agriculture news in Marathi,800 crore less in stamp duty, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

मुद्रांक शुल्कात आठशे कोटींनी घट

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 ऑक्टोबर 2019

एप्रिल ते मार्च २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी मुद्रांक शुल्कमधून २७ हजार कोटी रुपये मिळावेत, असे उद्दिष्ट आहे. त्यातून आतापर्यंत १४ हजार कोटींपर्यंत वसुली झाली आहे. आता सहा महिन्यांत उर्वरित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नियोजन असून मागील वर्षी एकूण उद्दिष्टाच्या ११९ टक्‍के वसुली होती.
- श्‍यामसुंदर पाटील, सहसचिव, महसूल 

सोलापूर : मुद्रांक शुल्कातून २७ हजार कोटींच्या वसुलीचे उद्दिष्ट महसूल विभागाने ठेवले, मात्र गतवर्षीच्या तुलनेत सप्टेंबरपर्यंत ८३० कोटींची घट झाली आहे. एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत ११ लाख ८७ हजार दस्त नोंदणीतून १४ हजार कोटी मिळाले असून, मागच्या वर्षी याच कालावधीत १५ हजार १३० कोटींपर्यंत वसूल झाल्याची माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली. 

जमिनी, खुली जागा खरेदी-विक्री, घर खरेदी-विक्रीसह ६३ प्रकारच्या व्यवहारांमधून महसूल विभागाला दरवर्षी सरासरी २१ ते २६ हजार कोटींपर्यंत मुद्रांक शुल्क मिळतो. २०१६-१७ मध्ये २१ हजार कोटी तर २०१७-१८ मध्ये २६ हजार ५३४ कोटींचे मुद्रांक शुल्क मिळाले. नोटाबंदीनंतर त्यामध्ये थोडीशी घट झाली, तरीही मागील वर्षी एकूण उद्दिष्टापैकी ११९ टक्‍के उद्दिष्ट पूर्ण झाले. यंदा मात्र, महसूल विभागाने २७ हजार कोटींचे उद्दिष्ट देऊनही अद्याप ५० टक्‍केही उद्दिष्ट पूर्ण झालेले नाही. 

जागतिक मंदी अन्‌ बॅंकांसमोरील अडचणींमुळे जागा, जमिनी, घर विक्रीत घट झाली असून जीएसटीमधील हजारो कोटींची घट आणि आता मुद्रांक शुल्कातील घट, यामुळे आगामी काळात सरकारच्या महसुलात मोठी घट होईल, अशीही शक्‍यता तज्ज्ञांनी व्यक्‍त केली. सांगली, कोल्हापूर, सोलापूर, विदर्भ, मराठवाड्यातून मुद्रांक शुल्क घटल्याचे चित्र आहे. दरम्यान, मुद्रांक शुल्क कमी होण्याच्या कारणांचा शोध घेतला जात असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

राज्याची स्थिती...
मुद्रांक शुल्क वसुलीचे उद्दिष्ट :
२७,००० कोटी
सप्टेंबरपर्यंत वसुली : १४,००० कोटी
सहा महिन्यांतील उद्दिष्ट : १३,६०० कोटी
मागील वर्षीच्या तुलनेतील घट : ८०० कोटी

 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात पावसाचा जोर सोमवारपासून वाढणार पुणे ः बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र...
किसान रेल्वेला नाशिकमधून प्रारंभ नाशिक: केंद्र सरकारने २०२० च्या अर्थसंकल्पात...
नाशवंत शेतमाल वाहतुकीसाठी किसान...नाशिक: कृषी क्षेत्रात प्रगत असलेल्या नाशिक...
संजीवनी गटाचे रास्त दरात खात्रीशीर...नाशिक जिल्ह्यातील मोह (ता.सिन्नर) येथील तरुण...
शेतकऱ्यांसाठी ‘दीपस्तंभ’ ठरलेली...मानोरी (ता. राहुरी, जि. नगर) येथील कृषीभूषण डाॅ....
बळीराजा चेतना अभियान बंद करण्याचा निर्णयमुंबई : विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या...
विदर्भातून सूर्यफूलाचे पीक झाले हद्दपारनागपूर : सूर्यफुलाकरिता प्रसिद्ध असलेल्या भागात...
पीक कर्ज वाटपात हलगर्जीपणा करणाऱ्या...पुणे: महात्मा जोतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत...
ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण होणारपुणे: पंचायत राजच्या माध्यमातून देशभरातील...
सतर्क राहून मदत कार्य कराः मुख्यमंत्रीमुंबई: मुसळधार वृष्टी आणि जोरदार वारे यामुळे...
कोकणाला दणका, मराठवाड्यात दिलासापुणे: मुंबईसह कोकणला पावासाने चांगलेच झोडपून...
कोकणात पावसाचा जोर वाढणार पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून अरबी...
`कृषी’चे प्रवेश सीईटीनेच होणार पुणे: राज्यात कृषी पदवी अभ्यासक्रमांचे प्रवेश ‘...
महागाई नियंत्रणासाठी रेपो दर 'जैसे थे' मुंबई: भारतीय रिझर्व्ह बँकेने आपले ऑगस्ट आणि...
पिराचीवाडी झाली उपक्रमशील गावकोल्हापूर जिल्ह्यातील पिराचीवाडी(ता.कागल) हे...
शेती शाश्वत अन् आश्वासकही!चार महिन्यांपासून देशभर सुरु असलेले लॉकडाउन आता...
दूध दराचे दुखणेइतर व्यवसाय व दूध व्यवसायातील फरक हा की कारखाने...
उद्दिष्ट - मुदतवाढीत अडकवू नका मका...‘‘आ धी नोंदणी केल्यानंतर ११ जुलैला एसएमएस...
मराठवाड्यात कर्ज पुरवठ्याचं घोडं ३७...औरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीक कर्ज पुरवठा...
मुगाचे अर्धेअधिक क्षेत्र रोगाच्या...अकोला : यंदाच्या खरिपात मुगाच्या पिकावर लिफ...