agriculture news in marathi,agitation for maratha reservation, latur, maharashtra | Page 2 ||| Agrowon

लातूर येथे पालकमंत्र्यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

लातूर  ः पालकमंत्री व राज्य शासनाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर बुधवारी (ता.१) ठिय्या आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले. या वेळी कार्यकर्त्यांनी बॅरिकेट तोडून चाल केली. त्यानंतर श्री. निलंगेकर यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाच्या समस्यांची जाण असेल, तर श्री. निलंगेकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच घरासमोर घंटानादही करण्यात आला.

लातूर  ः पालकमंत्री व राज्य शासनाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे सदस्य संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर बुधवारी (ता.१) ठिय्या आंदोलन करण्यासाठी जाणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले. या वेळी कार्यकर्त्यांनी बॅरिकेट तोडून चाल केली. त्यानंतर श्री. निलंगेकर यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाच्या समस्यांची जाण असेल, तर श्री. निलंगेकर यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. तसेच घरासमोर घंटानादही करण्यात आला.

बुधवारी (ता. १) पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या येथील एलआयसी कॉलनीतील घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जाहीर करण्यात आला होता. बुधवारी सकाळपासूनच श्री. निलंगेकर यांच्या घरासमोर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

वसंतराव नाईक चौकापासून घोषणा देत कार्यकर्ते श्री. निलंगेकर यांच्या घराकडे निघाले होते. पालकमंत्र्यांच्या घराकडे हे कार्यकर्ते जाऊ नयेत म्हणून पोलिसांनी दूर रस्त्यावर बॅरिकेट लावले होते. तेथेच कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले. त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले. यात कार्यकर्ते व पोलिस एकमेकांशी भिडले. कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी नमते घेतले. त्यानंतर श्री. निलंगेकर यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.


इतर ताज्या घडामोडी
कोरोना’च्या संकटामुळे माळेगावचे गाळप...माळेगाव, जि. पुणे ः माळेगाव सहकारी साखर...
राज्यात कोरोना उपचारासाठी ३० विशेष...मुंबई : ‘‘‘कोरोना’ला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने...
कोल्हापुरातील भाजी मंडई, रस्त्यावरील...कोल्हापूर : सामाजिक अंतर ठेवण्याची सूचना पायदळी...
स्वयंसेवी संस्था निवडीचे निकषआदर्शगाव ही योजना स्वयंसेवी संस्थांमार्फत...
तयार करा ग्रामविकास आराखडासरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील,...
नियंत्रण उसावरील खोडकिडीचे सुरू उसाला फेब्रुवारी ते एप्रिलपर्यंत खोडकिडीचा...
सोलापुरात ५०० गाड्या कांद्याची आवक,...सोलापूर : कोरोना विषाणूमुळे सोलापूर बाजार...
कोरोना’चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...मुंबई : ‘कोरोना’ विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग...
जळगाव जिल्ह्यात केळीचे दर ३०० ते ४००...जळगाव : जिल्ह्यातील केळी उत्तर भारतात...
द्राक्षबागांना एकरी अडीच लाखांची मदत...नाशिक : संपूर्ण देशात असणाऱ्या लॉकडाऊनमुळे नाशिक...
शासनाने अतिरिक्त दूध खरेदीची मर्यादा...कोल्हापूर : शासनाने अतिरिक्त दूध खरेदीची मर्यादा...
करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता ‘...मुंबई: करोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि संसर्ग...
सांगलीत शेतीमालाची ३०० कोटींवर उलाढाल...सांगली : 'कोरोना'चा प्रसार रोखला जावा, यासाठी...
सांगली जिल्ह्यातून द्राक्ष निर्यातीस...सांगली : द्राक्ष निर्यातीस परवानगी मिळाल्याने...
अंगणवाडी-ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ...मुंबई : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर...
नागपुरातील महिला समूहांनी बनविले १५...नागपूर : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, महाराष्ट्र...
पुणे बाजार समितीत १० हजार क्विंटल...पुणे : लॉकडाऊमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमालाला उठाव...
अंत्योदय, ‘प्राधान्य कुटुंब’...मुंबई: राज्यातील स्वस्त धान्य दुकानांमधून एप्रिल...
सोलापूर बाजार समितीत गुरुवारीच होणार...सोलापूर : ‘कोरोना’चा संसर्ग रोखण्यासाठी...
सातारा जिल्हा बँकेतर्फे मुख्यमंत्री...सातारा : ‘कोरोना’मुळे देशात २१ दिवसांचा...