गाजर गवत निर्मूलनासाठी झायगोग्रामा भुंगे उपलब्‍ध

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातर्फे गाजर गवताचे जैविक निर्मूलन सप्ताहास शनिवारी (ता. १५) कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते झायगोग्रामा भुंगे गाजर गवतावर सोडून सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.
Zygogramma beetle available for carrot weed eradication
Zygogramma beetle available for carrot weed eradication

परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परोपजीवी कीटक संशोधन योजना आणि कृषी कीटकशास्त्र विभाग यांच्यातर्फे गाजर गवताचे जैविक निर्मूलन सप्ताहास शनिवारी (ता. १५) कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांच्या हस्ते झायगोग्रामा भुंगे गाजर गवतावर सोडून सप्ताहाची सुरुवात करण्यात आली.

संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, शिक्षण संचालक डॉ. धर्मराज गोखले, कुलसचिव रणजीत पाटील, प्राचार्य डॉ. सय्यद इस्माईल, प्राचार्य डॉ. उदय खोडके, प्राचार्या डॉ. जयश्री झेंड आदी उपस्थित होते.

यावेळी कृषी कीटकशास्त्रज्ञ डॉ. ढवण म्‍हणाले, झायगोग्रामा भुंग्याद्वारे पर्यावरणाचे कोणतेही नुकसान न करता गाजर गवताचे समूळपणे नायनाट करू शकतो. या भुंग्याची संख्या नैसर्गिकरीत्या वर्षानुवर्षे वाढत राहते. विद्यापीठात उपलब्‍ध झायगोग्रामा भुंगे शेतकऱ्यांनी नेऊन शेतात तसेच परिसरात सोडावेत. डॉ. पुरुषोत्तम नेहरकर, डॉ. पुरुषोत्तम झंवर, डॉ. धिरजकुमार कदम, डॉ. मिलिंद सोनकांबळे, डॉ. अनंत बडगुजर, परोपजीवी कीटक संशोधन योजनेच्या प्रभारी अधिकारी डॉ. श्रद्धा धुरगुडे, गणेश खरात, अनुराग खंदारे, डॉ. संजोग बोकन, डॉ. राजरत्न खंदारे आदींची उपस्थिती होती.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील परभणी येथील प्रयोगशाळेत या भुंग्याचे मोठ्या प्रमाणावर गुणन केले जाते. शेतकऱ्यांना नाममात्र दरात ते उपलब्ध करून देण्याचे काम मागील बऱ्याच वर्षांपासून सुरू आहे.शेतकऱ्यांचा हे भुंगे खरेदीस दरवर्षी मोठा प्रतिसाद मिळतो. मराठवाड्यासोबतच विदर्भ, पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकरी ही ह्या भुग्यांसाठी मागणी करतात. शेतकऱ्यांनी विद्यापीठातून घेऊन त्यांच्या भागात सोडलेले भुंगे सध्या बऱ्याच भागात स्थिरावलेले दिसतात, अशी माहिती प्रभारी अधिकारी डॉ. धुरगुडे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com