्र निश्चित केले होते. धुळे व नंदुरबारातही सुमारे ३०० शेतकऱ्यांची नोंदणी झाली होती. परंतु, तूर विक्रीसाठी कुणी शेतकरी खरेदी केंद्रात आला नाही.
तुरीचा हमीभाव सहा हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा आहे. तर बाजारातील दर किमान ६२००, साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल एवढा आहे. सुरवातीपासून तूर दर स्थिर असल्याने शासकीय खरेदीला प्रतिसाद मिळाला नाही, अशी माहिती मिळाली.
जळगावात पुढील आठवड्यात हरभरा खरेदी
जळगाव जिल्ह्यात हरभरा खरेदीसाठीदेखील १४ केंद्र निश्चित केले आहेत. हरभरा विक्रीसाठी शेतकऱ्यांची ऑनलाइन नोंदणी सुरू आहे. २६०० शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. परंतु खरेदी सुरू झालेली नाही. बाजारात देशी, देशी सुधारित वाणांच्या हरभऱ्याचे दर ४६०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. तर हमीभाव ५१०० रुपये प्रतिक्विंटल आहे. यामुळे हरभऱ्याची शासकीय खरेदीदेखील किती होईल, याबाबत प्रश्न आहे.
तुरीची कुठलीही शासकीय खरेदी जळगाव जिल्ह्यातील १४ केंद्रांमध्ये झाली नाही. कारण बाजारात हमीभावापेक्षा अधिकचे दर तुरीला मिळाले. हरभरा खरेदी पुढील आठवड्यात सुरू होऊ शकते.
- गजानन मगरे, पणन अधिकारी, मार्केटिंग फेडरेशन, जळगाव.
- 1 of 1100
- ››