agriculture news in Marathi,administration had crop inspection on action mode, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

पंचनाम्यांची ‘अतिवृष्टी’; रातोरात ९३ लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे !

मनोज कापडे
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

पुणे ः राज्य शासनाची यंत्रणा पिकाचे पंचनामे करण्यात दिरंगाई करीत असल्याचे पाहून हैराण झालेल्या राज्यपालांनी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी बोलण्याचा निर्णय घेतला. यामुळे हादरलेल्या महसूल विभागाने आकड्यांची अक्षरशः अतिवृष्टी केली आणि रातोरात ९३ लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे केले. राज्यातील एक कोटी चार लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचेही राज्यपालांना कळविण्यात आल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

पुणे ः राज्य शासनाची यंत्रणा पिकाचे पंचनामे करण्यात दिरंगाई करीत असल्याचे पाहून हैराण झालेल्या राज्यपालांनी स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी बोलण्याचा निर्णय घेतला. यामुळे हादरलेल्या महसूल विभागाने आकड्यांची अक्षरशः अतिवृष्टी केली आणि रातोरात ९३ लाख हेक्टर क्षेत्राचे पंचनामे केले. राज्यातील एक कोटी चार लाख शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचेही राज्यपालांना कळविण्यात आल्याची माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

महसूल विभागाने पीक पंचनाम्याची जबाबदारी कृषी विभागाऐवजी पूर्वीपासून स्वतःच्या ताब्यात ठेवली आहे. मुळात बहुतेक तलाठी शेतावर न जाताच अर्थात खात्री न करताच कार्यालयांमध्ये पिकाच्या नोंदी करतात. याच नोंदी पुढे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी ग्राह्य धरल्या जातात. विशेष म्हणजे पंचनामेदेखील बांधावर जाऊन केले जात नसल्याने अंदाजे आकडे भरण्याचे उद्योग वर्षानुवर्षे सुरू आहेत. यामुळेच यंदा अतिवृष्टीनंतर झालेल्या नुकसानाचा अंदाज शासनाला येऊ शकला नाही. 

“शासनाकडे आधी ५४ लाख हेक्टरवर नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज महसूल व कृषी विभागाने दिला होता. त्यात जास्तीत जास्त १० ते २० लाखाची वाढ अपेक्षित होती. मात्र, पंचनामे वेळेत होत नसल्याने निश्चित नुकसान कळत नव्हते. त्यामुळे केंद्रालादेखील नुकसान भरपाईचा अहवाल पाठविता येत नव्हता. अर्थात, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होताच पंचनाम्याच्या नेहमीच्या ‘आस्ते कदम’ परंपरेवर गदा आली. त्यात पुन्हा राज्यपालांपर्यंत पंचनाम्याचा गोंधळ पोचला. राज्यपाल स्वतः पंचनाम्याचा आढावा घेणार असल्याचे शुक्रवारी (ता. १४) राज्यभर कळताच महसूल विभागाची त्रेधातिरपीट झाली,” अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

राज्यपाल स्वतः प्रत्येक जिल्ह्याचा आढावा शनिवारी सकाळी घेणार असल्याने तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांची धावपळ झाली. कारण, जिल्हाधिकाऱ्यांकडून सुस्त यंत्रणेला शुक्रवारी चांगलेच फैलावर घेतले गेले. यामुळे अधिकाऱ्यांच्या झोपा उडाल्या. अनेक जिल्ह्यांमध्ये रात्रभर ‘पीक पंचनाम्या’चे काम सुरू होते.

राज्यपालांच्या बैठकीचा इतका धसका सरकारी यंत्रणेने घेतला की आकड्यांचा पाऊस पडला.! “राज्यपालांचा धसका घेतल्याने भेदरलेल्या यंत्रणेने पंचनाम्याची १०० टक्के कामे पूर्ण केली आहेत. यात नुकसानीचा आकडा चक्क ९३ लाख हेक्टरच्या पुढे गेल्याने आम्हीदेखील चक्रावून गेलो आहोत. एक कोटी ४ लाख शेतकऱ्यांचे पंचनामे झाल्याचे महसूल विभागाने कळविले आहे. राज्याच्या नैसर्गिक आपत्ती मदतीच्या वाटचालीत हा आकडा ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे,” अशी माहिती मदत व पुनर्वसन विभागाच्या सूत्रांनी दिली.

