agriculture news in Marathi,127 percent above normal rain in October , Maharashtra | Agrowon

ऑक्टोबरमध्ये सरासरीपेक्षा १२७ टक्के अधिक पाऊस

टीम अॅग्रोवन
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात राज्यात यंदा दमदार पावसाची नोंद झाली. अखेरच्या टप्प्यात मॉन्सूनने आणि परतल्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसाने राज्याला चांगलाच दणका दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यात १६१.६ मिलिमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा १२७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह कमी कालावधीत पडणारा अधिक पाऊस हे ऑक्टोबर महिन्याच्या पावसाचे वैशिष्ट्य ठरले आहे.

पुणे : नैॡत्य मोसमी वाऱ्यांच्या (मॉन्सून) हंगामात राज्यात यंदा दमदार पावसाची नोंद झाली. अखेरच्या टप्प्यात मॉन्सूनने आणि परतल्यानंतर मॉन्सूनोत्तर पावसाने राज्याला चांगलाच दणका दिला आहे. ऑक्टोबर महिन्यात राज्यात १६१.६ मिलिमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा १२७ टक्के अधिक पावसाची नोंद झाली आहे. वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह कमी कालावधीत पडणारा अधिक पाऊस हे ऑक्टोबर महिन्याच्या पावसाचे वैशिष्ट्य ठरले आहे.

यंदा मॉन्सून हंगाम विविध वैशिष्ट्यांनी गाजला. केरळात आठवडाभर आगमन लांबले. महाराष्ट्रात १९७२ नंतर सर्वांत उशिराने २० जून रोजी मॉन्सून दाखल झाला. तर चार दिवस उशिराने १९ जुलै रोजी मॉन्सूनने देश व्यापला. जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत राज्यात १३२८.५ मिलिमीटर म्हणजेच सरासरीपेक्षा तब्बल ३२ टक्के अधिक पाऊस झाला. आगमनाप्रमाणेच मॉन्सूनचा परतीचा प्रवास आत्तापर्यंतच्या सर्वांत उशिराने ९ ऑक्टोबर रोजी सुरू झाला. त्यानंतर अवघ्या आठ दिवसांत परतीच्या मॉन्सूनने देशाचा निरोप घेतला. मॉन्सून परतल्यानंतरही मॉन्सूनोत्तर पावसाने राज्यभर दाणादाण उडवून दिली.

दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यात तर पावसाने अक्षरशः थैमान घातले. कोकण, मध्य महाराष्ट्रालाही पावसाने धुऊन काढले. पावसाचे प्रमाण प्रचंड असलेल्याने दुष्काळी भागातील नद्या वाहत्या झाल्या. या कोरडवाहू भागातील अनेक नद्यांना कित्येक वर्षांना मोठे पूर आले. पुराचे पाणी शेतात, गावात शिरून नुकसान झाले. पावसाळा संपल्यानंतर मराठवाड्यातील धरणे, तलाव, बंधारे ओसंडून वाहिले. पश्चिम विदर्भाच्या काही भागात कोसळणार पावसाने पूर्व विदर्भात मात्र उसंत घेतली. विदर्भात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. मुसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने खरिपाची काढणीस आलेली पिके, फळबागा, भाजीपाला, फुल पिकांचे नुकसान झाले.

मराठवाड्यात २१७ टक्के अधिक पाऊस
ऑक्टोबर महिन्यातील पावसाच्या प्रमाणाचा विचार करता राज्यात साधारणतः ७१.१ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा १ ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत राज्यात तब्बल १६१.६ मिलिमीटर (१२७ टक्के अधिक) पाऊस झाला. यात मराठवाड्यात सर्वाधिक सरासरीपेक्षा २१७ टक्के अधिक, मध्य महाराष्ट्रात १७६ टक्के अधिक तर कोकणात १३१ टक्के अधिक पाऊस पडला आहे. तर विदर्भात मात्र सरासरीपेक्षा कमी उणे नऊ टक्के (-९) टक्के पाऊस पडल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले.

