Agriculture news in marathi ZP will take up the search for places in rural areas | Agrowon

सोलापूर झेडपी घेणार ग्रामीण भागातील जागांचा शोध

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 जानेवारी 2021

ग्रामीण भागातील अनेक गावांत जिल्हा परिषदेच्या जागांचा शोध घेऊन या मालमत्तेचा उपयोग जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

सोलापूर : ग्रामीण भागातील अनेक गावांत जिल्हा परिषदेच्या जागांचा शोध घेऊन या मालमत्तेचा उपयोग जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.

जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेचा शोध घेण्याची मोहीम जिल्हा परिषद प्रशासनाकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. आतापर्यंत या मोहिमेत सुमारे साडेपाच हजारांपेक्षा जास्त मालमत्तांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्या शिवाय तहसील कार्यालयात असणाऱ्या फेरफार नोंदी तपासून जिल्हा परिषदेच्या जागांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार या जागांचा विकास प्रक्रियेत समावेश करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेकडून करण्यात येत आहे.

जिल्हा परिषदेच्या जागा खासगी संस्थांना देण्यात आल्याच्या तक्रारी आल्या आहेत. काही जागांवर खासगी अतिक्रमणही असल्याच्या तक्रारी येत असल्याने या जागांबाबतही विशेष मोहीम राबवून या जागा ताब्यात घेण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना व्यवसायाची संधी मिळेल, बचत गटांना व्यवसायाकरिता आवश्यक पाठबळ मिळेल या दृष्टीने उपाययोजना करण्याचा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे स्वामी म्हणाले.

...असा होणार फायदा
  सुमारे साडेपाच हजारांपेक्षा जास्त मालमत्तांची माहिती संकलित
  जिल्हा परिषदेची मालमत्ता निश्चित, सुरक्षित होणार
  मालमत्तांवर झालेली अतिक्रमणे काढली जाणार
  मालमत्तांचा विकास प्रक्रियेत समावेश करण्यात येणार
  जिल्हा परिषदेच्या महसूल वाढीला मिळणार चालना


इतर ताज्या घडामोडी
नव्या कृषी तंत्रज्ञानाचा शेतकऱ्यांना...नाशिक : श्री स्वामी समर्थ केंद्राच्या वतीने सुरू...
येवल्यात ४६ हजार ग्राहकांकडे २६६ कोटी...येवला, जि. नाशिक : तालुक्यातील कृषिपंप धारकांची...
हवामान बदलाचा आंब्यावरील परिणाम...रत्नागिरी ः वातावरणातील चढ-उताराचे आंबा पिकावर...
परभणीत तूर विक्रीसाठी ६ हजार...परभणी ः आधारभूत किंमत योजनेअंतर्गत तूर विक्रीसाठी...
आम्हाला सोडून गेले, ते पराभूत झाले :...नगर : राज्य विधानसभेत मी १९८० साली ५६ आमदारांचा...
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या...नागपूर ः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून...
पी. आर. पाटील साखर संघाचे पुढील अध्यक्ष... कुरळप, जि. सांगली :  सहकार क्षेत्रातील...
निळेली पशुधन संशोधन केंद्रास वंश...सिंधुदुर्गनगरी ः कोकण कन्याळ या शेळी जातीच्या...
सिंधुदुर्गमध्ये बांधले साडेपाच हजार...सिंधुदुर्गनगरी : जिल्ह्यात भासणाऱ्या संभाव्य...
अमरावतीत शेतकऱ्यांवर ४३ कोटींच्या...अमरावती : हंगामात बॅंकांकडून पीककर्जाच्या बाबतीत...
भंडाऱ्यात ८९५ शेतकऱ्यांचे सूक्ष्म...भंडारा : सूक्ष्म सिंचनाला जिल्ह्यात शेतकऱ्यांचा...
छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान खरेदीरायपूर : : छत्तीसगडमध्ये आजवरची सर्वाधिक धान...
‘किसान गणतंत्र परेड’ शांततेतच होणार नवी दिल्ली : दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनाचा एक...
नक्षत्रांचे गणित चुकू लागलेगावातील वयोवृद्ध माणसे हाताच्या बोटांवर गणिते करत...
पुण्यात सर्वच भाजीपाल्यांचे दर स्थिरपुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
हवामान बदलाला अनुरूप पीक पद्धतीची गरजजागतिक पातळीवर विविध मार्गांनी हवेमधील कार्बन...
कृषी कायद्यांविरोधात शेतकरी विधवांचा...यवतमाळ : केंद्र सरकारच्या नव्या कायद्यांमुळे...
नांदेड जिल्ह्यात दोन लाख ७० हजार...नांदेड : जिल्ह्यात रब्बीमध्ये दोन लाख सत्तर हजार...
पावणेतीन हजार कोटींची कामे मंजूर ः...नांदेड : ‘‘कारोना संसर्गाच्या काळात विकास...
खानदेशातील प्रकल्पांत ५८ टक्के पाणीजळगाव ः खानदेशातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये...