सोलापूर जिल्हा परिषदेच्या ‘सेस फंडा`चा खर्च २६ टक्क्यांवर

मागील वर्षीची तुलनेत यंदा चांगला खर्च झाला आहे. जिल्हा परिषद सेस फंडाचा निधी पूर्णपणे खर्च करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. मार्चअखेर सगळा निधी खर्च होईल. - विजयराज डोंगरे, सभापती, अर्थ व बांधकाम
जिल्हा परिषदेच्या ‘सेस फंडा`चा खर्च २६ टक्क्यांवर
जिल्हा परिषदेच्या ‘सेस फंडा`चा खर्च २६ टक्क्यांवर

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या सेस फंडाच्या खर्चात ग्रामीण पाणीपुरवठा, लघु पाटबंधारे व बांधकाम विभागाने जोरदार मुसंडी मारली आहे. या विभागाने केलेल्या खर्चामुळे नोव्हेंबरअखेर एकूण सेस फंडाचा खर्च २६.७१ टक्के इतका झाला.

जिल्हा परिषदेच्या अर्थ समितीची बैठक गुरूवारी (ता. ६) सभापती विजयराज डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. श्रीमंत थोरात, समता गावडे, अंजनादेवी पाटील, रोहिणी मोरे, तानाजी खताळ यावेळी उपस्थित होते.

बैठकीत खर्चाचा आढावा घेण्यात आला. बांधकाम विभागाचा ३५.०७ टक्के, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचा ८०.८६ टक्के, लघु पाटबंधारे विभागाचा ३६.२८ टक्के इतका खर्च आहे. ग्रामपंचायत विभागाचा खर्च केवळ दोन टक्के झाला. याबरोबरच शिक्षण विभागाचा २.१५ टक्के, आरोग्य विभागाचा १८.७९ टक्के, पशुसंवर्धन विभागाचा २६.८२ टक्के, समाजकल्याण विभागाचा ३१.२४ टक्के, महिला व बालकल्याण विभागाचा १२.४२ टक्के खर्च झाला.

कृषी विभाग अद्यापही शून्यातच सेस फंडाचा निधी अनेक विभागांनी खर्चाला सुरवात केली आहे. मात्र, दुष्काळाच्या स्थितीतही कृषी विभागात निधी खर्चाचा दुष्काळ पडल्याचे दिसून येते. या विभागाचा सेस फंडाचा खर्च केवळ ०.६८ टक्के इतका झाल्याचे वित्त विभागाने दिलेल्या आकडेवारीतून स्पष्ट होते. सभापती मल्लिकार्जुन पाटील यांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना दुष्काळातून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com