Agriculture News in Marathi Zilla Parishad changes on extension | Agrowon

सांगली :जिल्हा परिषदेतील बदल लांबणीवर 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 28 ऑक्टोबर 2021

सांगली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचे राजीनामे लांबणीवर पडले आहेत. येत्या शुक्रवारी सर्वसाधारण सभा आहे. या सभेनंतर ते दिले जातील, असे सांगण्यात येत असले तरी संभ्रमाचे वातावरण आहे.

सांगली : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींचे राजीनामे लांबणीवर पडले आहेत. येत्या शुक्रवारी सर्वसाधारण सभा आहे. या सभेनंतर ते दिले जातील, असे सांगण्यात येत असले तरी संभ्रमाचे वातावरण आहे. दरम्यान बदलासाठी आग्रही गटाने खासदार संजय पाटील यांची भेट घेत नाराजी व्यक्त केली. त्यांनी दोन दिवस ‘वेट अँड वॉच’ अशा सूचना दिल्या आहेत. 

दरम्यान, बदल झाला नाही तर टोकाचा निर्णय घेण्याचे संकेत नाराज गटातील काही सदस्यांनी दिले आहेत. मिरज तालुक्यातील काही सदस्यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देण्यासाठीचे नमुनापत्र सोबत घेतले आहे. त्यामुळे राजीनामा नाट्यावरून जिल्हा परिषदेतील सत्ताधारी भाजपमध्ये दिवाळीआधी फटाके फुटण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. खासदारांच्या या भूमिकेबाबत भाजपमधील एक गटही नाराज आहे. 

जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींना राजीनामा द्यावा, असे पत्र काढले आहे. ते मंगळवारी (ता.२६) दुपारी त्यांना मिळाले. त्यावर कुणीही थेट प्रतिक्रिया दिली नाही. काही सदस्यांनी संबंधित पदाधिकाऱ्यांनी भेटून त्यांची मते जाणून घेतली. काहींनी सर्वसाधारण सभेपर्यंत थांबा, असे सांगितले तर काहींनी आमच्या काही कामांच्या निविदा अडकल्या आहेत, असे कारण दिले. त्यामुळे बदल होणार का आणि सर्वसाधारण सभेनंतर तरी राजीनामा नाट्य संपणार का, अशी शंका निर्माण झाली आहे. 
खासदार संजय पाटील म्हणाले, ‘‘जिल्हा परिषदेत बदल करण्याचा आदेश विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सूचनेनुसार दिला आहे. त्यामुळे कुणी त्याच्या विरोधात जाण्याची शक्यता नाही. सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे, यासाठी आम्ही आग्रही आहोत.’’ 

कोअर कमिटीची 
पुन्हा बैठक होणार 

जिल्हा परिषदेत घडत असलेल्या राजीनामा नाट्यावरून कोअर कमिटी नेत्यांमध्ये गोंधळ आहे. बैठकीत एक आणि बैठक संपल्यानंतर एक अशी भूमिका काही लोक घेत आहेत का, अशी शंका उपस्थित केली जात आहे. त्यामुळे कोअर कमिटीची पुन्हा बैठक घेऊन आमने-सामने सोक्षमोक्ष लावण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.


इतर बातम्या
22 तारखेला कुठे होणार पाऊस?20 तारखेला दिवसभर राज्यातले हवामान कोरडे...
पंजाबात मोहरीच्या क्षेत्रात वाढ, मात्र...वृत्तसेवा - पंजाबमध्ये मोहरीची लागवड ३३ हजार...
लाळ्या खुरकूत साथीमुळे मलिग्रेत चार...आजरा, जि कोल्हापूर ः मलिग्रे पंचक्रोशीत लाळ्या...
वारणा साखर कारखान्याची निवडणूक...वारणानगर जि. कोल्हापूर : येथील श्री. तात्यासाहेब...
संपादित जमिनीला वाढीव मोबदला द्या अकोला : जिल्ह्यातील पारस येथील औष्णिक विद्युत...
ज्युनिअर आर. आर पाटलांनी कवठेमहांकाळचं...सांगली - संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेल्या...
गडचिरोलीचे हत्ती गुजरातला नेण्याचा घाटगडचिरोली : जिल्ह्यातील सिरोंचा वनविभागातील अहेरी...
उन्हाचा चटका वाढला, गारठा ओसरला पुणे : राज्यात उन्हाचा चटका वाढू लागला असल्याने...
साखर कारखान्यांच्या माल तारण  कर्जावरील...कोल्हापूर : साखर कारखान्यांच्या माल तारण...
खते मुबलक; पण किंमत जादा पुणे : राज्यात रब्बी हंगामात रासायनिक खतांची...
ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील...कोल्हापूर ः ज्येष्ठ पुरोगामी विचारवंत, माजी...
खानदेशात कांदा पिकाची दहा हजार हेक्टरवर...जळगाव ः खानदेशात कांदा पिकाची लागवड सुरूच आहे....
कांदाच बनला टुमदार बंगल्याची ओळख नाशिक ः  या नभाने या भुईला दान...
ईश्‍वेद समूहाच्या टिश्‍युकल्चर ...अकोला : सिंदखेडराजा येथील ईश्‍वेद बायोटेक टिश्‍...
कापूस आयात शुल्क  रद्दच्या विषयावरील...जळगाव ः कापसावरील आयात शुल्क रद्द करण्यासह वायदा...
नाशिकच्या स्टार्टअपचा राष्ट्रीय पातळीवर...नाशिक : केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष...
तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांची  खुल्या...अमरावती : सोयाबीन व कापसानंतर खरीप हंगामातील...
‘गिरणा’चे वस्त्रहरण करणाऱ्यांवर कारवाई...चाळीसगाव, जि. जळगाव ः जळगाव जिल्ह्याची जीवनवाहिनी...
चांदवडमध्ये कांदा लिलाव सुरूनाशिक : अकरा जानेवारीपासून सोमवार (ता. १७) पर्यंत...
पुणे विभागात रब्बीतील कांदा लागवडीत वाढपुणे : आगामी काळात कांद्याला चांगले दर...