मराठवाड्यात ३ लाख ४ हजार हेक्‍टरवर हरभरा

मराठवाड्यात ३ लाख ४ हजार हेक्‍टरवर हरभरा
मराठवाड्यात ३ लाख ४ हजार हेक्‍टरवर हरभरा

औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात यंदा केवळ ३ लाख ४ हजार ९६९ हेक्‍टरवरच हरभऱ्याची पेरणी झाली आहे. यामध्ये औरंगाबाद कृषी विभागांतर्गत येत असलेल्या तीन जिल्ह्यांतील ३९ हजार ३५४ हेक्‍टरसह लातूर कृषी विभागांतर्गत येत असलेल्या पाच जिल्ह्यांतील ३ लाख ४ हजार ९६९ हेक्‍टरवरील हरभरा पिकाचा समावेश आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यात यंदा हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ४५ हजार ९०२ हेक्‍टर होते. त्या तुलनेत केवळ ६ हजार ३६९ हेक्‍टरवरच हरभऱ्याची पेरणी झाली आहे. जालना जिल्ह्यात हरभऱ्याच्या सर्वसाधारण ३१ हजार ८५२ हेक्‍टरच्या तुलनेत १२ हजार ६०३ हेक्‍टरवर, तर बीड जिल्ह्यात सर्वसाधारण ७१ हजार २८९ हेक्‍टरच्या तुलनेत २० हजार ३७२ हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे.

लातूर जिल्ह्यात यंदा रब्बी हरभऱ्याचे सर्वसाधारण क्षेत्र ९३ हजार ११२ हेक्‍टर होते. त्या तुलनेत ७५ हजार ३८६ हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वसाधारण ८० हजार १३७ हेक्‍टरच्या तुलनेत ६८ हजार १४७ हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाली आहे.

नांदेड जिल्ह्यात सर्वसाधारण ६२ हजार ३५१ हेक्‍टरच्या तुलनेत ६२ हजार ७११ हेक्‍टरवर अर्थात सर्वसाधारण क्षेत्राच्या थोडे पुढे जाऊन हरभऱ्याची पेरणी झाली आहे. परभणी जिल्ह्यात यंदा ५६ हजार ५६८ हेक्‍टरच्या तुलनेत ३२ हजार ७२ हेक्‍टरवर हरभरा पेरला गेला आहे. तर हिंगोली जिल्ह्यात यंदा सर्वसाधारण ७२ हजार ८५५ हेक्‍टरच्या तुलनेत २७ हजार २९९ हेक्‍टरवर हरभऱ्याची पेरणी झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. कोरडवाहू हरभऱ्याच्या पेरणीचा कालावधी साधारणत: ऑक्‍टोबरअखेरपर्यंत असतो. तो संपला आहे, तूर्त बागायती हरभरा पेरणी १५ डिसेंबरपर्यंत चालत असली, तरी सिंचनासाठी पाणीच उपलब्ध नसल्याने बागायती हरभऱ्याच्या क्षेत्रात अपवाद वगळता वाढ होण्याची शक्‍यता नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com