Agriculture news in marathi;73 tankers have been started in Dhule district | Agrowon

धुळे जिल्ह्यात ७३ टॅंकर सुरूच
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 12 जुलै 2019

धुळे ः जिल्ह्यात अजूनही अनेक गावांमध्ये सुमारे ७३ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक टंचाईग्रस्त २७ गावे साक्री तालुक्‍यात आहेत. परिणामी, २७ टॅंकर साक्रीमध्ये सुरूच असल्याची माहिती आहे. 

साक्री तालुक्‍यात यंदाच्या उन्हाळ्यात सर्वत्र भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली होती. विशेष म्हणजे आत्तापर्यंत पाणीटंचाई काय असते, याचा अनुभव नसलेल्या अनेक गावांतील ग्रामस्थांनाही यंदा पाण्यासाठी वणवण भटकावे लागले. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनातर्फे तालुक्‍यातील सुमारे ३० गावांमध्ये संपूर्ण उन्हाळ्यात टॅंकरद्वारा पाणीपुरवठा करण्यात आला.

धुळे ः जिल्ह्यात अजूनही अनेक गावांमध्ये सुमारे ७३ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. सर्वाधिक टंचाईग्रस्त २७ गावे साक्री तालुक्‍यात आहेत. परिणामी, २७ टॅंकर साक्रीमध्ये सुरूच असल्याची माहिती आहे. 

साक्री तालुक्‍यात यंदाच्या उन्हाळ्यात सर्वत्र भीषण पाणीटंचाईची स्थिती निर्माण झाली होती. विशेष म्हणजे आत्तापर्यंत पाणीटंचाई काय असते, याचा अनुभव नसलेल्या अनेक गावांतील ग्रामस्थांनाही यंदा पाण्यासाठी वणवण भटकावे लागले. या पार्श्‍वभूमीवर प्रशासनातर्फे तालुक्‍यातील सुमारे ३० गावांमध्ये संपूर्ण उन्हाळ्यात टॅंकरद्वारा पाणीपुरवठा करण्यात आला.

यात पारगाव, सिनबन, सालटेक, विजापूर, धामणधर, अंबापूर, पांगण, अंबापाडा, पाटीशिवार, ढोलीपाडा, तोरणकुडी, चरणमाळ, नांदर्खी, बसरावळ, पिंपळगाव, वाल्हे, आमोदे, डोमकानी, दारखेल, शेलबारी, छडवेल (क), पेटले, भाडणे (का), रोहोड, उमरपाटा, इंदवे, गणेशपूर, नांदवन, नागझिरी या गावांचा समावेश होता.

टॅंकरच्या पाण्यावरच या गावांतील ग्रामस्थांची भिस्त होती. 
साक्रीमधील विजापूर व आमोदे परिसरात पाऊस झाल्याने, तर पेटले येथे अधिग्रहण केलेल्या विहिरीपर्यंत टॅंकर पोचत नसल्याने या तीन गावांचे टॅंकर बंद झाले आहेत. मात्र, उर्वरित २७ गावांमध्ये अद्यापही टॅंकरद्वारेच पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

जळगावात सध्या १६० टॅंकर सुरू 
जळगाव जिल्ह्यात सर्वत्र कमीअधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. मात्र, अद्यापही समाधानकारक पाऊस नसल्याने १८७ गावांत १६० टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. टॅंकरच्या संख्येत सोळा टॅंकरने घट झाली आहे. मे महिन्यात टॅंकरची संख्या २२० टॅंकर होती. 

इतर बातम्या
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
यवतमाळ जिल्ह्यातील सात दुष्काळग्रस्त...यवतमाळ ः जनरेट्यामुळे दुष्काळ यादीत नव्याने...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...
केरळच्या धर्तीवर काजू प्रक्रिया ...रत्नागिरी  ः परदेशी चलन मिळवून देणाऱ्या काजू...
`गोकुळ` मल्टिस्टेटमुळे शेतकऱ्यांचा...मुंबई : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक...
संगमनेर तालुक्यातील लिंबू बागांना घरघर संगमनेर, जि. नगर : दर्जेदार कागदी लिंबांच्या...
दूध वाहतुकीतून रेल्वेला ६ कोटी १२ लाख...दौंड, जि. पुणे  : दौंड रेल्वे स्थानकावरून...
कृषक विकिरण केंद्रातून अमेरिका, ...नाशिक  : जिल्ह्यातील लासलगाव येथील कृषक...
आसाम, बिहारमध्ये पुराचे ११४ बळीनवी दिल्ली: आसाम आणि बिहारमध्ये पुराचे थैमान...
सौरऊर्जेमुळे शेतकऱ्यांना मुबलक वीज...कोल्हापूर ः शेतकऱ्यांना दिवसा व उद्योगांना स्वस्त...
परीक्षा शुल्क परतीचा खर्च सात लाख रुपयेयवतमाळ ः परीक्षा रद्द झाल्यानंतर उमेदवारांचे पैसे...
दुबार पेरणीसाठी सरकारची तयारीः डाॅ....पुणे: पावसाचा काही प्रमाणात खंड पडला आहे....
डोणगावात होणार खजूर लागवडअकोला ः पारंपरिक पिकांना पर्याय शोधण्यासाठी...
रक्तक्षय दूर करण्यासाठी लोहयुक्त तांदूळनाशिक : दैनंदिन आहारातून अत्यल्प प्रमाणात लोह...
असंमत बियाणे लागवडीला बोंडअळी कारणीभूत...नवी दिल्ली : देशात २०१८ मध्ये गुलाबी...