क्यार चक्रिवादळ
क्यार चक्रिवादळ

सिंधुदुर्ग : ‘क्यार’मुळे २० कोटींचे नुकसान; प्राथमिक अहवाल

सिंधुदुर्ग ः क्यार चक्रीवादळामुळे झालेल्या अतिवृष्टीत जिल्ह्यातील ६६७ महसूल गावांतील ६२ हजार १२५ शेतकऱ्यांचे सुमारे २० कोटींचे नुकसान झाले आहे. या पावसात २९ हजार ६८७ हेक्टर क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने शासनाकडे पाठविल्याची माहिती कृषी अधीक्षक कार्यालयातील अरूण नातु यांनी दिली. क्यार चक्रीवादळामुळे जिल्ह्यात सलग तीन दिवस अतिवृष्टी झाली. या पावसामुळे जिल्ह्यातील परिपक्व झालेली भातशेती पाण्याखाली गेली तर कापणी केलेली अनेक शेतकऱ्यांची भातशेती वाहून गेली. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी होत आहे.  दरम्यान, कृषी विभागाने क्यार वादळाने झालेल्या नुकसानीचा प्राथमिक अहवाल राज्य शासनाकडे पाठविला आहे. कृषी विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील ६६७ महसूल गावातील ६२ हजार १२५ शेतकऱ्यांचे २९ हजार ६८७ हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. हे नुकसान सुमारे २० कोटीपेंक्षा अधिक आहे.  देवगड तालुक्यातील ९८ गावांतील ६ हजार ७५७ शेतकऱ्यांचे ३ हजार ४९० हेक्टर क्षेत्र. मालवण तालुक्यातील १२४ गावांतील १० हजार ७५० शेतकऱ्यांचे ६ हजार ७६०हेक्टर क्षेत्र, सांवतवाडी तालुक्यातील ७८ गावांतील ७ हजार ४८० शेतकऱ्याचे २ हजार ८८५ हेक्टर क्षेत्र, दोडामार्ग तालुक्यातील ४९ गावांतील ३ हजार ४६० शेतकऱ्यांचे १ हजार ४४० हेक्टर क्षेत्र, वेंगुर्ला तालुक्यातील ७२ गावांतील १ हजार ६६५ शेतकऱ्यांचे ६७० हेक्टर क्षेत्र, कणकवली तालुक्यातील १०१ गावांतील १०१ गावांतील १३ हजार ७२ शेतकऱ्यांचे ६ हजार ७२ हेक्टर क्षेत्र, कुडाळ तालुक्यातील ९७ गावांतील १५ हजार ६७० शेतकऱ्यांचे ६९१० हेक्टर क्षेत्र तर वैभववाडी तालुक्यातील ५९ गावांतील ३२७० शेतकऱ्यांचे १ हजार २७० हेक्टर क्षेत्र बाधीत क्यार वादळामुळे बाधीत झाले आहे. हा प्राथमिक अहवाल जिल्हा कृषी विभागाने राज्य शासनाकडे पाठविला आहे. गावनिहाय नुकसानीची स्थिती (क्षेत्र हेक्टरमध्ये)

तालुका गावे   क्षेत्र  शेतकरी
देवगड  ९८  ३४९०  ६७५७ 
मालवण   १२४   ६७७०  १०७५०
सांवतवाडी ७८  २९९५  ७४८०
दोडामार्ग   ४९   १४४० ३४६०
वेंगुर्ला   ७२   ६७० १६६५
कणकवली  १०१  ६९७२   १३०७२
कुडाळ  ९७   ६९९०   १५६७० 
वैभववाडी ५९  १२७०   ३२७०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com