Agriculture news in marathi Zilla Parishad will set up a hospital for rural patients | Agrowon

ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद उभारणार रुग्णालय 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 20 एप्रिल 2021

शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे सोलापुरातील नेहरू वसतिगृहात स्वतंत्र कोविड हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे

सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये बेड शिल्लक नसल्याने ग्रामीण भागातील रुग्णांची गैरसोय होत आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेतर्फे सोलापुरातील नेहरू वसतिगृहात स्वतंत्र कोविड हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. 

ग्रामीण भागातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचसोबत मृतांची संख्या वाढत असून, पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूक झाल्याने आता त्या भागामध्ये बाधित रुग्ण वाढण्याचा धोका आहे. जिल्ह्यात माढा, मंगळवेढा, सांगोला, बार्शी तालुक्यात बाधितांची संख्या मोठी आहे. मृतांची संख्या वाढत असल्याने तातडीने अद्ययावत उपचारांची गरज आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेने ग्रामीण भागामध्ये 800 खाटांचे स्वतंत्र कोविड केअर उभारण्याची तयारी सुरू केली आहे. त्याचबरोबर शहरामध्ये स्वतंत्र कोविड हॉस्पिटल उभारण्याची संकल्पना मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांची आहे. 

अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी त्यास संमती दिली असून, प्रशासकीय यंत्रणांतर्फे नियोजन सुरू करण्यात आले. जिल्हा परिषदेची स्वतंत्र आरोग्य यंत्रणा आहे. पण ग्रामीण भागात कोरोनासाठी नगरपालिका, ग्रामीण रुग्णालय वगळता स्वतंत्र आरोग्य सेवा नाही. त्यामुळे जिल्हा परिषद आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आहे. ग्रामीण भागातून शहरात उपचारांसाठी रुग्णांना दाखल करण्याचे प्रमाण जास्त आहे. सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना उपचार न मिळाल्यास त्यांचे हाल होऊ नये, मृत्युदर कमी व्हावा, या उद्देशाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर तथा पार्क चौकातील जिल्हा परिषदेच्या नेहरू हॉटेस्टलच्या इमारतीमध्ये कोविड रुग्णालय सुरू करण्यात येईल. त्या ठिकाणी 50 स्वतंत्र खोल्या, स्वच्छतागृह, पाण्याची सोय आहे, तसेच मध्यवर्ती ठिकाण असल्याने रुग्णांची चांगली सोय होणार असल्याचे सांगण्यात आले. 


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...