जालन्यात सर्वाधिक, वर्ध्यात सर्वांत कमी 
ऑक्टोबर महिन्यात दुष्काळी भागातच मुसळधार पाऊस पडला आहे. यातच ‘क्यार’ चक्रीवादळाच्या तडाख्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ४५६.३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. ऑक्टोबरच्या सरासरीच्या तुलनेत हे प्रमाण २३६ टक्क्यांनी अधिक आहे. तर टक्केवारीचा विचार करता मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात सर्वाधिक ३२३ टक्के पाऊस झाला आहे. औरंगाबाद जिल्ह्यात सरासरीपेक्षा २२३ टक्के अधिक, बीडमध्ये २९४ टक्के, तर परभणीमध्ये २२० टक्के अधिक पाऊस झाला आहे. मध्य महाराष्ट्रातील नगरमध्ये २५८ टक्के अधिक, तर धुळे जिल्ह्यात २३७ टक्के अधिक पाऊस पडला. विदर्भात मात्र पावसाचे प्रमाण कमी होते. वर्धा जिल्ह्यात सरासरीपेक्षा ६० टक्के कमी पाऊस, यवतमाळ जिल्ह्यामध्ये ५१, भंडारा ४९, गोंदिया ३०, अमरावती २६, नागपूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा २१ कमी, तर नंदुरबार जिल्ह्यातही सरासरीपेक्षा २५  कमी पडला आहे. 

क्यार, महा चक्रीवादळाचा प्रभाव
मॉन्सून परतल्यानंतर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर अधिकच वाढला. अरबी समुद्रावरून येणारे बाष्पयुक्त वारे आणि पूर्वेकडून बंगालच्या उपसागरावरून येणारे वारे यांचा महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या भागावर संगम होऊन पावसाला या भागात पावसाला दणक्यात सुरवात झाली. त्यानंतर अरबी समुद्रात ‘क्यार’ अतितीव्र चक्रीवादळ निर्माण झाले. या वादळाने कोकण, मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात तडाखा दिला. हे वादळ ओमानकडे जातात. पावसाने प्रमाण कमी होऊन उन्हाचा चटका वाढला. सकाळपासून असलेल्या उन्हामुळे स्थानिक वातावरणात बदल होऊन वादळी वारे, मेघगर्जना, विजांसह पाऊस सुर झाला. तर महिन्याच्या अखेरीस ‘महा’चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे. हे वादळ किनाऱ्याकडे येण्याचे संकेत असल्याने आठवडाभर पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. 

हवामान विभागनिहाय पडलेला पाऊस (स्रोत - हवामान विभाग)

विभाग सरासरी पाऊस पडलेला पाऊस  तफावत (टक्क्यांत)
कोकण  ११०.५   २५५.४  १३१
मध्य महाराष्ट्र  ७३.३  २०२.३ १७६
मराठवाडा  ७१.७  २२७.४   २१७
विदर्भ    ५७.६   ५२.५ (-९)
महाराष्ट्र  ७१.१ १६१.६ १२७

ऑक्टोबर महिन्यात राज्यांतील जिल्हानिहाय पावसाची स्थिती
(स्रोत - हवामान विभाग)

