कोरोना संक्रमण काळातील सुरुवातीचे तीन-चार महिने सर्वत्र लॉकडाउन, कामगारांचे स्थलांतर आदी कारणांमु
ताज्या घडामोडी
लातूर येथे पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन
लातूर ः पालकमंत्री व राज्य शासनाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर बुधवारी (ता.१) ठिय्या आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले. या वेळी कार्यकर्त्यांनी बॅरिकेट तोडून चाल केली. त्यानंतर श्री. निलंगेकर यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाच्या समस्यांची जाण असेल, तर श्री. निलंगेकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच घरासमोर घंटानादही करण्यात आला.

बुधवारी (ता. १) पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या येथील एलआयसी कॉलनीतील घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर करण्यात आला होता. बुधवारी सकाळपासूनच श्री. निलंगेकर यांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
वसंतराव नाईक चौकापासून घोषणा देत कार्यकर्ते श्री. निलंगेकर यांच्या घराकडे निघाले होते. पालकमंत्र्यांच्या घराकडे हे कार्यकर्ते जाऊ नयेत म्हणून पोलिसांनी दूर रस्त्यावर बॅरिकेट लावले होते. तेथेच कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले. त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले. यात कार्यकर्ते व पोलिस एकमेकांशी भिडले. कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी नमते घेतले. त्यानंतर श्री. निलंगेकर यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
- 1 of 1025
- ››