नवी दिल्ली ः दिल्लीच्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात मागील ५६ दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या
बातम्या
सोलापूर झेडपी घेणार ग्रामीण भागातील जागांचा शोध
ग्रामीण भागातील अनेक गावांत जिल्हा परिषदेच्या जागांचा शोध घेऊन या मालमत्तेचा उपयोग जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
सोलापूर : ग्रामीण भागातील अनेक गावांत जिल्हा परिषदेच्या जागांचा शोध घेऊन या मालमत्तेचा उपयोग जिल्हा परिषदेच्या उत्पन्न वाढीसाठी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेचा शोध घेण्याची मोहीम जिल्हा परिषद प्रशासनाकडून गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. आतापर्यंत या मोहिमेत सुमारे साडेपाच हजारांपेक्षा जास्त मालमत्तांची माहिती संकलित करण्यात आली आहे. त्या शिवाय तहसील कार्यालयात असणाऱ्या फेरफार नोंदी तपासून जिल्हा परिषदेच्या जागांचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार या जागांचा विकास प्रक्रियेत समावेश करण्याचे नियोजन जिल्हा परिषदेकडून करण्यात येत आहे.
जिल्हा परिषदेच्या जागा खासगी संस्थांना देण्यात आल्याच्या तक्रारी आल्या आहेत. काही जागांवर खासगी अतिक्रमणही असल्याच्या तक्रारी येत असल्याने या जागांबाबतही विशेष मोहीम राबवून या जागा ताब्यात घेण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविण्याबरोबरच ग्रामीण भागातील बेरोजगार तरुणांना व्यवसायाची संधी मिळेल, बचत गटांना व्यवसायाकरिता आवश्यक पाठबळ मिळेल या दृष्टीने उपाययोजना करण्याचा जिल्हा परिषदेच्या प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे स्वामी म्हणाले.
...असा होणार फायदा
सुमारे साडेपाच हजारांपेक्षा जास्त मालमत्तांची माहिती संकलित
जिल्हा परिषदेची मालमत्ता निश्चित, सुरक्षित होणार
मालमत्तांवर झालेली अतिक्रमणे काढली जाणार
मालमत्तांचा विकास प्रक्रियेत समावेश करण्यात येणार
जिल्हा परिषदेच्या महसूल वाढीला मिळणार चालना
- 1 of 1498
- ››