मराठवाड्यात ५४ लाखावर लोकांची तहान टॅंकरवर

मराठवाड्यात ५४ लाखांवर लोक तहानलेले
मराठवाड्यात ५४ लाखांवर लोक तहानलेले

औरंगाबाद : मराठवाड्यातील ३२०९ गावांमधील ५४ लाख ७१ हजार नागरिकांची तहान टॅंकरवर अवलंबून आहे. टंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासनातर्फे ३३८६ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शिवाय टॅंकर व टॅंकरव्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी ६२३८ विहिरींचेही अधिग्रहण करण्यात आले आहे. आटत्या जलस्रोतांनी पाणीपुरवठ्यांत मोठी अडचण निर्माण केल्याची स्थिती आहे. 

औरंगाबाद, जालना, बीड व उस्मानाबाद जिल्हा पाणीटंचाईच्या सर्वाधिक रडारवर आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ७६८ गावे, २६९ वाड्यांमधील १८ लाख ७९ हजारांवर लोकांना ११४६ टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे. जालन्यात ५३० गावे, १२३ वाड्यांमधील ११ लाख ९३ हजार ६९५ लोकांसाठी ६७५ टॅंकर कार्यरत आहेत. बीडमधील ६५६ गावे, ३४१ वाड्यांमधील १३ लाख ५७ हजार ६६४ नागरिकांवर पाणीटंचाईच्या संकटाचा सामना करावा लागत आहे.  त्यांच्यासाठी ९४० टॅंकर सुरू आहेत. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील १६९ गावे, ११ वाड्यांमधील ४ लाख १६ हजार ३८७ लोक भीषण पाणीटंचाईचा सामना करत आहेत. त्यांना २२८ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. परभणीतील ७६ गावे, १५ वाड्यांमधील १ लाख २५ हजार १७ लोकांची तहान भागविण्यासाठी ९४ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. हिंगोलीत ४१ गावे, ५ वाड्यांमधील ८४ हजार ७३८ नागरिकांवर पाण्याचे संकट कोसळले आहे. त्यांना ६६ टॅंकरनी पाणी मिळत आहे. 

नांदेड जिल्ह्यातील ७७ गावे, २६ वाड्यांमधील १ लाख ९५ हजार १५० लोकांसाठी १३२ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. लातूर जिल्ह्यातील ८३ गावे, १९ वाड्यांमधील २ लाख १९ हजार ३४५ लोक टॅंकरवर अवलंबून आहेत. त्यांच्यासाठी १०५ टॅंकरची सोय करण्यात आली आहे. 

मराठवाड्यात ६२३८ विहिरींचे अधिग्रहण

मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ६२३८ विहिरींचे पाणीपुरवठ्यासाठी अधिग्रहण करण्यात आले आहे. त्यामध्ये टॅंकरना पाणीपुरवठा करण्यासाठी १६६४, तर टॅंकर व्यतिरिक्‍त पाणीपुरवठ्यासाठी ४५७४ विहिरींचे अधिग्रहण केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील ५३६, जालना ७२१, परभणी ७२१, हिंगोली ४०७, हिंगोली ५११, नांदेड १०६६, बीड १०२७, लातूर १००२, तर उस्मानाबाद जिल्ह्यातील ९६८ विहिरींचा अधिग्रहीत विहिरींमध्ये समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com