agriculture news in Marathi,action against two professors due to miss behave, Maharashtra | Agrowon

विद्यार्थिनीशी गैरवर्तणूकप्रकरणी दोन प्राध्यापकांवर कारवाई

टीम अॅग्रोवन
शनिवार, 12 ऑक्टोबर 2019

गैरकृत्याचे हे प्रकरण पाच वर्षांपूवीचे आहे. या प्रकरणी अहवालाअंती कारवाई अपेक्षित होती. त्यानुसार पहिल्या टप्प्यात दोन्ही प्राध्यापकांची वेतनवाढ रोखण्यात आली आहे. तत्कालीन अधिकारी, कर्मचाऱ्यांनी त्या वेळीच दोषारोप करून कारवाई करणे गरजेचे होते. 
- चंद्रभान पराते, कुलसचिव, माफसू, नागपूर

नागपूर ः विद्यार्थिनीशी गैरवर्तणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणि संबंधित प्राध्यापकावर कारवाई होऊ नये याकरिता दबावतंत्राचा वापर करणाऱ्या अशा दोघांवर ‘माफसू’ प्रशासनाने कारवाई करीत त्यांची वेतनवाढ रोखण्याचा निर्णय घेतला आहे. ‘माफसू’चे कुलसचिव चंद्रभान पराते यांनीही याला दुजोरा दिला. 

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत एम.व्ही.एस.सी. अभ्यासक्रमाला एक विद्यार्थिनी प्रवेशित होती. या विद्यार्थिनीला परजीवीशास्त्र विभागाचे प्राध्यापक सुरेश जाधव यांनी आसाम राज्यातील एका कार्यशाळेकरिता सोबत नेले. या निमित्ताने या विद्यार्थिनीला विमानप्रवासही स्वखर्चाने घडवून आणला. आसामला पोचल्यानंतर त्या विद्यार्थिनीने आपल्या मैत्रीणीकडे राहणार असल्याचे सांगितले. परंतु, जाधव यांनी आधीच हॉटेलची खोली बुक असल्याचे सांगत तिला आपल्या सोबत नेले.

हॉटेलमध्ये पोचल्यावर मात्र त्या विद्यार्थिनीशी लगट करण्याचा प्रयत्न प्रा. सुरेश जाधव यांनी केल्याचा आरोप आहे. या प्रकाराने घाबरलेल्या विद्यार्थिनीने नागपुरात पोचताच ‘माफसू’ प्रशासनासह महिला आयोगाकडे या प्रकरणी तक्रार केली. प्रा. जाधव हे कार्यरत असलेल्या परजीवीशास्त्र विभागाचे प्रमुख एस. डब्ल्यू. कोलते यांनी त्या मुलीवर तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकल्याचाही आरोप आहे.

या प्रकरणी सेवानिवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी होत त्यांनी आपला अहवाल सादर केला. त्यामध्येदेखील घटनाक्रमातील तथ्य समोर आल्याचे सूत्रांनी सांगितले. पाच वर्षांपूर्वी तत्कालीन कुलगुरू डॉ. आदित्यकुमार मिश्रा यांच्या कार्यकाळात हा प्रकार घडला होता. या प्रकरणी तेव्हापासून कोणतीच कारवाई करण्यात आली नव्हती. त्यासोबतच गंभीर प्रकरण असताना पोलिस कारवाईदेखील टाळली गेली. तक्रारकर्त्या विद्यार्थिनीला पदव्युत्तर शिक्षणक्रमासाठी शिरवळ महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला. 

सारे काही सुरळीत असतानाच या प्रकरणात दोषी ठरवीत प्रा. सुरेश जाधव यांच्या पाच वेतनवाढ कायमस्वरूपी रोखण्यात आल्या, तर त्यांना सहकार्य करणारे विभागप्रमुख एस. डब्ल्यू. कोलते यांच्याही दोन वेतनवाढ रोखण्यात आल्या आहेत.


इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यात पावसाचा जोर कमीऔरंगाबाद  : मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत...
बियाण्यांच्या अडीच हजारांवर तक्रारींची...बीड : उगवण न झाल्याने दुबार पेरणीचे संकट...
नांदेड जिल्ह्यासाठी खरीप पीकविमा योजना...नांदेड : जिल्ह्यात यंदासाठी (२०२०-२१) खरीप हंगाम...
सततच्या खंडित वीजपुरवठ्याने माळीनगर...माळीनगर, जि. सोलापूर : वारंवार खंडित...
अत्यावश्यक वेळीच रासायनिक तणनियंत्रक...हिंगोली : ‘‘शेतकऱ्यांनी तणनियंत्रणासाठी केवळ...
सांगली जिल्ह्यातील प्रकल्पांत गेल्या...सांगली : जिल्ह्यात मध्यम व लघू ८४ प्रकल्पांची...
कृषिपंपांना दिवसा वीजपुरवठ्यासाठी...रत्नागिरी  : अनिश्‍चित पावसाचा हंगाम लक्षात...
`म्हैसाळ’ची कामे १५ ऑगस्टपूर्वी पूर्ण...सोलापूर  : म्हैसाळ योजनेतून सांगोला,...
काथ्या उद्योगातून कोकणाच्या विकासाला...नाशिक  : जगात भारत नारळ उत्पादनात आघाडीवर...
बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची...अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन...
मराठा आरक्षणाबाबत उपसमितीची वरिष्ठ...मुंबई : मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या...
शेती नियोजनातून साधावा आर्थिक प्रगतीचा...नागपूर  : शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच...
भाजपची प्रदेश कार्यकारिणी जाहीरमुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील...
राज्यात चांगल्या पावसाचा अंदाजभारतीय हवामान शास्त्र विभागाच्या कृषी मोसम...
पुणे जिल्हा परिषदेची मागासवर्गीय...पुणे  : पुणे जिल्ह्यातील मागासवर्गीय...
नगरमध्ये १८ हजार हेक्टरवर उडदाची पेरणीनगर  ः नगर जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
औरंगाबादमध्ये बटाटा १००० ते २००० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
आरोग्यदायी हिंगआपल्या रोजच्या स्वयंपाकात पदार्थ करताना फोडणीसाठी...
अकोला जिल्ह्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा...अकोला  ः यंदाच्या हंगामात मृग नक्षत्रात...
खानदेशात कांदा रोपवाटिकांची संख्या वाढलीजळगाव  ः खानदेशात यंदा रोपवाटिकांची संख्या...