नागपूर ः रंगीत कापसाच्या उत्पादनाचे स्वप्न संशोधन संस्थांकडून रंगविण्यात आले असले, तरी सं
अॅग्रो विशेष
नागपूर जिल्हा परिषद बांधणार शेतकऱ्यांसाठी मॉल
शेतकऱ्यांच्या मालाला शहरात बाजारपेठ उपलब्ध करून करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद करणार आहे.
नागपूर : शेतकऱ्यांच्या मालाला शहरात बाजारपेठ उपलब्ध करून करण्याचा प्रयत्न जिल्हा परिषद करणार आहे. यासाठी साई मंदिर जवळील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेवर मॉल उभारण्यात येणार असल्याची माहिती उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांनी दिली.
मनोहरा कुंभारेंच्या अध्यक्षतेखाली बांधकाम समितीची बैठक पार पडली. या सभेत सदर विषयावर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये जिल्हा परिषद मालकी हक्काच्या असलेल्या बडकस चौक येथील जागेवर ग्रामीण भागातील महिला बचत गटाकरिता मॉल उभारण्याचे नियोजित आहे. वर्ष २०१६ मध्ये सदर मॉलकरिता २५ कोटी खर्च अपेक्षित होते. त्यास शासनाकडून मंजुरी मिळाली. परंतु आता दरवाढीमुळे खर्चही वाढणार आहे. त्यामुळे हा वाढीव खर्च डीपीडीसीच्या माध्यमातून मागणार असून, तसा प्रस्तावही सादर करण्यात येणार असल्याचे कुंभारेंनी सांगितले.
याशिवाय वर्धा साई मंदिर मागील जिल्हा परिषदेच्या जागेवर शेतकरी बचत गटांकरिता मॉल बांधण्यात येणार आहे. तेथे फळे, भाजीपाला आदी साहित्य शेतकरी बचत गटांच्या माध्यमातून विक्री होईल. त्याकरिता आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले. सरपंच भवन येथील लॉनचे काम मंगळवार (ता.२६) पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.