पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटी

पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटी
पाणीटंचाई निवारणासाठी ३२ कोटी

नागपूर : ग्रामीण भागातील पाणीटंचाई निवारणासाठी जिल्हा परिषदेने दुसऱ्या टप्प्यातील आराखडा अंतिम केला. ७७४ गावांत ३२ कोटी रुपये खर्चाच्या उपाययोजना करण्यात येणार आहे. ७४ गावांत टॅंकरने पाणीपुरवठा करण्याची गरज भासणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.  

जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने कूपनलिका खोदकाम आणि नवीन विहीर अधिग्रहणाच्या कामाला वेगाने सुरवात केली आहे. त्यासाठी कंत्राटदारांकडून निविदा मागविण्यात आल्या. ऑक्‍टोबर ते डिसेंबर हा पहिला टप्पा नुकताच आटोपला. दुसऱ्या टप्प्याला जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मंजुरी मिळाली आहे. ३२ कोटी ११ लाख ७० हजार रुपयांचा खर्च होणार आहे. यामध्ये प्रगतिपथावरील नळ योजना पूर्ण करणे, नळ योजनांची दुरुस्ती, नवीन विंधन विहीर, विंधन विहिरींची विशेष दुरुस्ती, तात्पुरत्या पूरक नळ योजना, विहीर खोलीकरण, टॅंकरद्वारे पाणीपुरवठा, खासगी विहीर अधिग्रहण आदी कामांचा समावेश आहे. 

सर्वाधिक उपाययोजना दुष्काळग्रस्त काटोल आणि नरखेड तालुक्‍यात होणार आहेत. मागीलवर्षीचा अनुभव लक्षात घेऊन जिल्ह्यातील ७४ गावांत पाणीटंचाईची अधिक तीव्रता वाढेल, असा अंदाज प्रशासनाला आहे. हिंगणा तालुक्‍यातील ४४ गावांत टॅंकरची गरज लागणार असून यासाठी ६१ लाख ५० हजार रुपयांची तरतूद आहे. कामठी तालुक्‍यातील आठ गावे टॅंकरबाधित आहेत. त्यासाठी १२ लाखांचा खर्च असून दोन्ही मिळून ९७ लाख ५० हजार रुपये खर्चाची तरतूद करण्यात आली. 

अशी आहे तरतूद...

तालुका गाव  रक्कम
नागपूर  ६९ २ कोटी ५१ लाख ९६ हजार
कामठी ३२ १ कोटी ३४ लाख ३० हजार
हिंगणा ९५   ३ कोटी ९७ लाख
सावनेर ३१ १ कोटी ६८ लाख १६ हजार
कळमेश्वर ३८ १ कोटी १८ लाख ३२ हजार
काटोल ११२ ४ कोटी १७ लाख ३० हजार
नरखेड  ११८ ५ कोटी ५० लाख ३४ हजार
उमरेड  ३२  २ कोटी ११ लाख ६० हजार
भिवापूर ८० १ कोटी ७१ लाख ६२ हजार
कुही ६४ १ कोटी ७१ लाख ६२ हजार
रामटेक २४ ५४ लाख
मौदा ५४ २ कोटी १६ लाख ७० हजार
पारशिवनी  २७ ५८ लाख ५० हजार
एकूण 00 ३२ कोटी ११ लाख ७० हजार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com