नाशिक जिल्ह्यात आंदोलनास प्रतिसाद

मराठा आरक्षणासाठी आंदोलन
मराठा आरक्षणासाठी आंदोलन

नाशिक  : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या बंदला बुधवारी नाशिक जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नाशिक शहरात किरकोळ घटना वगळता व्यवहार सुरळीत सुरू होते. सर्व तालुक्यातील ग्रामीण भागात बंदसह रास्ता रोको, प्रतिमादहन करण्यात आले.

 बंद शंभर टक्के असला तरी खाजगी वाहनांना इच्छित स्थळी ये-जा करता येत होती. काही शाळा, दुकाने बंद असली तरी दैनंदिन व्यवहार सुरळीत सुरू होते. जागोजागी पोलिस चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. बसचे नुकसान टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या सर्व बस डेपोत जमा करण्यात आल्या होत्या. पंचवटी परिसरातील काही शाळा लवकर सोडून देण्यात आल्या. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या खासगी टॅक्सी, बसचालक यांनी वाहतूक बंद ठेवली होती.

नाशिकरोड येथे सकाळी दुकाने, कार्यालये बंद करण्याचे आवाहन देत कार्यकर्त्यांनी फेरी काढली. भगूर, देवळाली कॅम्प रस्ता, येथे टायर जाळण्यात आले. गंगापूर धरण येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार राम कदम, खासदार चंद्रकांत खैरे यांच्या प्रतिमेस जलसमाधी देण्यात आली. सातपूर येथे बंदला अल्प प्रतिसाद मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com