जिल्हा  सरासरी पाऊस पडलेला पाऊस   तफावत (टक्क्यांत)
पालघर ६१.७ ७८.३  २७
रायगड १०६.९ १९९.०   ८६
रत्नागिरी १३१.० २२१.२    ६९
सिंधुदुर्ग  १३६.०   ४५६.३  २३६
ठाणे ७१.६   १३५.१  ८९
नगर  ६८.४ २४४.७   २५८
धुळे ३५.९ १२०.९  २३७
जळगाव   ४३.२   १४३.०   १३१
कोल्हापूर ११३.७ २८७.५     १५३
नंदुरबार   ३१.६  २३.७   (-२५)
नाशिक    ५९.४     १२८.२  ११६
पुणे   ७८.४ २०८.६ १६६
सांगली १०६.२  २६२.०   १४७
सातारा  ९३.४   २४३.०  १६०
सोलापूर ९२.९ २७४.७  १९६
औरंगाबाद  ५५.८  १८०.१    २२३
बीड   ७२.८ २८६.६   २९४
हिंगोली ६४.३   १४६.०  १२७
जालना   ६०.१ २५४.५  ३२३
लातूर  ८५.६  २२५.४  १६३
नांदेड   ७६.९  २०८.७ १७१
उस्मानाबाद    ८२.४   २४१.४  १९३
परभणी ७७.६  २४८.४   २२०
अकोला   ५३.९  ६५.७ २२
अमरावती  ५०.८  ३७.६  (-२६)
भंडारा ५५.३ २८.१  (-४९)
बुलडाणा ५७.१    ८०.१     ४०
चंद्रपूर ५९.९  ६४.४  
गडचिरोली ६७.०   ७०.२  ५
गोंदिया ४८.१  ३३.८    (-३०)
नागपूर     ५३.६   ४२.१  (-२१)
वर्धा   ५२.९  २१.२    (-६०)
वाशीम  ६५.८    १०४.४  ५९
यवतमाळ  ५९.८  २९.१    (-५१)

     


इतर अॅग्रो विशेष
कृत्रिम रेतन हवे नियंत्रितचकृ त्रिम रेतनामध्ये उच्च प्रतीच्या वळूच्या...
दुष्काळ हटविण्याचा ‘जंगल मार्ग’ मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत कायम दुष्काळ असतो....
कोकण, मध्य महाराष्ट्रात हलक्या पावसाची...पुणे  ः अरबी समुद्रात निर्माण झालेल्या...
घोडेगावला कांद्यास कमाल १६५०० रुपये दरनगर  : जिल्ह्यातील घोडेगाव तालुका नेवासा...
जमिनीच्या आरोग्याबाबत ३५१ गावे होणार...पुणे  ः शेतकऱ्यांना जमीन आरोग्य तपासणीचे...
शिरोळमधील पूरबाधित जमिनींमध्ये वाढले...कोल्हापूर : तीन महिन्यांपूर्वी दक्षिण...
रुईच्या टक्‍केवारीवर ठरणार कापसाचा दर...वर्धा ः कापसातील रुईची टक्‍केवारी विचारात घेत...
राज्यात दोन लाख क्‍विंटल कापूस खरेदीअमरावती ः खासगी बाजारात कापसाला कमी दर मिळत...
राज्यातील दूध संकलन ३० लाख लिटरने घटलेसोलापूर ः ओल्या दुष्काळामुळे ओढवलेल्या आपत्तीने...
मातीची धूप थांबविण्यासाठी जागरूक रहा :...परभणी ः शेतीसाठी माती हा सर्वांत महत्त्वाचा घटक...
पणज गावाने आणली केळी पिकातून सुबत्ताअकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात पणज हे छोटे गाव...
संगेवाडीच्या नुकसानग्रस्त शेतकऱ्याला...सोलापूर  : दोन महिन्यांपुर्वी झालेल्या...
माणुसकीलाच काळिमापशुवैद्यकीय महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिची...
श्रमसधन उद्योग उभारणीवर हवा भरआजच्या घडीला सरकार कृषी संशोधन आणि विकास...
रोपवाटिका व्यवसायाने दिला सक्षम आधारदहावीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर नोकरी न मिळाल्याने...
मराठवाड्यात नऊ लाख हेक्‍टरवर रब्बी पेरणीलातूर : अतिपावसाने खरीप पिके हातची गेलेल्या...
औरंगाबादच्या मोसंबी कलमांची मध्य...महाराष्ट्रातील अत्यंत गोड, रसाळ मोसंबीने आता मध्य...
बी-हेव्ही मोलॅसिसपासून इथेनॉल निर्मितीस...सोलापूर : साखरेचे अतिरिक्‍त उत्पादन टाळून इंधन...
कृत्रिम रेतन व्यवसाय येणार कायद्याच्या...पुणे : राज्यातील गाय-म्हशींच्या कृत्रिम रेतनाचा...
हलक्या पावसामुळे वाढली धास्तीपुणे  ः अरबी समुद्राच्या दक्षिण भागात सक्रिय...