काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरी

बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री व्यवहारापुरतेच मर्यादित न राहता काळानुरूप बदलत शेतमाल निर्यातीसाठी पुढाकार घ्यावा. त्याकरिता आयक्यूएफ सारख्या प्रणालींचा अवलंब करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरी Accept change over time: Nitin Gadkari
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरी Accept change over time: Nitin Gadkari

वर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री व्यवहारापुरतेच मर्यादित न राहता काळानुरूप बदलत शेतमाल निर्यातीसाठी पुढाकार घ्यावा. त्याकरिता आयक्यूएफ (इंडिव्हिज्यूअली क्विक फ्रोजन)  सारख्या प्रणालींचा अवलंब करावा, असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.  हिंगणघाट येथे नांदगाव चौरास्ता परिसरात उड्डाणपुलाचे लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. खासदार रामदास तडस , खासदार विकास महात्मे, जिल्हा परिषद अध्यक्ष सरिता गाखरे, आमदार समीर कुणावर, दादाराव केचे, रामदास आंबटकर, हिंगणघाट बाजार समितीचे सभापती सुधीर कोठारी यांची या वेळी उपस्थिती होते.  गडकरी म्हणाले, ‘‘हिंगणघाट बाजार समितीने आपली वेगळी कार्यप्रणाली जपत शेतकऱ्यांमध्ये विश्वास निर्माण केला आहे. आता हिंगणघाट बाजार समितीने हाच विश्वास कायम ठेवत आधुनिक तंत्रज्ञानाच्या बळावर शेतमाल निर्यातीसाठी पुढाकार घ्यावा. त्याकरिता शीतगृह उभारावे, यासाठी केंद्र सरकार स्तरावर सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल. हिंगणघाट बाजार समितीतून या पुढील काळात जागतिक स्तरावर माल पोहोचेल, अशी व्यवस्था उभारली जावी. या भागातून शेतीमाल निर्यातीला चालना मिळावी याकरिता हिंगणघाट येथून सहा डब्याची कोल्ड स्टोरेजची सुविधा असलेली रेल्वे सुरू करण्यात येईल. वर्धा जिल्ह्यातील रेल्वे येथे ड्रायपोर्ट प्रस्तावित करण्यात आला होता. सध्या हे काम बंद पडले आहे. त्याला गती मिळावी याकरिता नॅशनल हायवे अथोरिटी ऑफ इंडिया हा प्रकल्प ताब्यात घेईल आणि त्या माध्यमातून या प्रकल्पाचे पुढे कार्यान्वयन करण्याचे प्रस्तावित आहे. भविष्यात वर्धा विदर्भाचे निर्यात हब व्हावे.’’   सामूहिक प्रयत्नांतून संत्र्यांचे मूल्यवर्धन करा विदर्भाचे मुख्य पीक असलेल्या संत्र्यांचे मूल्यवर्धन सामूहिक प्रयत्नांतून शक्य होणार आहे. त्याकरिता या भागातील बाजार समित्यांनी तसेच कृषी क्षेत्रातील सर्वच संस्था, संघटनांनी पुढे आले पाहिजे. शीतगृहांची साखळी या भागात निर्माण झाल्यास नाशीवंत शेतीमाल साठवता येणार आहे, अशी व्यवस्था उभारणे शेतकऱ्याला वैयक्तिक स्तरावर शक्य होत नाही. त्यामुळे निधी असलेल्या संस्थांनी प्रयत्न करावा, असे आवाहन गडकरी यांनी केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com