Agriculture news in marathi Zilla Parishad 1.5 lakh employees will pay a day's salary | Agrowon

जिल्हा परिषदेचे दीड लाख कर्मचारी देणार एक दिवसांचे वेतन 

टीम अॅग्रोवन
रविवार, 29 मार्च 2020

नगर ः कोरोना संसर्गाबाबत उपाययोजना करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील सुमारे दीड लाख कर्मचारी राज्य शासनाला एक दिवसाचे वेतन देणार आहेत. यातून सरकारला सुमारे पंचवीस ते तीस कोटी रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक दिवसाचे वेतन कपात करावे, असे पत्र महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २७) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. 

नगर ः कोरोना संसर्गाबाबत उपाययोजना करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा परिषदेतील सुमारे दीड लाख कर्मचारी राज्य शासनाला एक दिवसाचे वेतन देणार आहेत. यातून सरकारला सुमारे पंचवीस ते तीस कोटी रुपये मिळणार आहेत. मुख्यमंत्री सहायता निधीसाठी एक दिवसाचे वेतन कपात करावे, असे पत्र महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या राज्य पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. २७) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे. 

कोरोना संसर्गाची बाधा वाढत चालली आहे. त्या पाश्वभूमीवर सध्या एकवीस दिवसांचा  लाॅकडाऊन सुरू आहे. मात्र, कोरोना संसर्गाची बाधा रोखण्यासाठी सरकार विविध उपाययोजना करत आहे, हातावर पोट असलेल्या लोकांसाठीही सरकार विविध योजना आखत आहे. राज्यावर आणि देशावर आलेल्या संकटकाळी मुख्यमंत्री सहायता निधीला पैशाची गरज आहे. त्यामुळे राज्यभरातील जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी (शिक्षक व ग्रामसेवक वगळून) एक दिवसाचे वेतन सरकारला दिले जाणार आहे.

राज्यात जिल्हा परिषदेचे सुमारे दीड लाख कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या एक दिवसाच्या दिवसाच्या वेतनातून सरकारला पंचवीस ते तीस कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे राज्याध्यक्ष बलराज मगर, बाबुराव पुजरवाड, विवेक लिंगराज, शरद भिडे, विजयसिंह सुर्यवंशी, सुदाम पांगुळ, सुभाष कराळे, अशोक जयसिंगपूरे, अरुण खरमाटे आदी राज्य पदाधिकाऱयांनी वेतन कपात करण्याबाबत पत्र दिले आहे. 

इतर कर्मचाऱ्यांना विमा सरंक्षण करा 
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयात, क्षेत्रीय, व आरोग्य कर्मचारी काम करतात. त्यांनाही पन्नास लाख रुपये विम्याचे संरक्षण द्यावे. जोपर्यंत हे लोक कोरोनाबाबत फिल्डवर काम करत आहेत. तोपर्यंत जोखीम किंवा प्रोत्साहन भत्ता किमान पंचवीस हजार रुपये  दरमहा मिळावा, अशी मागणी आज (शनिवारी) महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियने सरकारकडे केली आहे.  

अपत्तीच्या काळात मदत करणे ही प्रत्येकांची जबाबदारी आहे. जिल्हा परिषद कर्मचारी अशा वेळी सातत्याने मदतीचा हात देतात. एक दिवसाचे वेतन कपात करण्याबाबत शासनाला पत्र दिले आहे.
- बलराज मगर, राज्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी युनियन


इतर ताज्या घडामोडी
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे महावितरणचे...सोलापूर ः महावितरणच्या अकलूज, पंढरपूर व...
वळण योजना प्रकल्प पूर्ण करा : भुजबळनाशिक : ‘‘जिल्ह्यातील पाणी पश्चिमेकडे वाहून...
कृषीकन्येकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शनबदलापूर (जि.ठाणे) ः कृषी कार्यानुभव...
मालेगावात कांदा निर्यातबंदीच्या...मालेगाव, जि. नाशिक : गेल्या महिन्यात कांद्याला...
सोलापुरातील शेतकऱ्यांनो कृषी...सोलापूर : यंदाच्या वर्षासाठीची कृषी यांत्रिकीकरण...
जीवामृत निर्मितीचे प्रात्यक्षिकनशिराबाद, जि. बुलडाणाः येथील कृषीकन्या भाग्यश्री...
हिंगोलीतील सहा मंडळात अतिवृष्टीहिंगोली :जिल्ह्यात मंगळवारी (ता.२२) सकाळी...
द्राक्ष उत्पादकांची व्यापारी,...नाशिक : सुमारे ९५ टक्के द्राक्ष व्यापारी हे...
जळगाव जिल्ह्यात केळी उत्पादकांना विमा...जळगाव : शेतकरी प्रश्‍नी शरद जोशी प्रणित शेतकरी...
दुधना नदीला पूर, पिकांत पाणीच पाणीपरभणी : सेलू तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील निम्न...
उदगीरमधील ‘देवर्जन’ सात वर्षांनंतर भरलाउदगीर : देवर्जन (ता. उदगीर) येथील मध्यम...
बीड, लातूरमधील मंडळांत दमदार पाऊसऔरंगाबाद : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद,...
गिरणा पट्ट्यात पूर ओसरताच वाळूचा उपसा...जळगाव : गिरणा परीसरातील शेतकऱ्यांना पूर,...
सेस रद्द करा, अन्यथा बंद पुकारूपुणे ः केंद्र सरकारच्या कृषी आणि पणन विषयक तीन...
जळगावात बाजार समित्या बरखास्तीचे राजकारणजळगाव ः जिल्ह्यात दोन्ही काँग्रेस, शिवसेनेची...
शेतकऱ्यांसाठी सुखावणारा कायदा ः...कोल्हापूर ः शेती उत्पन्न व्यापार आणि वाणिज्य...
बुलडाण्यात दहा हजार हेक्टरवर क्षेत्र...बुलडाणा ः जिल्ह्यात शनिवार (ता. १९) व रविवारी (ता...
सिंधुदुर्ग जिल्ह्याला मुसळधार पावसाने...सिंधुदुर्ग ः जिल्ह्याच्या काही भागाला सोमवारी (ता...
अखेर ६६५ शेतकऱ्यांना विम्याचा लाभअकोला ः  सन २०१९ च्या खरीप हंगामात पंतप्रधान...
संत्रा वाहतुकीसाठी रेल्वेकडून वरूड...अमरावती : किसान रेल्वेच्या माध्यमातून येत्या...