खानदेशात आगाप नवती केळीची काढणी सुरू

खानदेशाच्या काही भागात आगाप नवती केळीची काढणी सुरू झाली आहे. काढणी सर्वत्र सुरू नसल्याने बाजारात आवक कमी आहे. हंगामाच्या सुरुवातीला दर्जेदार केळीला प्रतिक्विंटल ११०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.
खानदेशात आगाप नवती केळीची काढणी सुरू Agap Navati banana harvesting begins in Khandesh
खानदेशात आगाप नवती केळीची काढणी सुरू Agap Navati banana harvesting begins in Khandesh

जळगाव : खानदेशाच्या काही भागात आगाप नवती केळीची काढणी सुरू झाली आहे. काढणी सर्वत्र सुरू नसल्याने बाजारात आवक कमी आहे. हंगामाच्या सुरुवातीला दर्जेदार केळीला प्रतिक्विंटल ११०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे.  नवती केळी लागवडीसाठी जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, यावल, जामनेर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा परिसर प्रसिद्ध आहे. अनेक शेतकऱ्यांनी मार्च, एप्रिलमध्ये लागवड केली होती. या केळीची काढणी या आठवड्यात रावेर, यावल, मुक्ताईनगर भागात सुरू झाली आहे. या भागातील केळी दर्जेदार, निर्यातक्षम आहे. या केळीला उठाव असून, प्रतिक्विंटल ११०० रुपये किमान दर मिळत आहे. काही शेतकऱ्यांना ११५० रुपयांवर दर मिळत आहे. आवक सध्या कमी आहे. खानदेशात कांदेबाग केळीची काढणी पूर्ण झाली आहे. या केळीला दर टिकून राहिले होते. मध्यंतरी दिल्ली येथील आंदोलनामुळे केळीचे दर कमी होते.  दिल्ली, पंजाब, काश्मिरातून केळीला मागणी सुरू होत आहे. सध्या केळीची आवक खानदेशात कमी आहे. सध्या प्रतिदिन सरासरी १४० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. ही आवक पुढील आठवड्यात आणखी कमी होईल. आगाप नवती केळीची काढणी फेब्रुवारीत वेगात सुरू होईल. या केळीची निर्यात परदेशात अधिक होईल. निर्यात सध्या रखडत सुरू आहे. काही कंपन्या निर्यातीसाठी काम करीत आहेत. निर्यातीला वेग आल्यानंतर दरात आणखी सुधारणा होईल. रावेरातील तापी काठावरील गावांमध्ये मार्च, एप्रिलमध्ये अधिकच्या केळी बागांची लागवड झाली होती. या भागात फ्रूटकेअर तंत्रज्ञानाचा अवलंब करून केळीचे उत्पादन शेतकरी घेत आहेत. यामुळे दर बऱ्यापैकी आहेत. निर्यात वाढल्यानंतर दर आणखी वाढतील, अशी अपेक्षा आहे.   नवती केळीचे दर मागील वर्षीदेखील १२०० ते १३०० रुपये प्रतिक्विंटल, असे होते. मार्चपर्यंत दर टिकून होते. पण लॉकडाऊन लागू झाल्यानंतर दरात पडझड झाली. लॉकडाऊन दूर झाल्यानंतर दरात सुधारणा झाली आहे. नवती केळीची लागवड रावेर परिसरात सुमारे २१ हजार हेक्टरवर झाली आहे. या पाठोपाठ यावल, मुक्ताईनगर भागातही लागवड आहे. शहादा, तळोदा भागातही मिळून सुमारे सात हजार हेक्टरवर नवती केळी आहे. या भागात मात्र अद्याप काढणी सुरू झालेली नसल्याची माहिती मिळाली. नवती केळीच्या लागवडीवर दृष्टीक्षेप

  •   नवती केळीच्या लागवडीसाठी रावेर, मुक्ताईनगर, यावल, जामनेर, नंदुरबारमधील 
  •   शहादा, तळोदा परिसर प्रसिद्ध. 
  •   अनेक शेतकऱ्यांकडून मार्च, एप्रिलमध्ये लागवड
  •   सध्या नवती केळीची काढणी रावेर, यावल, मुक्ताईनगर भागात सुरू
  •   निर्यातक्षम, दर्जेदार केळीचे उत्पादन, प्रतिक्विंटल ११०० रुपये किमान दर
  •   आगाप नवती केळीची काढणी फेब्रुवारीत वेगात सुरू होईल
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com