agriculture news in Marathi,1500 crore setback to corn producers , Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मका उत्पादकांना १५०० कोटींचा थेट फटका

टीम अॅग्रोवन
शनिवार, 9 नोव्हेंबर 2019

अकोला : राज्यात ऑक्टोबरमधील परतीच्या पावसाने सोंगणी केलेला तसेच उभ्या असलेल्या मक्याचे प्रचंड नुकसान केले आहे. मक्याच्या कणसांमधून जागोजागी कोंब बाहेर पडल्याने उत्पादनाला फटका बसला. राज्यात मक्याचे बहुतांश भागात ५० टक्क्यांवर नुकसान झाले आहे. या शिवाय मक्याचा चारासुद्धा हिरावला गेला आहे. ऑक्टोबरमधील वादळी पावसाने राज्यात १५०० कोटींपेक्षा अधिकचा फटका मका उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. 
 

अकोला : राज्यात ऑक्टोबरमधील परतीच्या पावसाने सोंगणी केलेला तसेच उभ्या असलेल्या मक्याचे प्रचंड नुकसान केले आहे. मक्याच्या कणसांमधून जागोजागी कोंब बाहेर पडल्याने उत्पादनाला फटका बसला. राज्यात मक्याचे बहुतांश भागात ५० टक्क्यांवर नुकसान झाले आहे. या शिवाय मक्याचा चारासुद्धा हिरावला गेला आहे. ऑक्टोबरमधील वादळी पावसाने राज्यात १५०० कोटींपेक्षा अधिकचा फटका मका उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. 
 

राज्यात नाशिक, धुळे, जळगाव, नगर, औरंगाबाद, जालना, बुलडाणा हे मका उत्पादनाचे प्रमुख जिल्हे आहेत. इतर पिकांच्या तुलनेत खरिपात मक्याचे पीक गेल्या काही वर्षांत चांगले येत असल्याने व उत्पादनाची हमखास खात्री निर्माण झाल्याने नवीन शेतकरी मक्याच्या लागवडीकडे वळाले होते. परंतु गेल्या रब्बी हंगामापासून मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव यायला सुरवात झाली. या वर्षी खरिपात लावगड केलेल्या मक्यावर आधीच या अळीने मोठा उच्छाद मांडला होता. यातून वाचलेले पीक ऑक्टोबरमध्ये काढणी दरम्यान झालेल्या वादळी पावसाने ५० टक्क्यांवर खराब झाले. 

धानोरा विटाळी (ता. नांदुरा, जि. बुलडाणा) येथे प्रभाकर नरवाडे यांनी तीन एकरांत खरीप मक्याची लागवड केली होती. काढणीसाठी परिपक्व झालेल्या मक्याची ऑक्टोबर महिन्यात सोंगणी केली. आता पाऊस उघडल्यानंतर कणसे तोडायला सुरवात करणार तोच प्रत्येक कणीस डागाळलेले असल्याचे पाहून ते धास्तावले आहेत. नरवाडे कुटुंबाकडे सहा एकर शेती आहे. पैकी तीन एकरात मका लावलेला आहे. संपूर्ण वर्षाचे आर्थिक नियोजन अवलंबून असलेली पिके हातातून गेल्याने आता उदरनिर्वाहाचा तसेच स्वतःवर असलेले बॅंकेचे कर्ज कसे फेडायचे, हा पेच बनल्याचे ते म्हणाले. नुकसानीची पाहणीसाठी अद्याप कोणताही अधिकारी शेतात आलेला नाही. या संकट काळात शासनाकडून तातडीने मदत देण्याची गरज आहे.

सोपान चोपडे नावाचे शेतकरी म्हणाले, की लष्करी अळीच्या नियंत्रणामुळे या वर्षी मक्याचा उत्पादन खर्च आधीच अडीच ते तीन हजारांनी वाढला होता. शेतकऱ्यांचा एकरी खर्च १५ हजारांपर्यंत गेलेला आहे. पिकाची स्थिती पाहता हा खर्च तर सोडाच आता शेतात असलेले पीक बाहेर नेण्यासाठी व शेत नव्याने तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना हात उसनवारीने पैसे मागण्याची वेळी आलेली आहे.

