खंडाळा गावाजवळ जाळ्यात अडकून बिबट्या ठार

खंडाळा गावाजवळ जाळ्यात अडकून बिबट्या ठार
खंडाळा गावाजवळ जाळ्यात अडकून बिबट्या ठार

अकोला ः जिल्ह्यात तेल्हारा तालुक्यात खंडाळा गावाजवळ वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (ता. ११) समोर आली. मृतक बिबट्याचा जाळ्यातून बाहेर काढण्यात आले असून, पशुवैद्यकीय अधिकारी घटनास्थळीच पंचनामा करीत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, तेल्हारा तालुक्यात खंडाला गावाजवळ बेलमयी शिवारात वन्यजीव विभागाचे बफर झोन आहे. याअंतर्गत नरनाळा अभयारण्य आहे. या जंगलात रानडुक्कर तथा सायाळाची शिकार करण्यासाठी काही शिकारी जाळे लावतात. गुरुवारी या जाळ्यात अडकून बिबट्याचा मृत्यू झाला. या भागात वन्यजीवांचा मोठ्या प्रमाणात वावर असून शिकारी या प्राण्यांसाठी जाळे लावत असतात. यात वन्यजीवांचा मृत्यू होण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. गुरुवारी चक्क बिबट्याच या जाळ्यात अडकून ठार झाला. या घटनेने वन्यजीव विभागही सतर्क झाला आहे. घटनेची माहिती मिळताच नरनाळा अभयारण्याचे आरएफओ श्री. चव्हाण हे पथकासह घटनास्थळी दाखल झाले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com