पावसानंतर बुलडाण्यातील १४० टँकर बंद

पावसामुळे बुलडाण्यातील १४० टँकर बंद
पावसामुळे बुलडाण्यातील १४० टँकर बंद

बुलडाणा ः दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या बुलडाणा जिल्ह्यात पाणीटंचाईचा उद्रेक झाला होता. मात्र आजवर झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईला मोठा आधार मिळाला आहे. ३२४ पर्यंत पोचलेली टँकरची संख्या घटली आहे. तब्बल १४० टँकर बंद झाले आहेत.    मागील उन्हाळ्यात जिल्हावासीयांनी भीषण पाणीटंचाईला तोंड दिले. या पाणीटंचाईच्या काळात पाणीटंचाई कृती आराखड्यातील गावांमध्ये विविध उपाययोजना सुरू झाल्या. जिल्हाभर गत काही दिवसांमध्ये गाळ काढणे, नाला रुंदीकरण व खोलीकरण, नदीतील डोहांचे खोलीकरण, जलाशयांना गाळमुक्त करण्याचे काम जलसंधारण, कृषी, सिंचन व भारतीय जैन संघटना यांच्या माध्यमातून झाले. त्यासोबतच सिमेंट नालाबांध, साखळीबांध, माती नालाबांध, समतल चर, गॅबियन बंधारे, पाझर तलाव दुरुस्ती, संग्राहक तलाव आदी कामे करण्यात आली. या कामांमुळे पडलेल्या पाऊस मुरला. परिणामी अनेक गावांमधील कोरडे पडलेले पिण्याच्या पाण्याचे स्रोत पुन्हा सुरू झाले. सद्यःस्थितीत भूजलपातळी सुधारल्यामुळे १२२ गावांची टँकरवरील भिस्त संपली आहे. तब्बल १४० टँकर बंद करण्यात आले आहेत. सद्यःस्थितीत अजूनही १८४ गावांमध्ये तेवढेच टँकर धावत आहेत. सध्या जिल्ह्यात पावसाचा जोर चांगला असून, येत्या काळात हे टँकरही बंद होतील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. 

बुलडाणा जिल्ह्यातील बंद करण्यात आलेले टॅंकर   

बुलडाणा ४०
चिखली १३ 
देऊळगावराजा
मेहकर  ९
लोणार   १० 
सिंदखेडराजा   ९
खामगाव  ३२ 
शेगाव 
मलकापूर
मोताळा ३ 
नांदुरा 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com