agriculture news in Marathi,administration in confusion due to new orders, Maharashtra | Agrowon

नवनवीन प्रपत्र, जिओ टॅगिंगच्या सूचनेमुळे यंत्रणा गोंधळात

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

बुलडाणा  ः अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम यंत्रणास्तरावर अंतिम टप्प्यात असून, मागील तीन-चार दिवसांत वेगवेगळी प्रपत्रे देण्यात आली आहेत. तसेच, पीकविमाधारकांकडून सुधारित प्रपत्र पुन्हा भरून घेण्याबाबत सुचविण्यात आले आहे. विमा लाभासाठी जिओ टॅगिंग करण्याच्या सूचना दिल्याने सर्वेक्षण यंत्रणा गोंधळात पडली आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना हे कागदी घोडे नाचविण्याचा फार्स कशासाठी सुरू आहे, याबाबत आता कर्मचारीही थेट प्रश्न करू लागले आहेत. याबाबत काही संघटनांनी थेट शासनाकडे निवेदने पाठवीत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे.

बुलडाणा  ः अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम यंत्रणास्तरावर अंतिम टप्प्यात असून, मागील तीन-चार दिवसांत वेगवेगळी प्रपत्रे देण्यात आली आहेत. तसेच, पीकविमाधारकांकडून सुधारित प्रपत्र पुन्हा भरून घेण्याबाबत सुचविण्यात आले आहे. विमा लाभासाठी जिओ टॅगिंग करण्याच्या सूचना दिल्याने सर्वेक्षण यंत्रणा गोंधळात पडली आहे. सर्वत्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असताना हे कागदी घोडे नाचविण्याचा फार्स कशासाठी सुरू आहे, याबाबत आता कर्मचारीही थेट प्रश्न करू लागले आहेत. याबाबत काही संघटनांनी थेट शासनाकडे निवेदने पाठवीत वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आहे.

संपूर्ण राज्यात ऑक्टोबरमधील अवकाळी पावसामुळे व अतिवृष्टीने शेतातील उभ्या पिकांचे तसेच काढणी केलेल्या पिकांचे नुकसान झाले. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. या आदेशानुसार ग्रामस्तरीय समिती (तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक) यांनी नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण करून पंचनामे पूर्ण केले. असे असताना नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत मागील तीन-चार दिवसांत दोन ते तीन प्रकारची वेगवेगळी प्रपत्रे देण्यात आली आहेत. 

पीकविमाधारकांनीही मागील १० दिवसांत सूचना फॉर्म व त्यासोबत पंचनाम्याचा फॉर्म भरून दिला आहे. या पंचनाम्यामुळे सुधारित प्रपत्र पुन्हा भरून घेणे शक्य नाही. नुकसानग्रस्त शेतकरी आधीच प्रचंड नुकसानामुळे वैतागलेला आहे. विमा भरताना त्याने आवश्यक असलेली संपूर्ण कागदपत्रे जोडली आहेत. असे असताना विमा कंपनी पुन्हा सर्व कागदपत्रांची मागणी करीत असल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढलेला आहे. त्यातच पंचनाम्याचे प्रपत्र भरण्यासाठी कर्मचारी शेतकऱ्यांकडे गेल्यास आणखी रोष वाढण्याची शक्यता आहे.

ग्रामस्तरीय समितीमार्फत पंचनामे पूर्ण केलेले असूनसुद्धा पंचनाम्यासोबत नुकसानग्रस्त शेताचा जिओ टॅगिंग केलेला फोटो काढण्याच्या सूचना आता दिल्या आहेत. परंतु, नुकसानाचे क्षेत्र रब्बी हंगामासाठी शेतकरी तयार करीत आहेत. अशा परिस्थितीत शेताचे जिओ टॅगिंग करणे शक्य राहिलेले नाही. ही वस्तुस्थिती असतानाही यंत्रणास्तरावर सातत्याने नवनवीन आदेश धडकत आहेत. यामुळे सर्वेक्षण करणाऱ्या यंत्रणा त्रस्त झाल्या आहेत. 

