agriculture news in Marathi,8 thousand for Kharip crops and 18 thousand compensation for horticulture crops, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

खरीप पिकांसाठी आठ हजार तर, फळबागांसाठी १८ हजारांची मदत

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

राज्यपालांनी शेतकऱ्यांना हेक्टरी ८००० रुपयांची मदत जाहीर केली. हिशोब करता गुंठ्याला केवळ ८० रुपये मदत मिळणार आहे. फळबागांना गुंठ्याला केवळ १८० रुपये मदत जाहीर केली. शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार आहे. आज कांद्याच्या रोपाच्या एका वाफ्याचा दर ५००० रुपये झाला आहे. फळबागांचा उत्पादन खर्च तर प्रचंड आहे. त्यामुळे गुंठ्याला लागणारा साधा बियाणांचा खर्चसुद्धा भागणार नाही. शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी करायला आलेल्या विविध पक्षांच्या नेत्यांना ही मदत मान्य आहे का? शेतकऱ्यांच्या संयमाची अधिक परीक्षा पाहू नका. शेतकऱ्यांचा तळतळाट घेऊ नका. जाहीर केलेल्या या तुटपुंज्या भरपाईचा तातडीने पुनर्विचार करा व एकरला किमान २५ हजार रुपयांची सरसकट प्राथमिक मदत जाहीर करा.
- डॉ. अजित नवले,  राज्य सरचिटणीस, अखिल भारतीय किसान सभा, महाराष्ट्र

मुंबई: राज्यात अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शनिवारी (ता. १६) मदत जाहीर केली. खरिपातील शेती-पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी आठ हजार रुपयांची, तर फळबागांसाठी हेक्टरी १८ हजारांची मदत जाहीर करण्यात आली आहे. दोन हेक्टरच्या मर्यादेत ही मदत शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्यपालांनी तातडीने ही मदत वाटप करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. याशिवाय संकटातील शेतकऱ्यांच्या मुलांच्या शाळा- महाविद्यालयीन परीक्षांचे शुल्क आणि शेतसारा माफ करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. 

महाराष्ट्रामध्ये एकीकडे सत्ता स्थापनेसाठी राजकीय वातावरण तापलेले असतानाच राज्यातील अनेक भागांमध्ये अतिपाऊस झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांना दहा हजार कोटींची मदत करण्याची घोषणा केली होती. परंतु त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याने शेतकऱ्यांना मिळणारी मदत रखडली होती. 

दरम्यानच्या काळात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टीने नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली. तसेच कोणत्याही अटी आणि निकष न लावता शेतकऱ्यांना हेक्टरी सरसकट २५ हजार रुपयांची ताबडतोब मदत द्या, अशी मागणी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केली आहे. 

मात्र, हेक्टरी ८ हजार म्हणजे एकरी ३ हजार ते ३,२०० रुपये इतकीच मदत मिळणार आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने विरोधकांनी त्यावर टीका सुरू केली आहे. ‘‘अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. मात्र प्रशासनाने ही मदत तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी. काँग्रेसचा सहभाग असलेले नवीन सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी अतिरिक्त मदत जाहीर केली जाईल,’’ असे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. 

पावसाने केलेले प्रचंड नुकसान पाहता शेतकऱ्यांना भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे. मात्र राज्यपालांनी जाहीर केलेली मदत पुरेशी नाही. तरीही राज्यात सरकार अस्तित्वात नसताना जाहीर झालेल्या या मदतीचे प्रशासनाने तातडीने वितरण करावे. ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, अशी मागणी करून अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षाचा सहभाग असलेले सरकार स्थापन झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या या मदतीत अधिक वाढ केली जाईल, असेही ते म्हणाले.

प्रतिक्रिया
ही मदत म्हणजे शेतकऱ्यांची चेष्टा आहे. जो नियम महापूरग्रस्तांसाठी लावण्यात आला आहे, तोच अवकाळी पावसासाठी लावणे गरजेचे आहे. राज्यपाल कधीही राजभवनाबाहेर पडले नाहीत. शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. त्यांना शेतकऱ्यांचे दुःख माहिती नाही. खरंतर त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन एकदा बघावे, शेतकऱ्यांच्या व्यथा- वेदना समजून घ्याव्यात. 
- राजू शेट्टी, अध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
 


इतर अॅग्रो विशेष
साखर कामगारांचा संपाचा इशारा  पुणे/कोल्हापूर  ः गळीत हंगाम सुरू होण्यासाठी...
मॉन्सून परतीवर पुणे ः गेल्या तीन महिन्यांपूर्वी पश्चिम...
मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६...
अकरा सोयाबीन बियाणे कंपन्यांचे परवाने...पुणे: राज्यातील शेतकऱ्यांना सोयाबीनचे गुणवत्ताहिन...
नगर जिल्ह्यातील धरणे तुडूंबनगर ः दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि पाणी...
खानदेशातील प्रकल्पांतून पाणी विसर्गात घटजळगाव ः गेले चार दिवस खानदेशात अपवाद वगळता जोरदार...
राज्यात पावसाची उघडीप; शेतीकामांना वेगपुणे ः पावसाने उघडीप दिल्याने ओढ्या- नाल्याच्या व...
गुणवत्तापूर्ण संत्रा वाण निर्मितीसाठी...अकोला/नागपूर ः आपल्या वैशिष्ट्यपूर्ण चवीसाठी...
राहुरी विद्यापीठातील बदल्या अखेर रद्दपुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः राज्यातील काही भागांत अंशतः ढगाळ हवामानाची...
कापूस हंगाम लांबणीवर?नागपूर: पावसाचा वाढलेला कालावधी, ढगाळ वातावरण...
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यांत रब्बी...परभणी ः कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बियाणे खरेदीसाठी...
देशी गोपालनातून शेती केली शाश्वतकिणी (ता.हातकणंगले,जि.कोल्हापूर) येथील सुमित अशोक...
रेशीम शेतीने दिली आर्थिक साथपांगरा शिंदे (ता.वसमत,जि.हिंगोली) येथील प्रयोगशील...
मॉन्सूनने मुक्काम हलविला; राजस्थानातून...पुणे : पश्चिम राजस्थानात २५ जूनच्या दरम्यान दाखल...
कृषी विधेयकांवर राष्ट्रपतींची स्वाक्षरीनवी दिल्ली : संसदेने मंजूर केलेल्या तिन्ही कृषी...
कृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन...नवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ...
कोकण कृषी विद्यापीठ कारळा पिकाच्या...दापोली, जि.रत्नागिरी  : कमी मेहनत, कमी...
खावटी अनुदान योजनेच्या नावाखाली...मुंबई: राज्य सरकारने जाहीर केलेली खावटी अनुदान...
मुंबईतील व्यापारी, कामगारांमध्ये कृषी...मुंबई: केंद्र शासनाच्या तीन कृषी विधेयकांचे पडसाद...