जिल्हा परिषद शेतकरी अभ्यास दौऱ्यासाठी मदत करणार : विश्वास देवकाते

कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते

पुणे  : परंपरागत तंत्रज्ञानाचा वापर करून त्यास आधुनिकतेची जोड दिल्यास शेती नक्कीच फायदेशीर होते. शेतीस व्यवसायाचे स्वरूप देणे काळाची गरज आहे, असे मत जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास देवकाते यांनी केले. सेंद्रिय शेतीकडे वळण्याबरोबरच देशात ज्या ठिकाणी चांगले तंत्रज्ञान अवलंबले जाते, ते पाहण्यासाठी शेतकरी अभ्यास दौऱ्यांचे आयोजन करावे, जिल्हा परिषदेमार्फत या दौऱ्यासाठी मदत केली जाईल, अशी घोषणाही देवकाते यांनी केली.   

माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक जयंतीनिमित्त सोमवारी (ता. १) जिल्हा परिषदेत कृषी दिनाचे आयोजन करण्यात आले होते, त्या वेळी देवकाते बोलत होते. कृषी दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद, कृषी विभाग व आत्मा यांच्यावतीने कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यात शासनाच्या व जिल्हा परिषद योजनांचे माहितीपत्रक व शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला, कडधान्य, फुले, फळे यांचे नमुने ठेवण्यात आले होते. विस्तार व शिक्षण संचालक डॉ. हरिहर कौसाडीकर, कृषी व पशुसंवर्धन सभापती सुजाता पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, हवेली पंचायत समिती सभापती हेमलता काळोखे, कृषी अधीक्षक दादासाहेब सप्रे, सदस्य पांडुरंग पवार, शोभा कदम, बाबुराव वायकर आदी उपस्थित होते.

सुजाता पवार म्हणाल्या, की २०१८-१९ मध्ये जिल्हा परिषद, पुणे कृषी विभागामार्फत ९१८३ लाभार्थ्यांना ८.२९ कोटी अनुदान डीबीटीव्दारे देण्यात आले आहे. तसेच चालू वर्षी कृषी विभागासाठी एकूण १२ कोटींची भरीव तरतूद कृषी विभागास केली आहे. यावर्षी शारदा शेतकरी माता अर्थसहाय्य योजना नव्याने सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान शेती क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेले शेतकरी व शेतकरी गटांना अध्यक्षांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. कृषी विकास अधिकारी अनिल देशमुख यांनी आभार मानले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com