जिल्ह्यात सोयाबीन, मका, कापूस, ज्वारी या पिकांचे प्रचंड नुकसान उघड्या डोळ्यांनी दिसत असताना शासनाकडून कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार सर्वत्र आता टीकेस पात्र ठरू लागला आहे. 

सुधारित आदेशामुळे गोंधळ

  • सरकारच्या आदेशानंतर ग्रामस्तरीय समितीकडून पंचनामे पूर्ण
  •     शेतकऱ्यांनीही सूचना फॉर्म व त्यासोबत पंचनाम्याचे फॉर्म भरले
  • नुकसानग्रस्त शेती रब्बीसाठी तयार करण्याची शेतकऱ्यांची लगबग
  • विमा कंपनीकडून सुधारित प्रपत्र पुन्हा भरून घेण्याच्या सूचना
  • नुकसानग्रस्त शेताचा जिओ टॅगिंग केलेला फोटो काढण्याच्या सूचना 
  • आदेशामुळे सर्वेक्षण यंत्रणा गोंधळात
  • पुन्हा कागदपत्रे मागितल्यास शेतकऱ्यांचा रोष वाढण्याची शक्यता

इतर ताज्या घडामोडी
कळवण येथे शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती...नाशिक  : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी...
नुकसानीमुळे पीककर्जाकडे शेतकऱ्यांचा कल पुणे ः अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान...
सटाणा शहरात कचऱ्यापासून होणार...नाशिक : सटाणा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत...
पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आज...पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत कापूस...औरंगाबाद : आधी दुष्काळाचा ताण, त्यानंतर...
पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या...पुणे ः जिल्ह्यात पुढील वर्षी जुलै ते डिसेंबर २०२०...
काळ्या ज्वारीमुळे शासकीय खरेदीला ब्रेकअमरावती  ः अचलपूर खरेदी विक्री संघाला ज्वारी...
मराठवाड्यातील १४ लाख ५५ हजार हेक्‍टरवर...उस्मानाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १४ लाख...
अकोल्यात सोयाबीन पोचले ४१०० पर्यंतअकोला ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला...
माकडांच्या उच्छादामुळे बोराच्या बागेचे...मानोरा जि. वाशीम ः तालुक्यातील  कारखेडा...
वाळवा तालुक्‍यात द्राक्ष उलाढालीत सात...वाळवा, जि. सांगली : अतिवृष्टीने द्राक्षशेतीचे...
कोल्हापूर जिल्ह्यात बँकांना २५००...कोल्हापूर : ‘‘जिल्ह्यात सर्वच बॅंकांना २ हजार ४३०...
कांदा साठवणूक निर्बंधाचा फेरविचार करानाशिक : गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात...
नांदेड विभागातील १ लाख ८५ हजार टन उसाचे...नांदेड : चार जिल्ह्यांतील ८ कारखान्यांनी यंदाच्या...
चुकीच्या तापमान नोंदीमुळे रत्नागिरीतील...रत्नागिरी  : जिल्ह्यात आंबा, काजू पिकांसाठी...
जागते रहो... कांदाचोरांचा अजून सुळसुळाट...फलटण शहर, जि. सातारा   ः सध्या...
सांगली जिल्ह्यात हळद पिकावर कंदकुज,...सांगली  ः महापूर आणि अतिवृष्टीमुळे कंदकुज...
ओला दुष्काळ जाहीर न केल्यास आंदोलन करू...कोल्हापूर   ः दक्षिण महाराष्ट्रात ओला...
खानदेश, मराठवाडा, विदर्भातील काही...पुणे  ः राज्यातील काही भागांत ढगाळ हवामान...
पाच जिल्हा परिषद निवडणुकांचे भवितव्य...अकोला  : जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य...