agriculture news in marathi,52 projects dry in Sangli district | Agrowon

सांगली जिल्ह्यातील ५२ प्रकल्प कोरडे
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 जुलै 2019

सांगली : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरीही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे ८४ लघुप्रकल्पांपैकी तब्बल ५२ प्रकल्प कोरडे ठणठणीत आहेत. याशिवाय जत, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यातील पाचही मध्यम प्रकल्पांत पाण्याचा थेंबही नाही. या पावसाळ्यात पुरेसा पाऊस न पडल्यास पुढील उन्हाळ्यामध्ये पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याबरोबर जिल्ह्याला सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

सांगली : पावसाळा सुरू होऊन दीड महिना झाला तरीही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडलेला नाही. त्यामुळे ८४ लघुप्रकल्पांपैकी तब्बल ५२ प्रकल्प कोरडे ठणठणीत आहेत. याशिवाय जत, कवठेमहांकाळ आणि मिरज तालुक्यातील पाचही मध्यम प्रकल्पांत पाण्याचा थेंबही नाही. या पावसाळ्यात पुरेसा पाऊस न पडल्यास पुढील उन्हाळ्यामध्ये पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण होण्याबरोबर जिल्ह्याला सलग तिसऱ्या वर्षी दुष्काळाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

निम्मा पावसाळा संपत आला आहे. जिल्ह्याच्या पावसाच्या सरासरीपेक्षा तब्बल १६ टक्के उणे पाऊस आहे. या कमी पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांशी तलाव कोरडे आहेत. 

जिल्ह्यात मध्यम ८४; तर पाच मध्यम प्रकल्प आहेत. यापैकी तब्बल ५२ तलाव कोरडे आहेत. याशिवाय पाचही मध्यम प्रकल्पांत पाण्याचा थेंबही नाही. लघुप्रकल्पात फक्त १० टक्केच पाणीसाठा आहे. गतवर्षी १२ टक्के होता. या वर्षी तो दोन टक्क्यांनी कमी आहे. या तलावात सध्या एक हजार ४६८ दलघफु पाणीसाठा असून यातील काही तलवांतील पाणी हे टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ पाणी योजनेतून सोडलेले आहे.

शिराळा तालुक्यात समाधानकारक पाऊस पडल्याने या तालुक्यातील मोरणा मध्यम प्रकल्पात सात टक्के पाणीसाठा आहे. जत तालुक्यातील दोड्डानाला, संख, कवठेमहांकाळमधील बसप्पावाडी, मिरजेतील सिद्धेवाडी हे पाचही मध्यम प्रकल्प कोरडे आहेत. आटपाडी तालुक्यात १३ लघुप्रकल्प आहेत. त्यापैकी तीन तलावांत पाण्याचा थेंबही नाही.

जत तालुक्यात २६ लघुप्रकल्पांपैकी निम्म्यावर म्हणजे १८ तलाव कोरडे आहेत. खोजनवाडी तलावात तीन, कोसारी १७, प्रतापूर ७, तिपेहळ्ळीत तीन टक्के पाणी आहे. 

कवठेमहांकाळ तालुक्यात १० तलाव आहेत. यातील तब्बल आठ तलाव कोरडे आहेत. म्हैसाळ योजनेचे पाणी सोडल्याने नागोंळेत ४६; तर लांडगेवाडी तलावात दोन टक्के पाणीसाठा आहे. कडेगाव तालुक्यात नऊ तलावांपैकी दोन तलाव कोरडे आहेत. तासगाव तालुक्यात सहा तलाव असून यातील पाच तलाव कोरडे आहेत. खानापूरमध्ये आठ तलावांपैकी सहा कोरडे आहेत. मिरज तालुक्यात तीनपैकी भोसे येथील तलावात पाणी नसल्याची स्थिती आहे. 

तालुकानिहाय तलावातील पाणी

तालुका टक्केवारी
जत
कवठेमहांकाळ
आटपाडी  
खानापूर 
तासगाव 
मिरज ११
कडेगाव २७
शिराळा  ३८

 

इतर ताज्या घडामोडी
पंतप्रधान शेतकरी मानधन योजनेच्या...वाशीम : केंद्र शासनाने शेतकऱ्यांसाठी सुरू...
झरे परिसरात महावितरणकडून वीजजोडणीस...झरे, जि. सांगली : झरे व परिसरातील घरगुती व...
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाच्या गतीला...परभणी : चालू आर्थिक वर्षातील पहिल्या साडेचार...
देवळा तालुक्यातील ‘त्या’...नाशिक : मागील पंधरवड्यात कळवण, सुरगाणा तालुक्यात...
सोलापूर जिल्ह्यात दोन लाख वीज...सोलापूर : घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या...अकोला  ः भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय...
देश, राज्यात बेरोजगारी हेच मोठे आव्हान...नगर : मागील पाच वर्षांत नोटबंदीसारख्या...
साताऱ्यातील भूस्खलन बाधितांचा पुनर्वसन...सातारा  : अतिवृष्टी व भूस्खलनामुळे बाधित...
नगर झेडपीत सहा महिन्यांत माहिती...नगर  ः जिल्हा परिषदेतून विविध योजनांची...
...तर बारामतीची जागाही जिंकता आली असती...नागपूर  ः ‘ईव्हीएम’मध्ये गडबड करायची असती तर...
पूरग्रस्त शेतकऱ्यांना कुळीथ, वालाचे...रत्नागिरी : या वर्षी पडलेल्या मुसळधार...
मराठवाड्यातील मध्यम, लघुप्रकल्पांत २९...औरंगाबाद : अर्धेअधिक पावसाळा लोटल्यानंतरही...
`ग्रीन होम`मध्ये सेकंड होम, फार्म हाउस...पुणे : ‘सकाळ-ॲग्रोवन’च्या ‘ग्रीन होम एक्स्पो...
कृषी क्षेत्रात योगदान देणाऱ्या ...पुणे   : जिद्द, कष्ट, अथक परिश्रमाच्या...
लागवडयोग्य `पोटखराब`ची नोंद होणार सात...पुणे  ः पोटखराब जमीन लागवडीयोग्य केली असेल...
औरंगाबादमध्ये शेवगा २५०० ते ३००० रुपये...औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली...नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि...
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या...नाशिक : चालू वर्षी पावसाचे आगमन उशिरा झाल्यानंतर...
ग्रामपंचायत संगणक परिचालकांच्या...नाशिक : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती...
धुळे जिल्ह्यात किसान सन्मान योजनेत दोन...धुळे : जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी...