agriculture news in Marathi,administration aware regarding Onion storage, Maharashtra | Agrowon

कांदा साठवणुकीच्या संदर्भात प्रशासन सतर्क
टीम अॅग्रोवन
रविवार, 10 नोव्हेंबर 2019

नाशिक : कांदा दर नियंत्रणासाठी निर्यातबंदी नंतर लगेच साठवणुकीवर मर्यादा आणून व्यवहारांवर निर्बंध केंद्र सरकारने लागू केले. यांनतर पुन्हा एकदा प्रशासन सतर्क झाले असून, दैनंदिन खरेदी-विक्री, मालाची निकासी व साठवणूक यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. 

नाशिक : कांदा दर नियंत्रणासाठी निर्यातबंदी नंतर लगेच साठवणुकीवर मर्यादा आणून व्यवहारांवर निर्बंध केंद्र सरकारने लागू केले. यांनतर पुन्हा एकदा प्रशासन सतर्क झाले असून, दैनंदिन खरेदी-विक्री, मालाची निकासी व साठवणूक यावर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. 

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप कांद्याचे ५० टक्क्यांपर्यंत नुकसान झाले आहे.  दरस्थिती लक्षात घेऊन साठवणुकीवर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून दिल्या आहेत. कांद्याचे व्यवहार बाजार समितीत पार पडल्यांनातर दररोज होणारी कांदा आवक, निर्गती व शिल्लक साठ्याची तपासणी दररोज संबंधित बाजार समित्यांचे सचिव व बाजार समितीचे प्रतिनिधी यांच्याकडून करण्यात येत आहे की नाही याबाबत जिल्हा उपनिबंधक यांच्याकडून लक्ष देण्यात येत आहे. दैनंदिन संपूर्ण आढावा विहित नमुन्यात प्राप्त करून तो जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्यात येत आहे.

 ऑक्टोबरच्या अखेरच्या आठवड्यात राज्यातील कांद्याचे प्रमुख आगार असलेल्या नाशिक जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसाने तडाखा दिला. खरिपातील उशिराचा कांदा वाया गेला असतानाच मॉन्सूनोत्तर पावसाचा फटका उन्हाळी कांद्यालाही बसणार आहे. पुढील वर्षी उन्हाळ कांदा उशिरा दाखल होण्याची शक्यता आहे. परिणामी उपलब्ध कांद्याचे दर नियंत्रणात ठेवण्याची धडपड सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे कांद्याची साठेबाजी होऊ नये यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.

कांद्याची साठेबाजी होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने बाजार समित्यांना त्यांच्याकडे दररोज येणाऱ्या कांद्याची, विक्री झालेल्या तसेच उपलब्ध साठ्याची माहिती देणे बंधनकारक केले आहे. तसेच साठेबाजी रोखण्यासाठी पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.

दैनंदिन अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर 
घाऊक व्यापाऱ्याला ५०० क्विंटल व किरकोळ व्यापाऱ्याला १०० क्विंटलपर्यंत कांदा साठवणूक करण्याची परवानगी आहे. कळवण, सटाणा, येवला तालुक्यातील बाजार समित्यांमधील काही व्यापाऱ्यांकडे पथकांमार्फत तपासणी करण्यात आली. मात्र कामकाज सुरळीत असून वॉच कायम असणार आहे. याबाबत दैनंदिन कामकाजाचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे दररोज पाठविण्यात येत असल्याचे जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी सांगितले.

इतर अॅग्रो विशेष
पीकविम्या वरून शेतकऱ्यांनी केंद्रीय...अमरावती  ः पीकविमा हप्ता भरायची जशी सक्‍ती...
बुलेट ट्रेन प्रकल्पाचा निधी शेतकरी...मुंबई  : लवकरच राज्यात सत्तेवर येणाऱ्या...
बोगस खतांची तक्रार केली होती : मिश्रखत...पुणे: राज्यात काही भागांमध्ये मिश्रखताचे बोगस...
संपूर्ण कर्जमाफीसाठी लागणार 'एवढी'...सोलापूर : मागील दोन वर्षांत दुष्काळ, पूर,...
कृषी कर्मचाऱ्यांवर दबाव कुणासाठी?पुणे : राज्याच्या कृषी विभागाकडून गेल्या काही...
केंद्र शासनाचे आदेश धाब्यावरपुणे : मिश्रखतांमधील बोगस उत्पादनाला पायबंद...
ढगाळ हवामानामुळे गारठा कमीपुणे: ढगाळ हवामानामुळे किमान तापमानात वाढ होऊन...
टेरेसगार्डनवर विषमुक्त फळे-भाज्यांची...रासायनिक अवशेषमुक्त अन्नाची निर्मिती हाच एकमेव...
रब्बी पिकांना 'इथे' आहे टोळधाडीचा धोका !नवी दिल्ली: देशात मॉन्सूनचा परतीचा प्रवास...
एकत्र कुटूंब कसतेय शेती, नियोजनातून...अविरत कष्टांची तयारी, एकत्रित कुटूंब पध्दतीमुळे...
संघर्षमय हंगामगेल्या वर्षीच्या गळीत हंगामात राज्यात विक्रमी...
द्राक्ष शेतीला चालना कशी मिळेल?संपूर्ण भारत देशामध्ये द्राक्ष लागवड १.३९ लाख...
जमिनीच्या सुपीकतेतील गांडुळांचे योगदानजगभरामध्ये हजारो जातीची गांडुळे अस्तित्वात असून,...
ईशान्यकडील राज्ये का नाकारतात...कोल्हापूर : वाहतूक खर्चामुळे महाग पडत असल्याने...
जळगाव जिल्ह्यात 'येथे' सुरु झाली...जळगाव ः खानदेशात भारतीय कापूस महामंडळाने (...
केंद्रीय पथक आज करणार पीकहानीची पाहणीपुणे ः मॉन्सूनोत्तर पावसामुळे राज्यात शेतीच्या...
‘दाणेदार’ खताच्या मागे ‘मालदार’ हालचालीपुणे : राज्यात १९७० ते २००० या तीन दशकांमध्ये...
योजना, निधीची कमी नाही, मग शेतीचे प्रश्...औरंगाबाद : योजना, निधी, यंत्रणा, सुविधा,...
धक्कादाय ! चक्क दाताखाली दाणे ठेवत...उमरखेड, यवतमाळ : मॉन्सूनोत्तर पावसाच्या...
कोकण, मध्य महाराष्ट्रात गारठा कमीपुणे: विदर्भ, मराठवाड्यात तापमान कमी झाल्याने...