अहवालांचेच काम करा
राज्यपाल स्वतः जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बोलून पीक पंचनाम्याविषयी आढावा घेणार होते. तथापि, ही कॉन्फरन्स रद्द केली गेली. “पंचनामा राहिलेल्या जिल्ह्याविषयीच राज्यपालांनी विचारले असते भर कॉन्फरन्समध्ये जिल्हाधिकाऱ्यांची गोची झाली असती. त्यामुळे कोणतेही काम न करता फक्त पंचनाम्याचे अहवाल द्या, अशी तंबी प्रत्येक जिल्ह्यामध्ये दिली. अर्थात पंचनामे करताना बहुतेक भागांमध्ये यंत्रणेने बांधावर जाणे अथवा अक्षांश-रेखांश असलेले जीओ टॅगिंगचे पंचनामे करण्याचे टाळले आहे. मात्र, ही अट केंद्रानेही टाकलेली नाही. त्यामुळे आहे ते आकडे टाकून आम्ही अहवाल पाठविले,” अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांनी दिली.


इतर अॅग्रो विशेष
कृषी विधेयकांविरोधात राज्यात शेतकरी...पुणेः केंद्र सरकारने नुकतेच मंजूर केलेल्या कृषी...
सेंद्रिय व्यवस्थापनाच्या बळावर रोखली...सर्वाधिक संत्रा लागवडीखाली क्षेत्र असल्यामुळे ‘...
ऑनलाइन शिक्षणात बरेच ऑफलाइन! पाऊस आणि शाळा, महाविद्यालयं सुरू होण्याचा काळ...
आता शेतमाल खरेदीचे बोला!ऑगस्ट २०२० च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील खरीप...
उद्योजकांच्या कर्जमाफीवर सर्वांचीच...भारतात शेती आणि शेतकरी याला खूप महत्त्व आहे....
खरीप धान्योत्पादन १४४ दशलक्ष टनांवर नवी दिल्ली ः कोरोना पुणे मुंबई बातमी ...
ऊसतोड कामगार मंडळाची रचना, धोरण लवकरचः...मुंबई : ऊसतोड कामगारांचे विविध प्रश्न व समस्यांवर...
मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात हलक्या...पुणे ः राज्यातील पावसाचा जोर कमी झाला आहे. पुढील...
‘पोकरा’मधून फळबाग, वनशेती, बांबू, तुती...औरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
पावसाळ्यापूर्वीच कापूस खरेदीचे नियोजन अमरावती : गेल्या हंगामात पावसामुळे कापसाचे नुकसान...
सुधारित शेती, पूरक व्यवसायाचा ‘निवजे...निवजे (ता.कुडाळ,जि.सिंधुदुर्ग) गावकऱ्यांनी शेती...
मॉन्सूनचा परतीचा प्रवास लांबला पुणे : देशभरात गेले तीन ते चार महिने समाधानकारक...
राज्यात पावसाचा जोर ओसरला पुणे : राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. परंतु काही...
पपईला अतिपावसाचा फटका जळगाव ः अतिपावसात खानदेशात पपईचे पीक खराब झाले...
कृषी विधेयकांविरोधात आज ‘भारत बंद’ नगर/कोल्हापूर: केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन...
कपाशी सल्ला कपाशीच्या बोंडे सडण्याच्या समस्येवर उपाययोजना...
कोकण, खानदेशात पावसाचा धुमाकूळ पुणे ः कोकण आणि खानदेशला पावसाने झोडपून काढले....
हलका ते मध्यम पावसाची शक्यता पुणे ः कोकण, मध्य महाराष्ट्र व खानदेशात दोन...
कृषी विधेयकांविरोधात शेतकरी रस्त्यावरचंडीगड ः केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी...
नाशिकमध्ये खरीप कांदा लागवडी बुरशीजन्य...नाशिक: खरीप हंगामातील पोळ कांदा लागवडी पूर्ण...