मक्यापासून तयार होणारा चाराही कुजल्याने जनावरे खाणार नाहीत. गजानन राजस म्हणाले, की आम्ही सोयाबीन परवडत नसल्याने यंदा मक्याची पाच एकरात लागवड केली. एकरी २५ ते ३० क्विंटल उत्पादनाची अपेक्षा होती. आता पिकाची स्थिती पाहली तर पाच एकरात १० ते १५ क्विंटल उत्पादन होईल याचीही शाश्‍वती दिसत नाही.

दृष्टिक्षेपात यंदाचे मका पीक आणि नुकसान...
राज्याचे खरीप मका सरासरी क्षेत्र: 
७३६६६३
यंदा लावगड झालेले क्षेत्र: ८६६००५
सरासरीच्या तुलनेत टक्केवारी: ११८
झालेले नुकसान : सुमारे ५० टक्के
सर्वसाधारण बाजारभाव : १८०० रुपये प्रति क्विंटल
सरासरी उत्पादन : २० क्विंटल
एकूण नुकसान :  १५०० कोटी

असे झाले नुकसान...

  •   लष्करी अळीपासून वाचलेला मका पावसाने घालवला
  •   सततच्या आणि वादळी पावसाने मका प्रभावित
  •   कापणी केलेला मक्याचे पावसाने १०० टक्के नुकसान 
  •   कणसात पाणी शिरून काळवंडले दाणे; रोगांचे आक्रमण
  •   ओला झाल्याने फुटले कोंब 
  •   शेतकऱ्यांचा एकरी १५ हजारांचा लागवड खर्चही निघेना

इतर अॅग्रो विशेष
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...
‘आत्मा’चे पंचवार्षिक आराखडे रखडलेपुणे: शेतकऱ्यांपर्यंत कृषी विषयक योजना कशा...
‘पोकरा’ प्रकल्पातील वैयक्तिक लाभ...नांदेड : कोरोना (कोवीड -१९) संसर्गामुळे शासनाच्या...
मूग खरेदी एक ऑक्टोबरपासूनमुंबई: हमीभावाने मूग खरेदीच्या मान्यतेचा प्रस्ताव...
मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यतापुणे ः राज्यात अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार...
मुसळधार पावसाचा तडाखापुणे ः  मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात काही...
कुटुंबातील सदस्याला शेतकरी अपघात विमा...पुणे ः गोपिनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचा...
मैत्रीची अन्नधान्य व्यापारातील भागीदारी...आडगाव (जि. नाशिक) येथील गोरक्ष लभडे आणि संदीप...
मराठवाड्यात मुसळधारेचा अंदाजपुणे ः विदर्भ आणि तेलंगणा दरम्यान चक्राकार...
बचत गटांच्या उत्पादनांची माहिती एका...मुंबई: महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी कार्यरत...
पंजाब, हरियानात कृषी विधेयके...नवी दिल्लीः लोकसभेत मंजूर झालेल्या कृषी...
यांत्रिकीकरण अभियानाच्या अर्ज...पुणे:  राज्यात चालू वर्षीही कृषी...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमऔरंगाबाद : मराठवाड्यात शनिवारी (ता. १९)...
राज्यात ठिकठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यात तुरळक ठिकाणी होत असलेल्या पावसाचा...
शेतीसंबंधी विधेयकाविरोधात देशव्यापी...नगर ः केंद्र सरकारने काढलेल्या व आता कायद्यात...
कृषी खात्यात आजपर्यंत कोरोनाची १८१...अकोला ः राज्यात वाढत चाललेल्या कोरोनाचा फटका कृषी...
साखर निर्यात योजनेस डिसेंबर अखेरपर्यंत...कोल्हापूर: गेल्या वर्षभरात साखर निर्यातीचे नवे...
मराठवाड्यात पूर, पावसाचे थैमाननांदेड-औरंगाबाद : परभणी व हिंगोली जिल्ह्यांत...